English shape=

अठवडे ची संदेश - Word For The Week

"अठवडे ची संदेश" हे एक (इ—मेल) बातमीपत्र आहे जे इ- मेल द्वारे प्रत्येक आठवडयाला पाठविले जाते. प्रत्येक अंकामध्ये झॅक पुनेन यांचा लेख, पुस्तके, किंवा संदेशामधील उतारे आहेत. |
2010 |  2011 |  2012 |  2013
घरातील शिष्यत्व
मई 2012 (2) - जैक पूनन

शिष्य हा शिकणारा व प्रभु येशूचा अनुयायी असतो. त्याच्यापुढे येशू कित्ता असतो व तो शक्यतोपरीने येशूसारखे जीवन जगण्याचा प्रयत्न करितो. दानधर्माप्रमाणेच शिष्यत्वाची सुरुवात देखील घरातून होते.

येशूने 30 वर्षे नासरेथात घालविली असा बायबलमध्ये केवळ दोनच ठिकाणी उल्लेख आहे. इब्री 4:15 मध्ये आपल्याला सांगितले आहे की जशी आपली परीक्षा झाली तशी त्याची देखील झाली. जसे आपल्याला मोह आले तसे त्याला देखील आले. परंतु, त्याने पाप केले नाही. यावरून आपल्याला कळते की येशू नासरेथमध्ये तीस वर्षे असताना त्याने अनेक मोहांना तोंड दिले. 30 वयापर्यंत आपल्याला जे मोह असतात तेच मोह त्याला देखील झाले.

मार्क 6:3 मध्ये म्हटले आहे की येशूला जवळ जवळ चार भाऊ व दोन बहिणी होत्या. येशूच्या घरामध्ये 9 लाके होते. हे कुटूबं गरीब होते. लूक 2:24 व लेवीय 12:8 ची आपण तुलना केल्यास आपल्याला कळेल की मरीया मंदिरामध्ये कोकरा अर्पू शकली नाही. ह्याचाच अर्थ ती गरीब होती. घरामध्ये कठीण समस्या असताना येशूला एकांतवासाकरिता वेगळी खोली नव्हती. योहान 7:5 मध्ये म्हटले आहे की येशूच्या भावांचा त्याच्यावर विश्वास नव्हता. येशूला राग येत नव्हता किंवा तो स्वार्थी नव्हता म्हणून त्याच्या भावांना येशूचा हेवा वाटत होता. त्यांनी एकजुटीने येशूला चिडविले असेल किंवा त्रास दिला असेल. मोठ्या कुटुंबामध्ये मन परिवर्तन झालेले लोक नसतात तेव्हा जो त्रास होतो त्या त्रासाचा अनुभव येशूने नासरेथात असताना नक्कीच घेतला. तरी देखील त्याने पाप केले नाही. अशी दाट शक्यता आहे की येशू 20 वयाचा होण्यापूर्वीच योसेफ मरण पावला असावा कारण येशूच्या साडेतीन वर्षाच्या सेवेच्या काळात आपण योसेफाविषयी उल्लेख असलेला वाचत नाही. योसेफाच्या मरणानंतर आठ सदस्यांच्या कुटुंबाची जबाबदारी कुटुंबात थोरला असलेल्या येशूवरच येऊन पडली. कुटुंबाची रोजी रोटी मिळविण्याकरिता येशूला कष्ट करावे लागले. अशा परिस्थितीत येशूने पुष्कळ मोहांना तोंड दिले असेल. तरी देखील येशूने पाप केले नाही.

दुसरी गोष्ट येशू ''योसेफ व मरीयेच्या आज्ञेत राहिला'' (लूक 2:51). येशू तीस वर्षे घरामध्ये असताना तो पालकांच्या अधीन राहिला. हे सोपे नव्हते. आपल्या बालपणचे दिवस आपल्याला आठवतील व त्यावरून कळेल की आज्ञेत असणे व अधीन असणे तेवढे सोपे नाही. लहानपणी पुष्कळवेळा जी आपली करण्याची इच्छा असते ती पालकांची नसते किंवा पालक आपल्याला जे करण्यास सांगतात ते करण्याची आपली इच्छा नसते. आपण आपल्या सर्व लेकरांना येशूचे उदाहरण देऊ शकतो. वडिलांना आज्ञापिले आहे की त्यांनी आपल्या लेकरांना प्रभुच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवावे. ''बापानों, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणांत त्यांना वाढवा'' (इफिस 6:4). प्रभुची शिस्त व शिकवण काय आहे? याविषयीचा कित्ता येशूने तो नासरेथमध्ये असताना आपल्यापुढे ठेवला.

वरील दोन क्षेत्रांमध्ये लेकरांनी येशूचा कित्ता घेतला व त्याचे अनुसरण केले तर लेकरे सुद्धा देवाच्या ज्ञानात वाढतील व देवाच्या पसंतीस उतरतील. येशूच्या आज्ञापालनाविषयी व विकासाविषयी लूक 2:52 मध्ये लिहिले आहे.

अनुवादक : विनोद टॊडॆ     छपाई फोर्मेट    तुमचा मित्राला पाठविणे
"सप्ताह का संदेश!" - आपके किसी भी प्रकार के सवाल या प्रतिक्रिया के लिए कृपया संपर्क करें /लिखे : marathi@cfcindia.com, cfc@cfcindia.com
तुमचा मित्राला पाठविणे | सप्ताह का संदेश | देविक लेख | संपर्क साधणे

© Copyright - Christian Fellowship Church , Bangalore. (INDIA)