English shape=

देविक लेख - ARTICLES

हया काळाची गरज लक्षात घेवून काही वर्षांच्या कालावधीमधील प्रत्यक्ष अनुभवातून लिहीलेले लेख आहेत.
Other Articles List
खरे सत्य — झॅक पूनन


अनुक्रमणिका

1) सैतानाविषयीचे खरे सत्य ... 1

2) पापाविषयीचे खरे सत्य ... 8

3) सद्सद्विवेकबुध्दी विषयीचे खरे सत्य ... 13

4) क्षमेविषयीचे खरे सत्य ... 16

5) पश्चातापाविषयीचे खरे सत्य ... 21

6) विश्वासाविषयीचे खरे सत्य ... 27

7) तारणाविषयीचे खरे सत्य ... 31

8) अनंतकाळाविषयीचे खरे सत्य ... 37

सैतानाविषयीचे खरे सत्य

सैतानाविषयीचे गूढ जाणून घेण्याचा जगातील बर्‍याच लोकांनी प्रयत्न केला. हे गूढ महान रहस्य आहे. देव हा सर्वज्ञानी व चांगला आहे. अशा देवाने निर्माण केलेल्या जगामध्ये हा सैतान कोठून आला? जगातील प्रत्येक भागावर वाईट गोष्टीला प्रथम स्थान का आहे? सर्वच ठिकाणी आजार, गरीबी, दुःख व यातना का आहेत? आपल्याला मदत करण्यास परमेश्वर तयार नाही का? असे अनेक प्रश्न आहेत व त्यांना उत्तर देण्याची नितांत गरज आहे. पवित्र शास्त्र आपल्याला या सर्वांची उत्तरे देते.

या विषयी अधिक विचार करण्याअगोदर देवासंबंधी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांची स्पष्ट कल्पना आपण करून घेऊ.

देव हा अनादी अनंत असा देव आहे. त्याला आरंभ नाही. युगाविषयी जे आपल्याला समजते, त्याही पलीकडे अमर्याद अशा काळापासून तो अस्तित्वात आहे. हे समजण्यास जरा कठीण आहे. कारण आपले मन हे मर्यादित आहे. ते अमर्यादित परमेश्वराचे ज्ञान समावून घेऊ शकत नाही. ज्याप्रमाणे कपामध्ये समुद्र भरता येत नाही त्याप्रमाणे!

पवित्र शास्त्रातील अगदी पहिल्या वचनाची सुरूवात अशी आहे — (उत्पत्ती 1:1) प्रारंभी देवाने, आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली देव हा अनादी काळापासून अस्तित्वात आहे याचे स्पष्टीकरण पवित्र शास्त्रात करण्याचा प्रयत्न केला नाही. तो अनादी काळापासून अस्तित्वात आहे. ही सत्य घटना आहे. एवढेच पवित्र शास्त्रात सांगितले आहे.

पवित्र शास्त्रामध्ये देवाविषयी असे प्रकट केले की देव मानवाबरोबर वैयक्तिक नाते ठेवण्याची इच्छा करणारा असा एकच देव आहे. व्यक्तिला जसे आपण पाहून ओळखू शकतो त्याप्रमाणे देवाला ओळखू शकत नाही. कारण देव हा आत्मा आहे. सर्व बाबतीत तो अमर्यादित आहे. त्याचा स्वभाव कधी न बदलणारा आहे. तो सर्व शक्तिमान, सर्वज्ञ, सर्वव्यापी व अतीज्ञानी आहे. तो प्रेमळ व अतिशुध्द आहे.

देवाचे अमर्याद प्रेम हे सर्वस्वी निस्वार्थी प्रेम आहे. आपल्या आनंदात व सुखात इतरांना सहभागी करण्याची त्याची अगदी सुरूवातीपासून इच्छा होती.

