English shape=

अठवडे ची संदेश - Word For The Week

"अठवडे ची संदेश" हे एक (इ—मेल) बातमीपत्र आहे जे इ- मेल द्वारे प्रत्येक आठवडयाला पाठविले जाते. प्रत्येक अंकामध्ये झॅक पुनेन यांचा लेख, पुस्तके, किंवा संदेशामधील उतारे आहेत. |
2010 |  2011 |  2012 |  2013
पवित्र आत्म्याचे दान
फरवरी 2012 (2) - जैक पूनन

ख्रिस्ताच्या शरीराची रचना करण्यासाठी आत्मिक दानांची आवश्यकता आहे. नवीन करारात आत्मिक दानांच्या तीन याद्या दिलेल्या आहेत (1 करिंथ 12:8-10; रोम 12:6-8 आणि इफिस 4:11).

1 करिंथ 12:12-26 मध्ये आत्मिक दानांची तुलना शरीराच्या अवयवांसोबत केली आहे. एखादा मनुष्य आंधळा, मुका, बहिरा किंवा पक्षघाती असूनही जीवन जगू शकतो. अनेक मंडळ्या अशाप्रकारच्याच आहेत. त्यातील सभासदांचा नवीन जन्म झालेला आहे; परंतु, देवाची सेवा करण्याकरिता त्यांच्याकडे पवित्र आत्म्याची दाने नसल्यामुळे ते अशक्त आहेत.

पवित्र आत्म्याच्या दानांमुळे ख्रिस्ताचे शरीर पाहू शकते, ऐकू शकते, बोलू शकते व चालू शकते. दैवीपण हे ख्रिस्ताच्या शरीराचे जीवन आहे. आत्म्याची दाने नसता ख्रिस्ताचे शरीर काय करेल? जर ख्रिस्तामध्ये आत्म्याची दाने नसती तर ख्रिस्ताने काय केले असते? त्याने पापावर विजय मिळवून पवित्र जीवन जगले असते. परंतु, पवित्र आत्म्याचा अभिषेक झाल्याशिवाय त्याने ज्याप्रकारे शिकविले, रोग बरे केले, भुते काढले व चमत्कार केले तसे त्याला करता आले नसते.

तिसाव्य ा वयात येशू ख्रिस्ताचा पवित्र आत्म्याद्वारे अभिषेक झाला, तो अभिषेक येशूला अधिक पवित्र करणारा होता असे नाही. येशू 29 व्या वयात व 31 व्या वयात पूर्ण रीतीने पवित्र होता. परंतु, पवित्र आत्म्याचा अभिषेक झाल्यावर त्याला इतरांची सेवा करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले. जर येशू ख्रिस्त केवळ आपली पवित्रता मिरवीत फिरला असता तर त्याच्या जीवनातून पित्याचा उद्देश पूर्ण झाला नसता. मंडळी देखील इतरांना केवळ पवित्रताच दाखवीत राहिली तर मंडळीकडून देवाचे उद्देश पूर्ण होणार नाहीत. येशूमध्ये पवित्रता होती व त्याचबरोबर आत्म्याची दाने देखील होती. आज त्याच्या शरीरात देखील तसेच असावे.

आजच्य ा ख्रिस्ती जगामध्ये काही गट जीवनातील पवित्रतेवर जोर देतात तर काही लोक आत्म्यांच्या दानांवर जोर देतात. परंतु, या दोन्ही गोष्टी पर्यायी नाहीत. बायबल सांगते, ''तुझी वस्त्रे सदा शुभ्र असोत (सर्वदा पवित्र जीवन जगणे); तुझ्या डोक्याला तेलाची वाण नसो (सतत अभिषेकाखाली जीवन जगणे)'' (उपदेशक 9:8). दोन्हींची आपल्याला गरज आहे.

पवित्र आत्म्याची दाने कोणाला अधिक आत्मिक करतात असे नाही. करिंथ येथील ख्रिस्ती लोकांमध्ये सर्व प्रकारची आत्म्याची दाने होती (1 करिंथ 1:7). त्यांच्या सभेंमध्ये ते ज्ञानाच्या वचनांचा उपयोग करीत असत. हे देखील आत्म्याचे दान होते. तरी देखील त्यांच्यामध्ये एकही ज्ञानी व आत्मिक पुरुष नव्हता (1 करिंथ 6:5). ज्ञानाचे वचन दैहिक व्यक्तीच्या द्वारे प्राप्त होऊ शकते; परंतु, दैवी ज्ञान हे केवळ आत्मिक व्यक्तीमध्येच आढळते. एखाद्याला देवाकडून ज्ञानाचे वचन प्राप्त होऊ शकते. परंतु अनेक वर्ष वधस्तंभ वाहिल्यावरच दैवी ज्ञान प्राप्त होते.

आपली आत्म्याची दाने आपण स्वतः निवडू शकत नाही. परंतु, ख्रिस्ताच्या शरीरामध्ये सेवा करता यावी म्हणून आपल्याकरिता कोणते दान योग्य आहे ते केवळ देवाला माहीत आहे. ख्रिस्ताचे शरीर उभारल्या जाईल अशा दानांची आपण अपेक्षा करावी असे आपल्याला सांगितले आहे. आपण भविष्यवाणीच्या दानाची अपेक्षा करावी (1 करिंथ 14:1-12).

अनुवादक : विनोद टॊडॆ     छपाई फोर्मेट    तुमचा मित्राला पाठविणे
"सप्ताह का संदेश!" - आपके किसी भी प्रकार के सवाल या प्रतिक्रिया के लिए कृपया संपर्क करें /लिखे : marathi@cfcindia.com, cfc@cfcindia.com
तुमचा मित्राला पाठविणे | सप्ताह का संदेश | देविक लेख | संपर्क साधणे

© Copyright - Christian Fellowship Church , Bangalore. (INDIA)