English shape=

अठवडे ची संदेश - Word For The Week

"अठवडे ची संदेश" हे एक (इ—मेल) बातमीपत्र आहे जे इ- मेल द्वारे प्रत्येक आठवडयाला पाठविले जाते. प्रत्येक अंकामध्ये झॅक पुनेन यांचा लेख, पुस्तके, किंवा संदेशामधील उतारे आहेत. |
2010 |  2011 |  2012 |  2013
विशाल मन मिळविण्याची इच्छा बाळगा
जुलाई 2012 (3) - जैक पूनन

1 राजे 3:16-28 मध्ये आपण शलमोनाच्या ज्ञानाचे उदाहरण बघतो. एके दिवशी दोन वेश्या त्याच्यापुढे न्याय मागण्याकरिता आल्या. त्या दोघीही एकाच घरात राहत होत्या व त्याच दिवसांमध्ये त्या प्रसुत झाल्या होत्या. एका रात्री एकीचे बाळ तिच्या अंगाखाली सापडून मरण पावले. तिला ते कळताच तिने बाळाची अदलाबदल केली. सकाळी दुसरीच्या लक्षात आले की तिने अदलाबदल केली आहे, म्हणून ती बाळ परत मागत होती. जिवंत असलेल्या बाळाकरिता त्या भांडू लागल्या. अशा परिस्थितीत शलमोन काय निर्णय घेणार? देवाने शलमोनाला ज्ञान पुरविले. शलमोनाने सुचविले की जिवंत बाळाचे दोन तुकडे करावे व प्रत्येकीला एकएक तुकडा द्यावा. जिवंत असलेले बाळ जिचे होते ती म्हणाली, ''जिवतं मलु गा तिला द्या, पण त्यास मारून टाकू नका.'' परंतु, दसु री स्त्री म्हणाली, ''तो न माझा न तझुा, त्याचे दाने भाग करा.'' लगेचच सर्वांच्या लक्षात आले की त्या बाळाची खरी आई कोण आहे. नंतर शलमोन म्हणाला की खर्या् आईला तिचे बाळ सुपूर्त करा. सर्व इस्राएली लोकांनी हा न्याय पाहिला व त्यांच्या मनात राजाविषयी पूज्यबुद्धि उत्पन्न झाली कारण न्याय करण्याचे दैवी ज्ञान शलमोनाच्या ठायी आहे हे त्यांना दिसून आले.

शलमोनाचे ज्ञान आपण आज कसे लागू करू शकतो हे आपण पाहू : समजा दोन बंधू मिळून एका चर्चमध्ये सेवा करीत आहेत व त्यांचे एकमेकांसोबत भांडण झाले. जर दोघांपैकी एक मंडळीत फूट पाडतो व लोक हिसकावू पाहतो, तर तो खर्याल आईप्रमाणे आहे का? नक्कीच नाही! तो खरा असता तर म्हणाला असता, ''नाही, मंडळीचे दोन तुकडे करू नका. तुम्ही संपूर्ण मंडळी तुमच्याकडे राहू द्या.''

विश्वासणार्यांकच्या मंडळीला कधीही तोडू नका. मंडळीत फूट न पाडता तशीच सोडून देणे चांगले आहे. स्वतः तुम्ही तिथून बाहेर निघा, दुसर्याळ ठिकाणी जा व पहिल्या मंडळीत फूट न पाडता नवीन कार्य सुरू करा. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. जर तुम्ही खरी आई असाल तर, देवाची इच्छा असल्यास ती मंडळी देव तुम्हाला देईल. तो दुसर्यास खोट्या आईला मारून तुम्हाला बाळ देईल. त्याने शौलाला मारून दावीदाला राज्य दिले. तो आज देखील हे कार्य करू शकतो. परंतु जिवंत अशा बाळाला दोन भागात तोडू नका. मंडळीला विभाजीत करू नका. बाहेर जाऊन दुसर्याि ठिकाणी कार्य करा. देव स्वतःच्या हाताने तुम्हाला सर्वकाही देतो. तुम्ही हिसकावून घेऊ नका किंवा तुकडे करू नका.

जेव्हा केव्हा मी मंडळीतील पुढारीपणाशी असहमत असतो तेव्हा हेच तत्व मी अनुसरतो. मंडळीत फुट पाडून काही लोकांना माझ्या मागे आणण्याचा मी कधीच प्रयत्न करीत नाही. मी दुसरीकडे जातो आणि देवाला म्हणतो, ''प्रभो, मला परत नवीनरित्या सुरू करू दे. मला दुसरे बाळ दे. मी त्यासाठी कधीच भांडणार नाही.'' आणि आज मी अशी साक्ष देऊ शकतो की देवाने मला माझ्या कार्यात विपुलपणे आशीर्वादित केले आहे. माझ्या वृत्तीमुळे देवाने मला आशीर्वादित केले आहे. म्हणून ही गोष्ट मी तुम्हाला निक्षूण सांगत आहे.