म्हणूनच त्याने सजीव सृष्टी निर्माण केली. अगदी सुरूवातीला त्याने लाखो देवदूतांना निर्माण केले. यासाठी की, त्याचे गौरव व सुख यांचे त्यांनी वाटेकरी व्हावे. मनुष्यप्राण्याला निर्माण करण्यापूर्वी फार पूर्वी त्याने हे केले.

या सर्व देवदूतामध्ये एकाला त्याने प्रमुख बनविले. त्याचे नाव लुसीफर होते. आज जरी त्याचे नाव सैतानाचे म्हणून ओळखले जाते तरी त्यावेळेस ते नाव सर्व दूतामध्ये वैभवशाली होते. तो अति हुषार व अति सुंदर असा होता व सर्व दूतांचा प्रमुख असा होता.

लुसीफराविषयी परमेश्वर म्हणतो ‘तू पूर्णतेची मुद्राच आहेस. तू ज्ञानपूर्ण व सर्वांग सुंदर आहेस. देवाचा बाग एदेन यात तू होतास, अलाक, पुष्कराज, हिरा, लसणा, गोमेद, यास्फे, नीलमणी, पाचू, माणिक व सोने असे अनेक तर्‍हेचे जवाहीर तुझ्या अंगावर होते. खंजीर्‍या व बासर्‍या यांचे कसब तुझ्या येथे चालत अभिषिक्त करून होतास. मी तुझी तशी योजना केली. तू देवाच्या पर्वतावर होतास. तू अग्नीप्रमाणे झगझगणार्‍या पाषाणातून हिंडत असे. तुला निर्माण केल्या दिवसापासून अधर्म तुझ्या ठायी दिसून आला तोपर्यंत तुझी चालचलणूक यथायोग्य होती.‘ (यहेज्केल 28:12—15)

लुसीफराविषयी परमेश्वर म्हणतो ‘तू पूर्णतेची मुद्राच आहेस. तू ज्ञानपूर्ण व सर्वांग सुंदर आहेस. देवाचा बाग एदेन यात तू होतास, अलाक, पुष्कराज, हिरा, लसणा, गोमेद, यास्फे, नीलमणी, पाचू, माणिक व सोने असे ज्याप्रमाणे परमेश्वराने तारे व वनस्पती निर्माण केली. त्याचप्रमाणे लुसिफर व इतर देवदूत निर्माण करून त्यांना परमेश्वराची आज्ञा पाळावी की नाही या विषयीचे स्वातंत्र्य दिले.

नितीमान, बनण्यासाठी मनुष्याला स्वतंत्र इच्छाशक्ती असणे अत्यंत जरूरीचे आहे. तारे व झाडे, ही चांगले किंवा वाईट या मधील निवड करू शकत नाहीत. ते देवाचे नियम निसंदेह पाळतात. कारण त्याची निर्मिती करताना देवाची आज्ञा पाळावयाची की नाही याची निवड करण्याचे स्वातंत्र्यच परमेश्वराने त्यांना दिले नाही आणि म्हणून ते परमेश्वराचे पुत्र होऊच शकत नाहीत. वैज्ञानिकांनी तयार केलेला यंत्र—मानव (रोबोट) हा त्याच्यासाठी कार्यान्वित केलेल्या सर्व आज्ञा पाळतो. अगदी स्वतःच्या मुलासारख्या ! पण तो काही त्या वैज्ञानिकाचा मुलगा होवू शकत नाही.

नितीमान, बनण्यासाठी मनुष्याला स्वतंत्र इच्छाशक्ती असणे अत्यंत जरूरीचे आहे. तारे व झाडे, ही चांगले किंवा वाईट या मधील निवड करू शकत नाहीत. ते देवाचे नियम निसंदेह पाळतात. कारण त्याची निर्मिती कनितीमान मनुष्य बनण्यासाठी दुसरी महत्वाची गोष्ट सद्सद्विवेक बुध्दी ही आहे. पशू आणि पक्षी यांना जे काही करावयाचे असते त्याची निवड ते स्वतःच करतात. तरीही ते नितीमान बनू शकत नाहीत. कारण त्यांना निवड करण्याची सद्सद्विवेक बुध्दी नाही. ते पवित्र किंवा पापी बनू शकत नाहीत आणि म्हणूनच ते देवाची मुले बनू शकत नाहीत कारण परमेश्वर हा नितीमान परमेश्वर आहे.

