English shape=

अठवडे ची संदेश - Word For The Week

"अठवडे ची संदेश" हे एक (इ—मेल) बातमीपत्र आहे जे इ- मेल द्वारे प्रत्येक आठवडयाला पाठविले जाते. प्रत्येक अंकामध्ये झॅक पुनेन यांचा लेख, पुस्तके, किंवा संदेशामधील उतारे आहेत. |
2010 |  2011 |  2012 |  2013
जीवनाच्या शवे टच्या दिवसापयर्तं कनिष्ठ बंधू असण्याची इच्छा बाळगा
जुलाई 2012 (2) - जैक पूनन

2 शमुवेल 11 मध्ये आपण दाविदाच्या मोठ्या पतनाची गोष्ट वाचतो. त्याच्या पतनातून आपल्या सर्वांना धडा मिळतो, ''वर्षारंभी लोक युद्धाच्या मोहिमेस जातात त्या समयी हे घडले.'' थंडीच्या दिवसांमध्ये राजे लोक युद्धास जात नाहीत परंतु वसंत ऋतूत जातात. प्रत्येक युद्धामध्ये दावीद हा पुढारी असे. शत्रुंविरुद्ध लढत असताना तो सैन्याचे नेतृत्व करीत असे. परंतु, यावेळेस दाविदाला वाटले की त्याने विसावा घ्यावा. युद्धातून आंग काढून विसावा घेत असताना दाविदाच्या पतनास सुरुवात झाली. देवाची इच्छा असते त्याठिकाणी जेव्हा आपण नसतो तेव्हा आपले पतन होते. त्यावेळी दाविदाचे ठिकाण युद्धभुमी होती. परंतु, तो राजमहलात झोप घेत होता. त्यादिवशी तो युद्धभुमीवर असता तर त्याचे पतन झाले नसते.

जेव्हा सर्वकाही सुरळीत असते व आपण देवाचे युद्ध लढणे बंद करितो व प्रभुचे काम करण्यासाठी आपल्या कनिष्ठ लोकांना पाठवितो तेव्हा समस्या उत्पन्न होतात. अनेक ख्रिस्ती पुढारी राजासारखे आपल्या महालात बसलेले असतात व कनिष्ठ लोकांना सेवाक्षेत्रामध्ये कष्ट करण्याकरिता पाठवितात.

माझी इच्छा आहे की मी माझ्या जीवनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत कनिष्ठ बंधू असावे. मी 90 वर्षांचा झाल्यावर देखील सेवाक्षेत्रामध्ये काम करीत राहावे अशी माझी इच्छा आहे. माझी इच्छा आहे की शेवटपर्यंत मी युद्धभूमीवर असावे. माझी आशा आहे की तुम्हाला देखील असे वाटत असेल. युद्धभूमीवर धोका नसतो. महलांमध्ये धोका असतो. जोवर दावीद युद्धभूमीवर होता तोवर तो पूर्णपणे सुरक्षीत होता . महालामध्येच तो धोक्यात होता.

जेव्हा आपण त्रासात, दुःखात, संकटात, आजारात व आर्थिक अडचणीत असतो तेव्हा आपण पापात पडतो का? नाही. जेव्हा सर्व सुरळीत असते, आपल्याकडे भरपूर पैसा असतो, आपला उद्योग सुरळीत असतो, आपल्या घरात कोणीही आजारी नसतो तेव्हा आपण पापात पडण्याची दाट शक्यता असते. अशा दिवसांमध्ये आपण अधिककरून जागृत असावे.

दावीद यरूशलेमेतील त्याच्या घरामध्ये होता (11:1). यहोशवा लढाई करीत असताना मोशे ज्याप्रमाणे प्रार्थना करीत होता त्याप्रमाणे दावीद इथे प्रार्थना करीत नव्हता. यवाब यद्धु भूमीवर लढाई करीत असताना दावीद जर त्याच्याकरिता प्रार्थना करीत असता तर दावीद सुरक्षीत असतापरंतु, दावीद झोपला होता. ''संध्याकाळाच्या समयी दावीद पलंगावरून उठून राजमंदिराच्या गच्चीवर जाऊन फिरू लागला.'' दावीद सकाळी न उठता थेट दुपारीच उठला का हे नक्की सांगता येत नाही. परंतु, तो बिछाण्यावरून उठल्यावर त्याने प्रार्थना केली नाही. तो थेट गच्चीवर फिरू लागला. त्याचवेळी त्याला ही सुंदर स्त्री बथशेबा दिसली. तो तिच्याकडे आकर्षिल्या गेला. दाविदाने त्याचवेळेस वासनेवर नियंत्रण ठेवले असते तर त्याने पुढील टप्पे गाठले नसते.

त्या स्त्रीला बघून तो आकर्षित झाल्याबरोबर त्याने पुढीलप्रमाणे म्हणायला हवे होते, ''हे फार धोक्याचे आहे. मी सावध असावे.'' त्याने जाऊन काही वेळ यवाबासाठी प्रार्थना करायला हवी होती. ती कोणा पुरुषाची पत्नी आहे हे त्याला कळल्यावर त्याने म्हणायला हवे होते, ''ती माझी होऊ शकत नाही.'' जर दाविदाने बथशेबेकरिता प्रार्थना केली असती की तिने उरियाची शुद्ध पत्नी असावे तर दाविदाने स्वतः तिच्यासोबत व्यभिचार केलाच नसता. परंतु त्याच क्षणाला दाविदाला त्या देवाचा विसर पडला होता ज्याने स्वतः दाविदाला राजा बनविले होते. आता दावीद हुकुमशाह सारखा वागत होता म्हणून त्याने मनपसंत स्त्रीला स्वतःचे करून घेतले. यामुळेच त्याने तिच्यासोबत व्यभिचार केला.

अनुवादक : विनोद टॊडॆ     छपाई फोर्मेट    तुमचा मित्राला पाठविणे
"सप्ताह का संदेश!" - आपके किसी भी प्रकार के सवाल या प्रतिक्रिया के लिए कृपया संपर्क करें /लिखे : marathi@cfcindia.com, cfc@cfcindia.com
तुमचा मित्राला पाठविणे | सप्ताह का संदेश | देविक लेख | संपर्क साधणे

© Copyright - Christian Fellowship Church , Bangalore. (INDIA)