|
ज्या घरात शांती असते त्या घरामध्ये देव राहतो. येशूने त्याच्या शिष्यांना वेगवेगळ्या ठिकाणी सेवा करण्यास व राज्याची घोषणा करण्यास पाठविले तेव्हा लूक 10:5-7 मध्ये येशूने सांगितले की त्यांनी त्यांचे स्वागत करणारे घर पाहावे. असे घर लक्षात आल्यावर त्यांनी त्या घरी राहावे दुसर्याा घरी राहू नये. असे येशूने का म्हटले? कारण त्याला माहीत होते की गावामध्ये फार थोड्या घरांमध्ये शांती असेल व तेच घर स्वागत करील.
ज्या घरात भांडण नाही त्या घरात देव राहतो. कोणत्या विषयावर नवरा बायको जास्त प्रमाणात भांडतात? भौतिक व जगिक गोष्टींविषयी ते अधिक भांडतात. जगामध्ये बर्यााच गोष्टी असुरळीत असणारच. परंतु, या गोष्टींपेक्षा पाप घडणे अधिक गंभीर आहे. इतर सर्व गोष्टी दुय्यम किंवा कमी महत्वाच्या आहेत. माझी आशा आहे की सर्व दाम्पत्यांना स्पष्टपणे कळावे की केवळ पाप गंभीर आहे. जर नवरा बायकोमध्ये कटूत्व आले व जगिक समस्येंमुळे त्यांनी एकमेकांसोबत बोलणे बंद केले तर देवाला फार वाईट वाटते. मी तुम्हाला याविषयीचे थोडे ज्ञान सांगू इच्छिता!े पापाचा द्वष्े ा करा कारण पापच वैवाहिक जीवनाचा नाश करू शकत.े लक्षात ठवे ा की घर किंवा कुटूबं दवे ासाठी पवित्र असाव.े
जर काण्े ात्या गाष्े टीमुळे कुटुंबामध्ये अशांती उत्पन्न हाते असले तर ते घर किंवा कुटूबं पवित्र राहणार नाही.
आपण् ा जे काही करतो ते करीत असताना आपण पुढीलप्रमाणे म्हणावे अशी माझी आशा आहे, ''प्रभु, लोक खुश होतील का ह्याचा आम्ही विचार करीत नाही; परंतु, तुला आनंद वाटेल का ह्याचा आम्ही विचार करतो. तुला दुःख देणारी कोणती गोष्ट आमच्या जीवनात, विचारात व वृत्तीत असेल तर ती आम्हाला कळीव. आमच्या घरात आम्ही आनंदी राहू इच्छितो. हा प्रश्न विचारून आम्ही आमच्या जीवनाचे परीक्षण करू इच्छितो, 'यामुळे देवाला आनंद वाटेल का?' '' त्यामुळे आपल्या घराची स्थिती काय होईल असा आपण विचार करावा. विशिष्ट गोष्ट केल्यावर आपल्याद्वारे देवाचे गौरव घडून येईल का? आपल्या घराद्वारे लोक जिवंत देवाकडे येतील का?
कुटुंबामध्ये शांती प्रस्थापीत होण्याकरिता जे पतीपत्नी आपला हक्क त्यागण्यास तयार असतात त्या घरामध्ये देव राहतो. एक दाम्पत्य ट्रेनने प्रवास करणार होते व ट्रेनची वेळ झाली होती. ते माझ्याकडे आले व मला म्हणाले, ''बंधू झॅक, दोन मिनिटांत तुम्ही आम्हाला बोध कराल का?'' मी म्हटले, ''होय नक्कीच. एकमेकांची क्षमा मागण्यास नेहमी तयार असा. एकमेकांना क्षमा करण्यास तयार असा.'' जर आपण एकमेकांची क्षमा मागण्यास तयार असलो तर आपण लगेच एकमेकांची क्षमा करू शकू. असे केल्यास मी लीखीत खात्री देतो की आपल्या घरामध्ये रोज शांती प्रस्थापीत राहील.
या गोष्टीत आपण फार संवेदनशील असावे. जर आपल्या पायात काटा टोचला तर आपण एक सेकंद देखील तो पायात राहू देत नाही. त्याचप्रमाणे आपल्या अंतःकरणामध्ये गडबड झाल्यास ती लगेच काढून टाकावी. ती काट्याप्रमाणे आपल्या अंतःकरणात जखम करून आपला नाश करेल. पायातील काट्यापेक्षा हृदयातील काट्यामुळे मोठे नुकसान होईल. कोणत्याही परिस्थितीत शांती मिळविण्याचा प्रयत्न करा. शांतीच्या मोबदल्यात पैसा किंवा काहीही द्यावे लागले तरी त्यापेक्षा शांती महत्वाची आहे. प्रत्येक पतीपत्नीने शांती व पैशाचे वजन करताना लक्षात ठेवावे की शांती पैशापेक्षा वजनी व महत्वाची आहे.
घरी काही चूक झाली किंवा काही बिघडले तर, किंवा अन्न जळले तर हरकत नाही. अन्न जळाल्यामुळे एकवेळेस आपण जेवलो नाही तर चालेल त्यामुळे आपण निरोगी राहू व आत्मिक दृष्टीने आपली वाढ होईल. परंतु अन्न जळाले म्हणून आपण निराश झालो किंवा चिडलो तर समजून घ्यावे की सैतानाने विजय मिळविला आहे.
देवाने स्थापन केलेल्या पहिल्या कुटुंबाचे काय झाले ह्याची आठवण करा. आदाम व हव्वेच्यामध्ये येण्याचा सैतान प्रयत्न करीत होता. त्यात सैतान यशस्वी झाला. ईयोब व त्याच्या पत्नीच्यामध्ये येण्यात सैतान यशस्वी झाला. इसहाक व रिबेकाच्यामध्ये देखील येण्यात सैतान यशस्वी झाला. पती व पत्नीच्यामध्ये सैतानाने यावे अशी देवाची इच्छा नाही.
|