English shape=

अठवडे ची संदेश - Word For The Week

"अठवडे ची संदेश" हे एक (इ—मेल) बातमीपत्र आहे जे इ- मेल द्वारे प्रत्येक आठवडयाला पाठविले जाते. प्रत्येक अंकामध्ये झॅक पुनेन यांचा लेख, पुस्तके, किंवा संदेशामधील उतारे आहेत. |
2010 |  2011 |  2012 |  2013 |  2014 |  2015 | 
प्रथम फळ
नवेंबर 2015 (1) - जैक पूनन

प्रकटीकरण 14:4 मध्ये लिहिले आहे, ''स्त्रीसंगानें मलिन न झालेले ते हेच आहेत, ते शुद्ध आहेत. जेथें कोठें कोंकरा जातो तेथें त्याच्यामागें जाणारें ते हे आहेत. ते देवासाठी व कोंकर्या साठीं प्रथम फळ असे माणसांतून विकत घेतलेले आहेत''.

यामध्ये शारीरिक कौमार्याविषयी किंवा वेश्येविषयी सांगितले नाही. प्रकटीकरण 17:5 मध्ये ज्या स्त्रियांविषयी लिहिले आहे, त्या स्त्रियांविषयी येथे सांगितले आहे. त्या स्त्रिया म्हणजे बाबेलातील वेश्यांच्या माता व त्या वेश्यांच्या मुली आहेत.

हे वचन असे सांगते की 1,44,000 ह्या लोकांनी आत्मिक रीतीचा वेश्याव्यवसाय केला नव्हता. त्यांनी स्वतःला ख्रिस्ताकरिता शुद्ध कुमारीप्रमाणे राखले, ते देहासोबत व जगासोबत एक न होता ते आत्मिक व्यभिचाराने मलिन झाले नाहीत. याकोब 4:4 मध्ये आत्मिक व्यभिचाराविषयी सांगितले आहे, ''अहो, अविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हास ठाऊक नाही का?'' हे ते लोक आहेत जे परीक्षेच्या काळात विश्वासू होते व त्यांनी जगीकपणापासून स्वतःला राखले होते. जेथे कोठे कोकरा गेला तेथे त्याच्या मागे ते गेले. दुसर्याा शब्दात,ज्याप्रमाणे पृथ्वीवर कोकर्याेने वधस्तंभ उचलला त्याप्रमाणे त्यांनी रोज आपला वधस्तंभ उचलला.

या ठिकाणच्या दुसर्याे वाक्यप्रयोगाकडे लक्ष द्या, ''माणसातून विकत घेतलेले आहेत''. प्रकटीकरण 14:3 मध्ये आपण वाचतो की ते पृथ्वीपासून वेगळे केलेले होते. ''पृथ्वीवर वस्ती करणार्यांीच्या'' ते विरोधात होते. त्यांना पृथ्वीतून स्वतंत्र करण्यात आले होते. जगातील गोष्टींमध्ये ते गुंतलेले नव्हते. त्यांची मने वर लागलेली होती. ज्याठिकाणी ख्रिस्त पित्याच्या उजव्या हाताला बसलेला होता, तेथे त्यांची मने लागलेली होती. ''पृथ्वीवर शक्य तेवढा पैसा कमवून मी मरणानंतर स्वर्गात जाईन असा विचार ते करीत नव्हते. पृथ्वीवर सर्व सुखसोयी मिळवून देखील मरणानंतर मी स्वर्गात जाईन असा विचार ते करीत नव्हते''. असा विचार पृथ्वीवर वस्ती करणारे करतात, परंतु, हे लोक असा विचार करतात, ''पृथ्वीवरील एकादाच मिळालेल्या जीवनात मला देवाच्या इच्छेप्रमाणे कसे जगता येईल? वधस्तंभावर माझ्याकरिता मरणार्याए देवाप्रती मी माझी कृतज्ञता कशी व्यक्त करू शकतो?'' ते तडजोड करणारे नव्हते, ते द्वीबुद्धीचे नव्हते, ते अशक्त नव्हते. जगीक लोक आज स्वतःला विश्वासणारे संबोधतात. परंतु, ते वेगळ्या मनोवृत्तीचे लोक होते. ते पृथ्वीपासून वेगळे केलेले लोक होते. ते पृथ्वीपासून वेगळे केलेले लोक होते. त्यांची मने पृथ्वीतील सुखसोयींवर किंवा संपत्तीवा किंवा प्रतिष्ठेवर लागलेली नव्हती.

