English shape=

अठवडे ची संदेश - Word For The Week

"अठवडे ची संदेश" हे एक (इ—मेल) बातमीपत्र आहे जे इ- मेल द्वारे प्रत्येक आठवडयाला पाठविले जाते. प्रत्येक अंकामध्ये झॅक पुनेन यांचा लेख, पुस्तके, किंवा संदेशामधील उतारे आहेत. |
2010 |  2011 |  2012 |  2013
खर्या् ख्रिस्ती सहभागितेचे मोल करणे
जनवरि 2012 (5) - जैक पूनन

अनेक विभिन्न क्षेत्रामध्ये मानवाने प्रगती केली असताना जगातील प्रत्येक भागात आपसातील संबंधांमध्ये समस्या आहेत. अनेक उद्योजक संस्था व सेवा संस्था आपल्या कर्मचार्यां मध्ये स्नेहसंबंध असावे म्हणून अतोनात पैसा खर्च करीत आहेत. कोणी विचार करेल की स्वार्थी व अपरिवर्तीत लोकांमध्ये या समस्या सर्वसामान्य आहेत; परंतु, नवीन जन्म पावलेल्या व ख्रिस्तात नवी उत्पत्ती झालेल्या लोकांमध्ये या समस्या नसाव्यात. कारण आपल्या जीवनाच्या व सेवेच्या केंद्रस्थानी देव असतो तेव्हा अशा समस्यांना जागाच उरायला नको, नाही का?

परंतु, तरी देखील शोकांतीका ही आहे की ख्रिस्ती लोक देखील आपसात भांडणे करतात. ख्रिस्ती लोकांतील हे भांडणे जगात सर्वत्र आहे ह्याचा पुरावा देण्याची गरज नाही. अनके लाके एकमके ांशी बाले त नाहीत. काही लोक तर समोरासमोर येत नाहीत. अशा रीतीने वागणार्या. विश्वासणार्यांंमुळे दवे ाच्या नावाची जगामध्ये निर्भत्सना होत आहे. येशूने म्हटले की एकमेकांवरील प्रेमाचा गुणधर्म पाहून लोक ओळखतील की आपण येशूचे शिष्य आहोत. ही गोष्ट पहिल्या दोन शतकांमध्ये दिसून आली. जगातील लोक ख्रिस्ती लोकांकडे मोठ्या आश्चर्याने व कुतुहलतेने पाहत असत व म्हणत असत, ''पाहा, हे खिस्र् ती लाके एकमके ावं र पी्र ती करितात''. आज परिस्थिती बदलली आह.े आज लाके म्हणतात, ''पाहा, हे खिस्र् ती लाके एकमके ाचं ा द्वष्े ा करितात.''

आपसातील संबंध खरोखर महत्वाचे आहेत. कलागुण, दान, कौशल्ये, कार्यक्रम व निधी या सर्व गोष्टी दुय्यम आहेत. लोक व त्यांचे आपसातील संबंध अधिक महत्वाचे आहेत. मंडळी देवाने सोपविलेले कार्य जगाचा प्रकाश होऊन तेव्हाच पूर्ण करू शकते जेव्हा मंडळीतील सभासदांमध्ये आपसात खरोखर प्रेमाची सहभागिता राहील. विश्वासणारा जीवनामध्ये तेव्हाच सेवाकार्य करू शकेल जेव्हा तो इतरांसोबत प्रेमाने वागेल.

बाय बल सरळपणे व स्पष्टपणे शिकविते की जावे र आपले इतरांसोबत व इतर विश्वासणार्यांेसाबे त चागं ले सबं ंध राहणार नाहीत तोवर आपली दवे ासाबे त सहभागिता राहू शकत नाही. जर आपण आपल्या सोबत्यासोबत प्रीतीने चालू शकत नाही तर आपण देवासोबत देखील चालू शकणार नाहीत. ख्रिस्ताला ज्या वधस्तंभावर टांगण्यात आले होते तो वधस्तंभ आडव्या व उभ्या अशा दोन खांबांनी तयार करण्यात आला होता. येशू केवळ देवात व मानवातच समेट घडवून आणण्याकरिता आला नाही (उभा खांब) तर मानवा मानवात आपसात समेट घडवून आणण्याकरिता देखील आला (आडवा खांब). उभे व आडवे दोन्हीही संबंध सोबत असावेत. एक संबंध नसेल तर दुसराही राहणार नाही. आडवे संबंध नसतील तर उभेही राहणार नाही