अध्याय 4:29 मध्ये लिहिले आहे, ''देवाने शलमोनास अलोट शहाणपण व बुद्धी दिली आणि समुद्रकांठच्या वाळूसारखे विशाल मन दिले.'' लक्षात असू द्या कि शलमोन तरुण होता. तर मग तरुण लोक देवाला याठिकाणी नमूद केलेल्या गोष्टी मागू शकतात. केवळ शहाणपणच नव्हे तर बुद्धी व समुद्रकांठच्या वाळूसारखे विशाल मन देखील. ह्याचा अर्थ असा की विशाल मन समुद्रकांठच्या वाळूसारख्या देवाच्या लोकांना सामावून घेऊ शकते (उत्पत्ती 22:17).

दुसर्याल मंडळीतील अशा भावाचा विचार करा जो पाण्याने बाप्तिस्मा व अन्य भाषा बोलण्याविषयी आपल्याशी सहमत नाही. परंतु, देवाने त्याचा स्वीकार केलेला आहे. त्याच्याकरिता आपली प्रार्थना येणेप्रमाणे असावी, ''प्रभो, त्याचा स्वीकार करण्यासाठी मला विशाल मन दे - तो माझ्याशी सहमत नाही व माझ्यासोबत सेवाकार्य करीत नाही तरी मी त्याचा स्वीकार करावा असे विशाल मन मला दे.'' देवाला जितकी लेकरे आहेत तितके मला भाऊ व बहिणी असाव्या!

देवाच्या त्या लेकरांचा विचार करा की ज्यांचे मत व आपले मत भिन्न आहे. आपण त्यांचा स्वीकार करणार का? मला आठवते की एक बहीण बाप्तिस्मा घेण्याकरिता माझ्याकडे आली. तिच्या अंगावर सोन्याचे दागीणे होते आता माझे मत आहे की विश्वासणार्यांलनी सोन्याचे दागीणे घालू नये. हे माझे मत 1 तीमथ्य 2:9 व 1 पेत्र 3:3 प्रमाणे आहे. परंतु ही बहीण सोन्याचे दागीणे घातलेली होती. आता मी तिला बाप्तिस्मा द्यावा की देऊ नये. त्यावेळी देवाने मला एक प्रश्न विचारला, ''मी तिचा स्वीकार केला आहे असे तुझे मत आहे का?'' आणि मी म्हणालो, ''प्रभु, मला दिसते की तिचा नवीन जन्म झाला आहे व तू तिचा स्वीकार केला आहेस.'' तेव्हा प्रभु म्हणाला, ''मी ज्याचा स्वीकार केला आहे त्याचा तू नाकार का करावा? मी तिचा बाप्तिस्मा केला. मी तिला दागिणे काढण्यास सांगितले नाही! तिच्या मनात दागिण्याच्या विषयावर

पुढे प्रकाश पडेल अशी मी अपेक्षा केली. तिचा न्याय करणे माझे काम नाही. देवाने ज्यांचा स्वीकार केला आहे त्यांचा आपण स्वीकार करावा असे मला वाटते. त्यांचे मत आपल्या मतांपेक्षा भिन्न असले तरी आपण त्यांचा स्वीकार करावा

मला आठवते की एकदा मला देवाने विचारले, ''ही गोष्ट समजण्याकरिता तुला किती वेळ लागला?'' मी कबूल केले की काही वर्षे लागलीत. 'मग हा विषय समजण्याकरिता वेळ लागत असलेल्या व्यक्तीप्रती तू धीर का बाळगत नाहीस?' आपल्या सर्वांना विशाल मनाची आवश्यकता आहे. जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा आवेशी असतो, संकुचीत मनाचे व बुद्धीचे असतो. त्या दिवसांमध्ये आपण आपल्याशी सहमत असलेल्या लोकांचाच स्वीकार करितो. मला लाज वाटते परंतु, मी कबूल करतो की मी तरुण होतो तेव्हा असाच होतो. माझ्या अनेक मूर्खपणाच्या मनोवृत्तींपैकी ही एक मनोवृत्ती माझ्यात होती. परंतु, मी प्रौढ होत गेलो व प्रभुला अधिक चांगल्याप्रकारे ओळखत गेलो तेव्हा मला कळून आले की माझ्यात विशाल मन असण्याची गरज आहे.

अनुवादक : विनोद टॊडॆ     छपाई फोर्मेट    तुमचा मित्राला पाठविणे
"सप्ताह का संदेश!" - आपके किसी भी प्रकार के सवाल या प्रतिक्रिया के लिए कृपया संपर्क करें /लिखे : marathi@cfcindia.com, cfc@cfcindia.com
तुमचा मित्राला पाठविणे | सप्ताह का संदेश | देविक लेख | संपर्क साधणे

© Copyright - Christian Fellowship Church , Bangalore. (INDIA)