खरे पाहिले तर हे पक्षी व प्राणी तुमची मुले होऊ शकत नाहीत.

कुत्र्याला जी आज्ञा तुम्ही कराल ती पाळण्याचे शिक्षण तुम्ही त्याला देऊ शकता पण त्यामुळे कुत्रा तुमचा मुलगा होऊ शकत नाही. कारण तुमच्या मुलाचा स्वभाव तुमच्या सारखाच असायला हवा. तुमच्या कुत्र्याचा स्वभाव तसा नाही.

देवाने मनुष्याला त्याच्या आवडीने त्याच्या सारखे उत्पन्न केले त्याची मुले होण्याकरिता ! ही फार महत्त्वाची बाब आहे. म्हणून आपण देवाची मुले बनू शकलो.

सद्सद्विवेक हा आंतरिक आवाज आहे. जो आपल्याला नितीमत्तेची नेहमी आठवण करून देतो. ज्या वेळेस आपण परमेश्वराचे नियम मोडतो त्या वेळेस आपण अपराधी असल्याची जाणीव करून देतो.

स्वतंत्र इच्छाशक्ती व सद्सद्विवेक बुध्दी देऊन परमेश्वराने देवदूतांना निर्माण केले. त्यांची निर्मिती विशेष अशी होती. कारण ती नितीमत्व धारण केलेली निर्मिती होती. त्यांचा पुढारी लुसीफर याने लवकरच असे काही विचार व महत्वाकांक्षा बाळगण्यास सुरूवात केली की, ज्या चांगल्या नव्हत्या.

याच क्षणापासून सैतानाने प्रथम या विश्वात प्रवेश केला.

लुसीफरचे विचार हे फक्त चांगले नव्हते असे नाही तर ते गर्विष्ठ, बंडखोर, व असंतुष्ट असे होते.

या वेळेपर्यंत विश्व हे पूर्णपेण शुध्द असे होते. पण आता, देवाने स्वतंत्र इच्छाशक्ती देऊन निर्माण केलेल्या उत्पत्तीच्या ह्दयामध्ये सैतानाने (डोके वर काढले) प्रवेश केला.

सैतानाने प्रथम ह्दयाचा ताबा घेऊन आपले कार्य करण्यास सुरवात केली. सुरवातीला पापाचे बाहयत्कारी कार्य दिसले नाही. प्रथम ह्दयातच सैतानाचे पापाचे कार्य करण्यास सुरूवात केली. आजसुध्दा तो ह्दयातच प्रथम पाप कार्य सुरू करीत असतो.

हे ही लक्षात ठेवा की, गर्व हे पहिले पाप आहे. ज्यामुळे सैतानाने जगात प्रवेश केला. देवाने लुसीफरला ताबडतोब आपल्या समक्षतेपासून दूर केले आणि त्या वेळेपासून लुसीफरला सैतान म्हणून संबोधण्यात येऊ लागले. पवित्रशास्त्रात सैतानाच्या पतनाविषयी खालीलप्रमाणे वर्णन केले आहे.

हे दैदीप्यमान तार्‍या, प्रभातपुत्रा, तू आकाशातून कसा पडलास! राष्ट्नास लोळविणार्‍या, तुला धुळीत कसे टाकले! जो तू आपल्या मनात म्हणालास मी आकाशात चढेन. देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करीन उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन, मी मेघावर आरोहन करीन, मी परात्परासमान होईन, त्या तुला अधोलोकात, गर्तेच्या अधोभागात टाकिले आहे. (यशया— 14:12—15).

