|
''ख्रिस्तानें मंडळीवर प्रीति केली आणि स्वतःस तिच्यासाठीं समर्पण केले'' (इफिस 5:25). मंडळी स्थापन करण्याकरिता आपली मंडळीवर तेवढी प्रीती असावी जशी येशूची मंडळीवर होती. मंडळी स्थापन करण्याकरिता पैसा किंवा वेळ देणेच पुरे नाही. आपण स्वतःचे जीवन मंडळीकरिता
अर्पण करावे.
मानवावरील स्वतःची प्रीती मानवाला प्रकट करावी असे देवाला वाटले तेव्हा त्याने त्याच्या प्रीतीचे उदाहरण जगातील केवळ एका व्यक्तीच्या प्रीतीविषयी सांगून दिले - आईची तिच्या नवजात जन्मलेल्या बाळावरील प्रीती (पहा यशया 49:15). तुम्ही आईकडे बघाल तर तुम्हाला दिसेल
की बाळावरील तिची प्रीती अर्पणाच्या आत्म्याने भरलेली असते. अगदी पहाटेपासून ते उशीरा रात्रीपर्यंत व संपूर्ण रात्र आपल्याला आईचे समर्पण, समर्पण व समर्पणच पहायला मिळते. आपल्याला तिचे बाळाप्रती समर्पण बघायला मिळते. त्या मोबदल्यात आईला काहीही मिळत
नाही. बाळासाठी ती वर्षानुवर्षे आनंदाने दुःख व त्रास सहन करीत राहते व मोबदल्यात कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करीत नाही. आपल्यावरील देवाची प्रीती अशाचप्रकारची आहे आणि हा स्वभावगुण आपल्यात असावा असे त्याला वाटते. प्रामाणिकपणे सांगायचे तर जगामध्ये सहभागितेत
एकमेकांवरील अशाप्रकारची प्रीती आपल्याला मुळीच पहायला मिळत नाही. अनेक विश्वासणारे केवळ त्याच लोकांवर प्रीती करू शकतात जे त्यांच्याशी सहमत आहेत व त्यांच्या गटात आलेले आहेत. त्यांची प्रीती मानवी आहे. आईच्या समर्पणाच्या प्रीतीपेक्षा ती फार वेगळी आहेआपण् ा दैवी प्रीती मिळविण्याचे ध्येय बाळगावे व त्याकरिता झटावे.
आजूबाजूचे लोक तिच्या बाळाप्रती समर्पित आहेत किंवा नाहीत याविषयी आई पर्वा करीत नाही. ती स्वतः आनंदाने सर्व काही अर्पण करिते. त्याचप्रमाणे जी व्यक्ती स्वतःच्या मंडळीकडे बाळ म्हणून बघते ती या गोष्टीची पर्वा करणार नाही की आजूबाजूचे लोक मंडळीकरिता समर्पित
आहेत किंवा नाहीत. ही व्यक्ती आनंदाने स्वतःला समर्पित करेल, कुरकुर करणार नाही किंवा मोबदल्यात काही मागणार नाही. इतर लोक मंडळीप्रती समर्पित नाही अशी तक्रार किंवा कुरकुर करणारी व्यक्ती आई नसून दायी आहे. दायांच्या कामाची वेळ ठरविलेली असते. दुसर्याु
आठ तासाच्या पाळीची दायी वेळेवेर आली नाही तर ती दायी कुरकुर करू लागते.
परंतु, आई एका दिवसाला केवळ आठच तास काम करीत नाही. ती रोज चोवीस तास वर्षानुवर्षे काम करीत राहते. त्याकरिता तिला पगार मिळत नाही. बाळ 20 वर्षांचे झाल्यावर देखील आईचे काम सुरूच राहते. आईपासून नवजात बाळाला रोज दूध मिळते. दायी बाळांना दूध देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे जे लोक मंडळीमध्ये आईप्रमाणे आहेत त्यांच्याकडे नेहमी आत्मिक लेकरांकरिता वचन असते. अनेक वडील जनांकडे मंडळीकरिता वचन नसते कारण ते दायी आहेत, आई नाही.
आई बाळाकडून पगाराची अपेक्षा करीत नाही. कोणतेही बाळ आईला तिच्या काळजीबद्दल मोबदला देऊ शकत नाही. आईने केलेल्या सेवेकरिता आईला किती द्यावे याविषयीचा हिशेब केल्यास रुपये 20 प्रति तासाप्रमाणे 20 वर्षांपर्यंतचे रु.3 दशलक्ष होतील. (रुपये 20 प्रति तास हे दायीचे वेतन आहे). लेकरे आईला रुपये तीन दशलक्ष एवढी रक्कम देऊ शकत नाही. कोण देऊ शकेल?
आता एक प्रश्न आपल्यापुढे येतो : अशाप्रकारे प्रभुकरिता व मंडळीकरिता सेवाकार्य करण्यास कोण तयार आहे? मोबदल्यात काहीही न घेता सेवेकरिता स्वतःचे समर्पण करण्यास कोण तयार आहे? निस्वार्थीपणे येशूच्या परत येण्यापर्यंत वर्षानुवर्षे येशूची व त्याच्या मंडळीची सेवा
करण्यास कोण तयार आहे? जर देवाला एखादी व्यक्ती मिळाली तर देव त्या व्यक्तीचा मंडळीरोपणाकरिता इतका मोठा उपयोग करून घेईल की अर्ध्या मनाने व समर्पणाचा आत्मा नसताना सेवा करणार्यात दहा हजार विश्वासणार्यांीना देखील तेवढी करता येणार नाही.
येशू पृथ्वीवर परत येईल व तुम्ही त्याच्यापुढे उभे व्हाल तेव्हा तुम्ही जीवनाविषयी सबब सांगाल की मनात खात्री बाळगाल की आजीवन तुम्ही देवाच्या राज्याकरिता आपले जीवन समर्पण केले आहे? अनेक लोक पृथ्वीवरील त्यांचे जीवन व्यर्थ घालवीत आहेत. उशीर होण्यापूर्वी जागे व्हा. देवाला विनंती करा की त्याचा मार्ग समर्पणाचा आहे ही गोष्ट त्याने तुम्हाला कळू द्यावी. ज्याला कान आहेत तो ऐको.
|