आता आपण बघतो की ते माणसांच्या मतांपासून, विचारांपासून स्वतंत्र होते. यामुळेच ते देवाकरिता व कोकर्यारकरिता प्रथम फळ बनले.

पहिले फळ म्हणजे जे फळ झाडावर सर्वप्रथम पिकते. हे लोक असे लोक होते ज्यांनी पवित्र आत्म्याला लगेच प्रतिसाद दिला व पृथ्वीवरील त्यांच्या जीवन काळात ते सर्वप्रथम तयार झाले, म्हणजेच सर्वप्रथम पिकले. त्यांनी त्यांचे जीवन व्यर्थ घालविले नाही. स्वतःचा वधस्तंभ उचलण्याची देवाने त्यांना जी संधी दिली होती ती संधी त्यांनी गमाविली नाही. कोकर्या्च्या मागे जाण्याची त्यांना मिळालेली संधी त्यांनी गमाविली नाही. त्यांनी प्रत्येक संधीचा स्वीकार केला व मरण्यास तयार होऊन ते येशू ख्रिस्ताला अनुसरले व पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे ते चालले. ह्याचा परिणाम असा झाला की ते जलद गतीने परिपक्व झाले. ते प्रथम फळ आहेत.

याकाबे 1:18 मध्ये परमेश्वर म्हणतॆ ''आपण त्याच्या सृष्ट वस्तूतील जसें काय प्रथमफळ व्हावें, म्हणून त्यानें स्वतःच्या इच्छने आपणांला सत्य वचनानें जन्म दिला''.

प्रत्येक व्यक्ती योग्यप्रकारे प्रतिसाद देत नाही. परंतु, काही थोडके लोक असे आहेत जे योग्यप्रकारे प्रतिसाद देतील व प्रथम फळ बनतील. 1,44,000 हा आकडा शब्दशः नाही. थोडक्या लोकांच्या समूहाचा तो आकडा चिन्हात्मक आहे. येशूने म्हटले की जीवनाचा मार्ग हा अरूंद आहे व काही थोडकेच त्यातून जातील.

ज्यांनी आपली वस्त्रे कोकर्या्च्या रक्तात धुतली असा मोठा लोक समुदाय देखील देवासमोर उपस्थित राहील व कोणीही लोकांची संख्या मोजू शकणार नाही. प्रकटीकरण 7 मध्ये हे आपण बघतो. त्यापैकी अनेक लोक ही सर्व धर्मातून आलेली बालके असतील, जे समजबुद्धी येण्यापूर्वीच मरण पावली. त्यांच्यापैकी हजारो गर्भपात झालेले असतील. त्यांना ख्रिस्ताचे नीतिमत्व प्राप्त होईल आणि म्हणून ते स्वर्गात असतील. पण त्यांना विजयी होण्याकरिता कधीच संधी उपलब्ध झाली नव्हती. परंतु, ज्यांनी विवेकपूर्ण रीतीने अरूंद मार्ग निवडला जो जीवनाकडे जाणारा होता त्यांचा आकडा गणल्या जाईल. ते फारच कमी असतील. हे ते लोक असतील ज्यांनी मत्तय 5,6 व 7 हे अध्याय गंभीरपणे घेतलेले असतील व ते देवाचे व कोकर्याडचे प्रथम फळ होतील.

अनुवादक : भरत राजन     मुद्रक प्रारूप    इसे भेजें
"सप्ताह का संदेश!" - आपके किसी भी प्रकार के सवाल या प्रतिक्रिया के लिए कृपया संपर्क करें /लिखे : marathi@cfcindia.com, cfc@cfcindia.com
तुमचा मित्राला पाठविणे | सप्ताह का संदेश | देविक लेख | संपर्क साधणे

© Copyright - Christian Fellowship Church , Bangalore. (INDIA)