ज्या वेळेस देवाने लुसीफरला बाहेर टाकीले त्यावेळेस त्याने पुष्कळ देवदूतांना आपल्या बंडखोरीत सामील करून घेतले. लाखो देवदूत त्याला सामील झाले. त्या सर्वांची संख्या स्वार्गातील दूतांच्या संख्येच्या एक तृतीअंश (1/3) होती. प्रकटी (12:4).

आणि परमेश्वराने लुसीफरला व त्या देवदूतांना बाहेर टाकून दिले. हे पतन पावलेले देवदूत म्हणजेच अशुध्द आत्मे! हे अशुध्द आत्मे आजही माणसांना यातना व त्रास देत असतात.

कदाचित हे अशुध्द आत्मे तुम्हाला त्रास देत असतील किंवा कोणीतरी तुम्हावर जादूटोणा करीत असेल, तर असे असेल तर पवित्र शास्त्रात तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. या सर्व त्रासापासून तुमची संपूर्ण सुटका होऊ शकते, आणि तीही कायमची!

हे पुस्तक तुम्ही काळजीपूर्वक वाचा आणि ते वाचून पूर्ण होईतोपर्यंत परमेश्वर तुमच्याकरीता काय चमत्कार करू शकतो याचा अनुभव घ्या. काही जण असा प्रश्न विचारतील की ‘जर सैतान हेच या जगातील पापाचे मूळ आहे तर देव सैतानाचा व इतर सर्व अशुध्द आत्म्यांचा नाश का करीत नाही?

जर देवाला पाहिजे असेल तर तो त्यांचा नाश एका क्षणात करू शकतो पण तो तसे करीत नाही.

देवाने आपल्या अपरिमीत बुध्दीने, सैतान व त्याच्या बरोबर असलेल्या अशुध्द आत्म्यांना अस्तित्वात ठेवले आहे यात त्याचा (देवाचा) हेतू आहे हे सिध्द हेाते. तो हेतू हा की, त्याचे पृथ्वीवरील मानवी जीवन हे सैतानामुळे अत्यंक कठीण, असुरक्षित व भयंकर करावे. यासाठी की, लोकांनी देवाकडे वळावे तसेच पृथ्वीवरील आरामदायी जीवनाऐवजी सार्वकालिक (सनातन) जीवनाविषयी विचार करावा.

जर जगातील जीवन फार आरामदायी व सुखाचे असते आणि आजार यातना, गरीबी व दुःख विरहीत असते तर देवाचा विचारच कोणी केला नसता. परमेश्वर जगीक जीवनातील सर्व क्लेश व असुरक्षितता याचा उपयोग मानवाला देवाचा विचार करण्यास व आपल्या गरजा भागविण्याकरिता त्याकडे (देवाकडे) वळण्यास लावतो.

तसेच तुमच्या जीवनात अनेक समस्या, परीक्षा, आजार हे सैतानाद्वारे येण्याची परवानगी प्रेमळ देव देतो. या गोष्टींनी देवाचे तुमच्यावरील प्रेम व्यक्त होते. हाच पवित्र शास्त्राचा संदेश आहे.

मी एका व्यापार्‍याची गोष्ट ऐकली. तो एकेकाळी परमेश्वराच्या अगदी समीप हेाता. त्याचा व्यापार एकदम तेजीत आल्यावर तो देवापासून दूर गेला. त्याच्या मंडळीतील वडीलांनी त्याने प्रभूकडे पुनः वळावे म्हणून पुष्कळ प्रयत्न केले. परंतु तो आपल्या व्यवसायामध्ये फारच गढून गेला होता. एके दिवशी त्याच्या तीन मुलांपैकी सर्वात लहान मुलाला एक अति विषारी साप चावला व तो अत्यवस्थ झाला. डॉक्टरांनी त्याची आशा सोडून दिली. हा व्यापारी फारच चिंताग्रस्त झाला व त्याने चर्चमधील एका वडीलाला त्या मुलासाठी प्रार्थना करण्यास बोलाविले. मंडळीचा हा वडील बुध्दिमान (चतुर) मनुष्य होता. तो आला व त्याने अशी प्रार्थना केली की, ‘हे प्रभू मी तुझे आभार मानतो यासाठी की या मुलाला दंश करण्यासाठी तू सापाला पाठविलेस नाही तर या कुटूंबासमवेत तुझ्याविषयी विचार करण्याची संधीच मला मिळाली नसती. सहा वर्षात मला जे करता आले नाही ते या सर्पाने एका क्षणात केले. या सर्वांना आता चांगलाच धडा मिळाला आहे. हे प्रभू त्यांना तू क्षमा कर व या मुलाला बरे कर आणि तुझे स्मरण करण्यासाठी त्यांना अधिक सापांची गरज पडू नये असे तू कर.

