English shape=

अठवडे ची संदेश - Word For The Week

"अठवडे ची संदेश" हे एक (इ—मेल) बातमीपत्र आहे जे इ- मेल द्वारे प्रत्येक आठवडयाला पाठविले जाते. प्रत्येक अंकामध्ये झॅक पुनेन यांचा लेख, पुस्तके, किंवा संदेशामधील उतारे आहेत. |
2010 |  2011 |  2012 |  2013
आपल्या कौटुंबिक पाशर्वभूमीची शेरवी मिरवू नका
मई 2012 (3) - जैक पूनन

स्वर्गीय गौरवातून येशूचे पृथ्वीवर येणे हे स्वतःच त्याच्या नम्रतेचे अद्भुत प्रात्यक्षिक आहे. परंतु आपल्याला सांगण्यात आले, ''त्याने स्वतःला लीन केले”(फिलिप्पै 2:8). ''ह्यास्तव त्याला सर्व प्रकारें 'आपल्या बंधूंसारखे होणें अगत्याचें होंतें'' (इब्री 2:17). इतर सर्व मनुष्यांसारखा तो देवासमोर झाला. तो शून्य झाला जेणेकरून सर्वस्व देवानेच असावे. ही खरी लीनता व नम्रता आहे.

जगिक वैभव व श्रेष्ठता ही व्यक्तीच्या पदावरून, संपत्तीवरून, त्याने साध्य केलेल्या गोष्टींवरून, त्याच्या कौटुंबिक पात्रतेंवरून.. इत्यादीवरून मोजल्या जाते. परंतु येशू ख्रिस्तामध्ये असलेले देवाचे गौरव हे किती भिन्न आहे!

जन्मलेल्यांपैकी येशू हाच असा व्यक्ती होता ज्याच्याकडे कोणत्या कुटुंबात त्याने जन्म घ्यावा ही निवड करण्याची संधी होती. आपल्यापैकी कोणाकडेही अशी संधी नाही.

कोणते कुटूबं दवे ाने निवडल?े नासरेथ गावांतील प्रसिद्ध नसलेले सुताराचे कुटूबं त्याने निवडले. त्यांच्याविषयी लाके म्हणाले, ''नासरेथांतून कांहींतरी उत्तम निघूं शकतें काय?'' (योहान 1:46) योसेफ व मरीया इतके गरीब होते की देवाला होमार्पण करण्यासाठी ते एक मेंढा सुद्धा आणू शकत नव्हते (लूक 2:22-24; लेवीय 12:8).

जन्म्लेल्यांपैकी येशू हाच असा व्यक्ती होता की त्याला ज्याठिकाणी जन्मायचे हाते े तचे कुटूबं त्याने निवडले. त्याच्या जन्माची जागा निवडण्याचे स्वातंत्र्य त्याला होते. त्याने कोणती जागा निवडली? त्याने गाईचा गोठा निवडला.

येशूने त्याच्या स्वतःच्या जन्मासाठी जी वंशावळी निवडली त्याकडे लक्ष द्या. येशूच्या वंशावळीत चार स्त्रियांचा उल्लेख मत्तय 1:3-6 मध्ये केला आहे. पहिली स्त्री तामार हिला तिचा सासरा यहूदा ह्याच्यापासून व्यभिचाराद्वारे पुत्र झाला. दुसरी राहाब, जी यरीहोमधील प्रसिद्ध वेश्या होती. तिसरी रूथ, जी मवाबाची वंशज होती, जिचा जन्म लोटाने त्याच्या स्वतःच्या मुलीशी व्यभिचार करण्याद्वारे झाला. चौथी स्त्री उरीया हित्तीची पत्नी बेथशेबा होती जिच्यासोबत दाविदाने व्यभिचार केला.

जन्म घेण्यासाठी देवाने असे पूर्वज व वंशावळी का निवडली? आदामाच्या पतन पावलेल्या वंशापैकी तो आहे अशी ओळख देणे त्याने पसंत केले. यामध्ये आपल्याला त्याची लीनता व नम्रता दिसते. त्याने कौटुंबिक किंवा खानदानी गर्वाची अपेक्षा केली नाही.

येशूने स्वतःची ओळख मानव अशी दिली. सर्वसामान्य मानवाप्रमाणे तो जीवन जगला. अप्रतिष्ठित वंशात व कुटुंबामध्ये जन्म घेऊन तो आलासमाजात कमी प्रतिष्ठा असलेल्या कुटुंबात त्याने जन्म घेतला. तो सर्वांपेक्षा खालच्या दर्जाचा झाला. तो सर्वांचा दास झाला. अशी लीन व नम्रतेची मनोवृत्ती घेऊन येशूने पृथ्वीवर जन्म घेतला.

अनुवादक : विनोद टॊडॆ     छपाई फोर्मेट    तुमचा मित्राला पाठविणे
"सप्ताह का संदेश!" - आपके किसी भी प्रकार के सवाल या प्रतिक्रिया के लिए कृपया संपर्क करें /लिखे : marathi@cfcindia.com, cfc@cfcindia.com
तुमचा मित्राला पाठविणे | सप्ताह का संदेश | देविक लेख | संपर्क साधणे

© Copyright - Christian Fellowship Church , Bangalore. (INDIA)