|
देवाच्या लोकांची स्थिती त्यांच्या पुढार्यांेच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. आजच्या ख्रिस्ती समाजात अनेक पुढारी देवाच्या लोकांना सरळ व अरूंद वाटेवर नेण्यास समर्थ नाहीत, कारण स्वतः पुढार्यांाना देवाची ओळख झालेली नाही व ते तडजोड करीत राहतात. ते लोकांना खुश
करण्याचा प्रयत्न करितात. ते अहरोनाप्रमाणे प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करितात. म्हणून देवाला त्यांचे पुढारीपण मान्य नाही. मोशे व यहोशवाने प्रसिद्ध होण्याचा कधीही विचार केला नाही.
''यहोशवाच्या हयातीत आणि यहोशवाच्या मरणानंतर जिवंत राहिलेल्या ज्या वडील लोकांनी परमेश्वराने इस्राएलासाठी केलेली महान कार्ये पाहिली होती, त्यांच्या हयातीत लोकांनी परमेश्वराची सेवा केली'' (शास्ते 2:7). परंतु, यहोशवा व त्याच्यासोबतचे वडीलजण मरण पावल्यावर त्यांची जागा भरून काढणारे देवभिरू लोक उपलब्ध नव्हते. म्हणून ''ती सर्व पिढी पूर्वजांस मिळाल्यानंतर जी नवी पिढी उदयास आली तिला परमेश्वराची आणि त्याने इस्राएलासाठी केलेल्या कार्याची ओळख राहिली नव्हती'' (शास्ते 2:10). देवाला ओळखणारा कोणीही नव्हता.
अअनेक वर्षे मी ख्रिस्ती गटांमध्ये फिरून आल्यावर मी असे म्हणतो की फार थोड्या ख्रिस्ती पुढार्यांेना खर्याम रीतीने देवाची ओळख झाली आहे व एलीयाप्रमाणे ते म्हणू शकतात, ''मी प्रभु देवापुढे उभा राहतो.'' आज ख्रिस्ती समाजामध्ये अनेक लोक व्यवसायी वक्ते आहेत. ते बायबलचा अभ्यास करतात, पदवी मिळवितात, आथिर्क सहाय्य करणारे शाध्तात आणि मग दवेाची सवेा करण्यासाठी बाहरे पडतात. त्याच्ं या जीवनामध्ये
थोड्या प्रमाणात समर्पण व सेवेकरिता उत्साह दिसेल; परंतु, उत्साह, समर्पण व ज्ञान उपयोगी ठरत नाही कारण त्या व्यक्तीला देवाची ओळखच झालेली नसते. त्यांच्या सेवेची आकडेवारी व अहवाल प्रभावी असेल परंतु, त्यांच्या द्वारे परिवर्तित झालेल्यांची गुणवत्ता हलक्या प्रतीची भरेल कारण त्यांनी देखील खर्यात रीतीने देवाला ओळखलेले नसते. ते म्हणतील की ते त्यांच्या मंडळीमध्ये नवीन जन्म झालेले विश्वासणारे आहेत परंतु, हे विश्वासणारे येशूचे शिष्य आहेत का? आत्मिक विश्वासणारे व दैहिक विश्वासणारे ह्यांच्यात मोठी भिन्नता आहेदेवाच्या कोणत्याही माणसाला माहीत आहे की जगिक मनोवृत्ती असलेल्या लोकांच्या मोठ्या मंडळीपेक्षा आत्मिक विश्वासणार्यांीची लहान मंडळी उत्तम असते. असे म्हणता येईल, झिरो वॅटच्या शंभर बल्बपेक्षा हजार वॅटचे कमी बल्ब पुरेसे असतात.
आपण् जगाचा प्रकाश असावे. आपण देवाला किती ओळखतो यावर आपल्या प्रकाशाची तीव्रता अवलंबून आहे. जर पुढारी देवाला ओळखत नाही तर लोक सुद्धा देवाला ओळखणार नाही. तुम्ही बायबलचा अभ्यास कराल व मंडळीमध्ये शिकवाल तेव्हा त्यांना बायबलचे ज्ञान होईलवर्गामध्ये रसायनशास्त्र शिकविण्याप्रमाणे हे आहे. बायबल शिकविल्याने देवाची ओळख होईलच असे नाही. बायबलमधील माहितीमुळे देवाचे ज्ञान होते असे नाही. तुम्ही संकटातून व परीक्षेतून जात असता तुम्हाला देवाची ओळख होते. परीक्षेंमध्ये व छळामध्ये तुम्हाला नम्र व्हावे लागते व अंतःकरण देवाला समर्पित करावे लागते. अशाप्रकारे तुम्ही देवाला ओळखू शकता. सभेमध्ये बसून देवाची ओळख होत नाही. पवित्र शास्त्राचे
ज्ञान असणे महत्वाचे आहे. परंतु त्यापलीकडे जाऊन आपल्याला देवाची ओळख होणे गरजेचे आहे. ''जे लोक आपल्या देवास ओळखितात ते बलवान हाऊे न थारे कृत्ये करितील'' (दानीएल 11:32). इस्राएली लाकेानंी दवेाला आळे खले नव्हते म्हणून, ''त्यांनी दवे ाच्या दृष्टीने जे वाईट ते केले व मूर्तिपूजा केली'' (शास्ते 2:11). कारण यहोशवाच्या मृत्युनंतर त्यांचे नेतृत्व करण्याकरिता देवभिरू पुढारी नव्हता.
2000 वर्षांच्या ख्रिस्ती इतिहासामध्ये देवाने असंख्य थोर पुरुषांची निवड केली, ज्यांनी मंडळ्या रोपल्या व संजीवन घडवून आणले. त्यांच्या मृत्युनंतर मंडळ्यांची अधोगती होत गेली व सेवा थंडावली. नवीन पिढी देखील आपल्या पूर्वजांच्या सिद्धांताप्रमाणे वागते व पवित्रीकरणाचे तेच शास्त्र उपयोगी आणते. परंतु, नवीन पिढी ही होऊन गेलेल्या त्यांच्या पुढार्यांरप्रमाणे पवित्र नाही. त्यांच्यापैकी अनेक लोक दावा करितात की होऊन गेलेल्या त्यांच्या पुढार्यांढचा जसा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा झाला तसा ह्यांचाही झाला आहे. परंतु, ह्यांच्या जीवनावर व सेवेवर तोच अभिषेक नाही. काही उणीव आहे. मग देव नवीन व्यक्तीला उभे करून नवीन कार्य सुरू करतो.
देवाने नेहमीच त्याच्या मंडळीमध्ये मोठे कार्य केले आहे. हे मोठे कार्य त्याने नवीन ठिकाणी, नवीन लोकांना उभे करून सुरू केले. अशा व्यक्तीच्या सभोवती देव असे थोडे लोक उभे करतो ज्यांना संख्येपेक्षा गुणवत्तेची काळजी असते. त्यांना त्यांच्या पिढीमध्ये देवाकरिता पवित्र साक्ष हवी असते. माझा विश्वास आहे की मंडळीला अशा अनेक स्त्रियांची व पुरुषांची गरज आहे.
|