काही लोक जोपर्यंत त्यांना कॅन्सर किंवा एखाद्या गंभीर आजारामुळे अचानक दवाखान्यात दाखल केले जात नाही तोपर्यंत ते परमेश्वराचा विचारच करीत नाहीत. मग अचानक ते परमेश्वराचा विचार करू लागतात व तारण प्राप्तीसाठी त्याकडे ते वळतात. कधीही बरे न होणारे आजार, गरीबी आणि जगातल्या बर्‍याच वाईट गोष्टी या सर्वांचा उपयोग परमेश्वर माणसाने पापापासून परावृत्त व्हावे म्हणून करीत असतो. अशा प्रकारे परमेश्वर त्यांना त्याच्या अनंतकालीन स्वर्गीय गृहाची प्राप्ती करून घेण्यासाठी मार्गदर्शन करीत असतो व सैतानाच्या तावडीतून सोडवून सार्वकालिक तारणाची प्राप्ती करून देण्यासाठी सैतानी गोष्टींचा उपयोग करीत असतो.

अशा रीतीने परमेश्वर सैतानाला वारंवार मूर्ख बनवित असतो. सैतानाने दुसर्‍यासाठी खणलेल्या खड्डयामध्ये त्यालाच ढकलले जाते. सैतानाला देवाने अस्तित्वात ठेवण्याचे दुसरे कारण हे की, सैतानाचा उपयोग देवाला त्याच्या लेकरांना शुध्द करण्यासाठी करून घ्यायचा आहे.

आता अग्रीचेच उदाहरण घ्या. जगाच्या इतिहासात लाखो लोक अग्रीने जळून मरण पावले असे आपण वाचतो. पण त्यामुळे लोकांनी अग्नी वापरण्याचे बंद केले नाही. का ? कारण या अग्नीमुळे अन्न शिजवले जाते. तसेच मोटारगाडया, विमाने आणि निरनिराळी यंत्रे ही अग्नीपासून उत्पन्न होणार्‍या शक्तीवर चालविली जातात. सोने शुध्द करण्यासाठी सुध्दा अग्नीचा उपयोग केला जातो. म्हणून अग्नी जरी उपद्रवकारक व घातक असला तरी त्याचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करून घेता येतो. अशा रीतीने सैतान जरी दुष्ट असला व माणसाला चुकीच्या मार्गाने नेणारा असला तरी देव त्याचा उपयोग करून घेतो.

परमेश्वराने सैतानाला आपल्या लोकांना निरनिराळया कठीण समस्येत व मोहात पाडून त्यांची परीक्षा पाहण्यासाठी परवानगी दिली आहे. यासाठी की त्यांनी पवित्र व शुध्द व्हावे. जसे सोने अग्नीतून शुध्द होते तसे!

आपण पाहतो की, जरी परमेश्वर जगातील सर्व वाईट गोष्टी क्षणात काढून टाकू शकतो तरी तो तसे करीत नाही, कारण त्या करवी तो आपली वैभवशाली उद्दिष्टे पूर्ण करून घेतो.

पापाविषयीचे खरे सत्य

प्रश्नः काही माणसे पुष्कळ वेळा जनावरासाखरी का वागतात उत्तरः कारण या जगामध्ये राहात असताना ते फक्त आपल्या शारिरीक गरजाकडेच जास्त लक्ष देतात.

