English shape=

अठवडे ची संदेश - Word For The Week

"अठवडे ची संदेश" हे एक (इ—मेल) बातमीपत्र आहे जे इ- मेल द्वारे प्रत्येक आठवडयाला पाठविले जाते. प्रत्येक अंकामध्ये झॅक पुनेन यांचा लेख, पुस्तके, किंवा संदेशामधील उतारे आहेत. |
2010 |  2011 |  2012 |  2013
आज्ञाधारकपणा तुमचे जीवन गौरवी करील
मई 2012 (4) - जैक पूनन

येशूचे जीवन हे अत्यंत सुंदर, शिस्तबद्ध, शांतीमय व आनंदित होते. असे जीवन जगात कोणी कधीही बघितले नाही. यामागील कारण म्हणजे येशू देवाच्या वचनाला पूर्णपणे आज्ञाधारक होता.

भौतिक विश्वामध्ये जी शिस्तबद्धता आहे त्याविषयी विचार करा. सूर्य, चंद्र, तारे व ग्रह अंतराळामध्ये अगदी नियमबद्ध व शिस्तबद्ध रीतीने फिरतात. त्यामुळे आपण अचूक वेळ लावू शकतो. त्यांची शिस्त इतकी व्यवस्थित आहे की वैज्ञानिक अनेक वर्षांपूर्वीच पुढे काय घडामोडी होतील ह्याचे भविष्य अचूकपणे करतात. या परिपूर्ण शिस्तीचे गुपित काय? एकच गुपित आहे, देवाने लावून दिलेला नियम ते पाळतात. ते देवाच्या आज्ञेत आहेत. देवाने ग्रहतार्यांीना जे ठरवून दिले आहे त्या नियमात ते असतात.

ज्याठिकाणी देवाचे आज्ञापालन आहे त्याठिकाणी परिपूर्णता व सुंदरता असते. ज्याठिकाणी देवाची अवज्ञा आहे त्या ठिकाणी गोंधळ व विद्रूपता असते.

देवाच्या आज्ञा आपल्याकरिता उत्तम असतात ह्याची साक्ष तारेदेखील शांतपणे देत असतात. देवाच्या आज्ञा ओझ्याप्रमाणे नाहीत. येशूच्या जीवनातून आपल्याला कळते की केवळ सुभक्ती या जीवनाकरिता व पुढील जीवनाकरिता आपल्या लाभाची आहे (1 तीमथ्य 4:8). सुभक्त व्यक्तीपेक्षा दुसरा कोणीही पुरुष जास्त आनंदी, जास्त शांतीमय व जास्त तृप्त असू शकत नाही.

''परमेश्वराचे भय जीवनाचा झरा होय, ते मृत्युपाश चुकविते'' (नीतिसूत्रे 14:27). येशूने पुढील आज्ञा पाळली : ''पातक्यांचा हेवा करू नको तर परमेश्वराचे भय अहर्निश बाळग'' (नीतिसूत्रे 23:17).

देवाने येशूची प्रार्थना ऐकली कारण येशूच्या ठायी देवाचे भय होते (इब्री 5:7). येशूच्या ठायी देवाचे भय असल्यामुळे येशूसाठी स्वर्ग नेहमी उघडा होता. ''मी आपल्या पित्याचा सन्मान करितों” असे येशू एकवेळा म्हणाला (योहान 8:49). येशूने त्याच्या जीवनातून वचनातील सत्य प्रदर्शित केले. ''परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय; आणि परमपवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय'' (नीतिसूत्रे 9:10).

अनुवादक : विनोद टॊडॆ     छपाई फोर्मेट    तुमचा मित्राला पाठविणे
"सप्ताह का संदेश!" - आपके किसी भी प्रकार के सवाल या प्रतिक्रिया के लिए कृपया संपर्क करें /लिखे : marathi@cfcindia.com, cfc@cfcindia.com
तुमचा मित्राला पाठविणे | सप्ताह का संदेश | देविक लेख | संपर्क साधणे

© Copyright - Christian Fellowship Church , Bangalore. (INDIA)