प्रीतीचा प्रेषित योहान ह्याने याविषयी जोर देऊन म्हटले आहे. एका प्रसंगी तो म्हणाला की विश्वासणार्यांखमध्ये आपसात प्रेमाचे संबंध असतात तेव्हाच समजावे की खरे परिवर्तन घडून आले आहे. आपल्या ठायी प्रीती नसली तर ओळखावे की खरे परिवर्तन घडून आलेले नाही व आपण सार्वकालिक मरणाच्या वाटेवरच आहोत (1 योहान 3:14). आपले देवासोबत संबंध नीट आहे किंवा नाही हे बघण्याकरिता प्रेषितांनी केवळ सिद्धांताचीच पारख केली नाही तर योहानाने त्याच्या पत्रात पुढे म्हटले आहे की एखादी व्यक्ती आपल्या भावाचा द्वेष करिते व म्हणते की ती देवावर प्रीती करीत आहे तर ती लबाड बोलते. याकडे लक्ष द्या. अशा माणसाला विश्वासणारा म्हणू नये तर लबाड म्हणावे. योहानाचे म्हणणे अगदी बरोबर आहे. योहान म्हणतो की आपला भाऊ आपल्याला दिसतो परंतु देव दिसत नाही. आणि जर तुम्ही दिसणार्याआ आपल्या भावावर प्रीती करू शकत नाही तर न दिसणार्या वर प्रीती करणे अशक्य आहे (1 योहान 4:20).

तुम्ही ह्याची तुलना विश्वासणार्यांवच्या अनुभवासोबत करा. ख्रिस्ती व्यस्त सेवाकार्य किंवा एखाद्या सभेमधील उफाळून आलेल्या भावना यांनाच देवावरील प्रेम समजल्या जाते. परंतु, या गोष्टीमुळे फसवणूक होऊ शकते. मी असे काही विश्वासणारे बघितले आहेत जे ख्रिस्ती लोकांच्या सहभागितेत नसतात; परंतु, प्रार्थनेत पुष्कळ वेळ घालवितात व दिसून येणारी परिणामकारक सेवा करितात. त्यांनी देवाच्या कुटुंबामधील इतर सदस्यांसोबत समेट केलेला नसताना ते देवासोबत चालू शकणे कसे शक्य आहे? नक्कीच सैतानाने त्यांचे मन देवाच्या सत्य वचनाप्रती आंधळे केले आहे.

जव्े हा आपण इतर विश्वासणार्यां पासनू वगे ळे हाते ो तव्े हा आपल्याला स्वतःची स्थिती कळत नाही. बायबल आपल्याला सांगते की जेव्हा आपण इतर संत जणांबरोबर किंवा विश्वासणार्यां्बरोबर सहभागितेत असतो तेव्हा आपल्याला ख्रिस्ताच्या प्रीतीची, लांबी, रूंदी, खोली व उंची कळते व आपण देवाच्या अद्भुत गोष्टींनी ओतप्रोत होतो (इफिस 3:17-19). जेव्हा आपली इतर विश्वासणार्यांीसोबत खरी सहभागिता असेल तेव्हाच आपल्याला ख्रिस्ताची प्रीती प्रात्यक्षिक रूपाने कळेल व आपण देवाच्या अद्भुत गोष्टीने ओतप्रोत होऊ

जेव्हा एखादी व्यक्ती ख्रिस्ती सहभागितेपासून स्वतःला दूर करिते तेव्हा ती ख्रिस्ताच्या प्रीतीपासून व कृपेपासून वंचित होते. कारण इतर ख्रिस्ती व्यक्तीच्या सहभागितेतून आपल्याला ख्रिस्ताची प्रीती व कृपा अनुभवण्यास मिळू शकते. जेव्हा आपण प्रीतीच्या नियमाने जगण्यात अपयशी होतो तेव्हा आपण ख्रिस्ती समृद्धीपासून व देवाच्या विपुलतेपासून वंचित राहतो

अनुवादक : विनोद टॊडॆ     छपाई फोर्मेट    तुमचा मित्राला पाठविणे
"सप्ताह का संदेश!" - आपके किसी भी प्रकार के सवाल या प्रतिक्रिया के लिए कृपया संपर्क करें /लिखे : marathi@cfcindia.com, cfc@cfcindia.com
तुमचा मित्राला पाठविणे | सप्ताह का संदेश | देविक लेख | संपर्क साधणे

© Copyright - Christian Fellowship Church , Bangalore. (INDIA)