प्रश्नः प्राण्यांना कोणत्या गोष्टींची आवड असते उत्तरः अन्न, झोप आणि लैगिंक समाधान. बस! इतकेच! आणि ज्या वेळेस मनुष्य या गोष्टीकडेच लक्ष पुरवितो त्यावेळेस तो जनावरांच्या पातळीला आला आहे, असे आपण म्हणतो. पण देवाने माणसाला (जनावरासारखे) पशू सारखे रहावे म्हणून उत्पन्न केले नाही. त्याने (देवाने) मानवाला त्याच्यासारखे (देवासारखे) उत्पन्न केले. सदाचारी, सरळमार्गी, चांगल्या चारित्र्याचे व स्वतःवर ताबा ठेवू शकणारे ! पशुसारख्या वासनेचे गुलाम असणारे नाही.

आपण पशुपेक्षा हुशार व सुशिक्षित असलो, तरी पशुपेक्षा चांगले होऊ शकत नाही. हुशार व शिकलेले लोकसुध्दा लोभ, स्वार्थीपणा, लैंगिक आवड व राग यांचे गुलाम असतात.

आपल्यामध्ये एक भाग आहे जो आपल्या मनापेक्षाही खोल असतो. तो म्हणजे आपला आत्मा ! जो आपल्याला देवाची जाणीव करून देतो आणि नेमका हाच भाग पशुमध्ये नाही.

मागील प्रकरणात आपण पाहिले की, देवाने आपल्याला निवड करण्याची स्वतंत्र इच्छाशक्ती दिली आहे. पण निवड करण्याचे स्वातंत्र्य याचा अर्थ असा नव्हे की आपण या स्वातंत्र्याचा उपयोग आपल्या स्वतःला खुश करून घेण्यासाठी व परमेश्वराचे नियम तोडण्यासाठी करून घ्यावा परंतु परमेश्वराने हे स्वातंत्र्य धोका पत्करून यासाठी देवू केले की, त्याच्या लेकरांनी आपल्या स्वतंत्र इच्छेने त्याची निवड करावी.

आज जगात गोंधळ, संभ्रम, रोगराई व सर्व वाईट गोष्टी आपण पहातो. हे कशाचे परिणाम आहेत केवळ मानवाने परमेश्वराची आज्ञा मोडल्याचे व सैतानाचे ऐकल्याचे ! परमेश्वराने निर्माण केलेला प्रथम मानव व स्त्री आदम व हवा ही होत. त्यांना निष्पाप असे उत्पन्न केले. आपण पवित्र रहावे यासाठी त्यांना निवड करावयाची होती. आणि निवड करण्यासाठी त्यांना मोहात पडणे जरूरीचे होते. यासाठी की, त्यांनी वाईटाचा त्याग करावा व परमेश्वराची निवड करावी, आणि म्हणून परमेश्वराने सैतानाला त्यांना मोहात पाडण्यास परवानगी दिली. पवित्र शास्त्रात पहिल्याच पुस्तकात आपण ही माहिती वाचली.

(उत्पत्ति अध्याय 2 व 3) निरपराधीत्व व पवित्रता यामध्ये फार फरक आहे. निरपराधीत्व हे आपल्याला लहान बालकात दिसते. आदामला कसे उत्पन्न केले हे जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर बालकाकडे पहा!— निरपराध, चांगले व वाईट याची माहिती (जाण) नसलेले पण हे बालक पवित्र नाही आणि पूर्ण ही नाही. पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी हे बालक मोठे व्हावयास पाहिजे. व मग त्याने निवड केली पाहिजे. वाईट सोडून परमेश्वराची निवड केली पाहिजे.

ज्यावेळेस आपण मनामध्ये मोहाला बळी पडण्याचे नाकारीत असतो त्याचवेळी आपला स्वभाव व आपले चारित्र्य घडत असते. तुम्ही आज जे काही आहात ते केवळ तुम्ही जीवनामध्ये जी निवड केली त्यामुळे आहात.

