|
येशूची वाणी शुद्ध होती. त्याच्या मुखातून कधीही अश्लील व निरर्थक शब्द बाहेर पडले नाही. तो नेहमी सत्य बोलला. त्याच्या मुखात कपट नव्हते येशू पैसा मिळविण्याकरिता बालेत नव्हता व येशूला त्या कामात कोणी गुंतवू शकत नव्हता. येशूला अशा गोश्टींची आवड देखील नव्हती. त्याचे मन पृथ्वीवरील गोष्टींकडे नव्हे तर स्वर्गातील गोष्टींकडे होते. यात शंका नाही की त्याने जगातील वस्तुंचा उपयोग केला; परंतु, त्याचे मन त्या वस्तुंकडे नव्हते. तो जगातील वस्तुंकडे आकर्षित झाला नाही.
इतरांना दुःख होईल अशा प्रकारच्या शब्दांचा उपयोग करून येशूने त्यांची चेष्टा केली नाही किंवा गंमत केली नाही. मनाला दुखविणारे विधान त्याने केले नाही. येशूने शिष्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या उणीवंबे द्दल चुगली किंवा निंदा केली नाही. खरोखर आश्चर्यजनक गोश्ट आहे की तीन वर्षांच्या कालावधीमध्ये येशूने अकरा शिष्यांपुढे यहूदाचे कपट उघडे केले नाही. शेवटल्या भोजनाच्या वेळी देखील शिष्यांना कळले
नाही की प्रभुचा विश्वासघात कोण करणार?
येशूने त्याच्या जिभेचा उपयोग इतरांना धीर देण्याकरिता व मार्गदर्शन करण्याकरिता केला. येशूची वाणी देवाच्या हातामध्ये जीवन देणार्या् साधनाप्रमाणे होती. येशूने त्याच्या वाणीचा उपयोग थकलेल्यांना विसावा देण्याकरिता केला (यशया 50:4). बंड व गर्विष्ठ लोकांचे हृदय भग्न करण्याकरिता येशूने त्याच्या जिभेचा उपयोग तरवारीप्रमाणे केला (यशया 49:2).
येशूने रोमी सुभेदार व कनानी बाईच्या विश्वासाबद्दल त्यांची सर्वांपुढे प्रशंसा केली तेव्हा त्यांना किती प्रोत्साहन मिळाले असेल (मत्तय 8:10; मत्तय 15:28).
पापी स्त्रीच्या प्रीतीबद्दल तिची येशूने प्रशंसा केली (लूक 7:47). बेथानी येथील मरीयेची येशूने त्यागमय अर्पणाबद्दल प्रशंसा केली (मार्क 14:16). या लोकांना येशूच्या शब्दांचा विसर पडला नसेलच.
येशूने पेत्राला खात्री दिली की तो त्याच्यासाठी प्रार्थना करणार तेव्हा पेत्राला किती सामर्थ्य प्राप्त झाले असेल (लूक 22:32). येशू फार थोडके शब्द बोलला परंतु, त्यातून मोठे सामर्थ्य लोकांना प्राप्त झाले व धीर प्राप्त झाला.
असे अनेक लोक होते ज्यांनी येशूच्या मुखातील वाणी ऐकली व त्यांच्या थकलेल्या हृदयाला विसावा मिळाला होता.
येशू नियमीतपणे आपल्या पित्याची वाणी ऐकत असे जेणेकरून प्रत्येक दिवशी थकलेल्या लोकांकरिता त्याच्याकडे उपयुक्त शब्द किंवा वचन असावेत.
येशूने याकोब व योहानाला दटावले कारण ते मान मिळविण्याची अपेक्षा करीत होते व शोमरोन्यांचा सूड घेऊ पाहत होते (मत्तय 20:22,23; लूक 9:55). शिष्यांच्या विश्वासाबद्दल येशूने त्यांना सात वेळा दटावले
सत्य बोलण्याची येशूला भिती वाटत नव्हती. त्याद्वारे कोणाला वाईट वाटले तरी तो सत्य बोलत होता कारण त्याच्या मनात त्यांच्याविषयी प्रीती असे. त्याची प्रतिष्ठा ढासाळेल अशी त्याला भिती नव्हती. त्याच्या कठोर शब्दांमुळे त्याची प्रतिष्ठा कमी होईल अशी त्याला भिती नव्हती. त्याची स्वतःपेक्षा इतरांवर अधिक प्रीती होती म्हणूनच इतरांची मदत करण्याकरिता त्याने स्वतःच्या प्रतिष्ठेचा त्याग केला. तो ठामपणे सत्य
बोलत असे, जेणेकरून लोकांचा सार्वकालिक नाश होऊ नये. लोकांच्या मतांपेक्षा त्याला त्यांच्या सार्वकालिक हिताची जास्त काळजी होती.
|