जर तुमच्या भोवतालची माणसे तुमच्यापेक्षा चांगली असतील तर त्याचे कारण हेच आहे की त्यांनी जीवनामध्ये तुमच्यापेक्षा चांगली निवड केली आहे. आपण रोज निवड करीत असतो आणि आपण शेवटी काय बनणार आहोत हे या निवडीवरच अवलंबून असते. ज्या वेळेस परमेश्वराने प्रथम पुरूष व स्त्री निर्माण केली त्या वेळेस त्याने त्यांना सैतानाद्वारे मोहात पाडण्याची परवानगी देवून पवित्र होण्याची संधी दिली. त्याने त्यांना बागेत ठेवले व सांगितले की, एक झाड सोडून सर्व झाडांची फळे तुम्ही खाऊ शकता. ही त्यांची परीक्षा होती.

खरे पाहिले असता ही फार सोपी परीक्षा होती. हजारो आकर्षक झाडे व त्यावरील मधूर फळे असलेल्या बागेत त्यांना पाठविले व एका झाडाची फळे सोडून सर्व झाडांची फळे खाण्यास त्यांना परवानगी दिली. पण आज्ञापालनाच्या साध्या परीक्षेत ते नापास झाले.

कारण सैतान त्या बागेत आला व त्याने आदाम व हवा यांना मोहात पाडले. तो म्हणाला की, ज्या झाडाचे फळ खाण्यास तुम्हाला मनाई केली. त्याचे फळ जर तुम्ही खाल्ले तर तुम्ही देवासारखे व्हाल आदम व हवा यांच्यापुढे जो मोह होता तो फक्त झाडाचे फळ खाण्याचा नव्हता तर त्यांना देवासारखे बनण्याचा होता. जर त्यांना पाहिजे असते तर !

सैतानालाही एके काळी परमेश्वरासारखे होण्याची इच्छा होती, त्याने आदम व हवा यांना तुम्हीसुध्दा परमेश्वरासारखे व्हाल असे सांगितले अर्थात सैतानाने त्यांना जे काही सांगितले होते ते खोटे होते. आजही तो अशाच प्रकारे खोटे सांगून लोकांना फसवित असतो. (आहे) आज जसे लोक फसतात, तसेच त्या वेळेस ही आदम व हवा हे सैतानाकडून फसविले गेले आणि म्हणून त्यांचे पतन झाले. त्यांनी परमेश्वराची आज्ञा मोडली. सैतानाला जे भोगावे लागले, ते आदम व हवा यांनाही भोगावे लागले. त्यांना परमेश्वराच्या समक्षतेतून काढून टाकण्यात आले.

जे काही घडले त्याचे सविस्तर वर्णन पवित्र शास्त्रातील पहिल्या पुस्तकात उत्पत्ती तिसर्‍या अध्यायामध्ये दिलेले आहे.

आदम व हवेला वाटले की, परमेश्वराची आज्ञा मोडून ते देवासारखे सामर्थ्यशाली व स्वतंत्र हेातील. पण ते स्वतंत्र झाले का? नाही ! ते फक्त सैतानाचे गुलाम झाले. देवाची आज्ञा पाळली तरच आपण खर्‍या अर्थाने स्वतंत्र होवू शकतो.

सैतान पुष्कळ लोकांना फसवित असतो जर तुम्हाला खरेच जीवनात मजा लुटावयाची असेल तर तुम्ही देवाचे नियम सोडा.

मानवी जीवनात पाप कसे आले हे आता आपण पाहिले. आदाम व हवा यांनी बागेमध्ये फार महत्त्वाचा निर्णय घेतला. त्याचे परिणाम त्यांना व त्यांच्या लेकरांना भोगावे लागले.

आपल्या आयुष्यामध्ये आपण जे निर्णय घेतो, त्याचे परिणाम आपणास भोगावे लागतात. जे आपण पेरतो त्याची आपण कापणी करतो आणि बर्‍याच वेळेस आपण जे वाईट पेरतो. त्याची कडू फळे आपल्या लेकरांना चाखावी लागतात. आदाम व त्याची पत्नी हवा यांना देवाने आपल्या समक्षतेतून कायमचे दूर केले.

आपण असे कधी समजू नये की आपण जे काही लहान सहान निर्णय घेतो ते काही फार महत्त्वाचे नाहीत, किंवा जे काही आपण पेरू त्याची भविष्यात कापणी आपण कधीच करणार नाही. अनेक परिस्थितीमध्ये अनेकांकडून परमेश्वर आपल्याला मोहात पाडीत असतो व आपली परीक्षा घेत असतो यासाठी की जगातील कोणत्याही गोष्टीपेक्षा आम्हाला खरोखर परमेश्वरच पाहिजे हे आम्ही सिध्द करावे.

देवाने उत्पन्न केलेल्या गोष्टींना आपण देवापेक्षा अधिक महत्त्व देतो की, काय याची परीक्षा पाहणे हाच आपल्याला मोहात पाडण्याचा देवाचा हेतू आहे. देवाने निर्माण केलेल्या वस्तूंना व स्वतःला देवापेक्षा अधिक महत्त्व देण, परमेश्वराच्या मार्गापेक्षा आपला स्वतःचा मार्ग निवडणे व परमेश्वराला आनंदीत करण्यापेक्षा स्वतःला आनंदीत करणे यातच सर्व पापाचे सार आहे.

पाप हे केवळ व्यभिचार, खून किंवा चोरी नाही. आपण आपल्या मार्गाने काम करण्याची इच्छा धरणे हेच पाप आहे. लहान लेकराच्या हट्टीपणात आपल्याला पापाचा उगम दिसतो. पाप हे प्रत्येक लहान लेकराच्या स्वभावामध्ये जन्मतःच असते आणि जस जसे ते लेकरू वाढत जाते तस तसे ते आपल्या परीने स्वतःला पाहिजे ते मिळविण्यासाठी इतर मुलांबरेाबर भांडण करते.

ज्यावेळेस आपण वयाने मोठे होतो पुरूष होतो त्यावेळेस आपणामध्ये बदल होत नाही. लहानपणी आपण जसे होतो तसेच राहतो. आपण फक्त शहाणे झालेले असतो व आपली कार्यपध्दती बदललेली असते. सभ्य व जास्त शिकलेल्या लोकांच्या बाबतीत सुध्दा असेच आहे. त्याचा स्वार्थीपणा, लोभीपणा व लैंगिक तीव्र वासना यांना ते धर्माच्या, कदाचित धार्मिकतेच्या आवरणाखाली झाकतात.

पाप हे शरीरातील प्रत्येक तंतूमध्ये भिनलेले आहे. उपास, प्रार्थना व धार्मिक स्थळांना भेटी किंवा इंद्रीयदमन इत्यादी धार्मिक गोष्टी केल्याने आपण पापापासून सुटका करून घेवू शकत नाही. फक्त परमेश्वरच आपल्याला पापापासून सोडवू शकतो.

पाप हे वाईट कृत्य आहे याची आपल्याला जाणीव होईपर्यंत परमेश्वराला थांबावे लागते.

एकदा येशु म्हणाला, मी धार्मिकासाठी नाही तर पापी लोकांसाठी आलो आहे याचा अर्थ असा नव्हे की, पृथ्वीवरील काही लोक धार्मिक होते व बाकीचे पापी ! तो हे कुचेष्टेने जे स्वतःला सदाचारी धार्मिक व पवित्र समजतात, अशा लोकांविषयी बोलला. येशूच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की, जे स्वतःला धार्मिक व पवित्र समजतात अशांना तारावयास तो आला नाही.

ज्यांना आपण स्वतः आजारी आहोत याची जाणीव होते ते डॉक्टरकडे जातात. अशाच प्रकारे आपण स्वतः पापी आहोत याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे.

आपला धर्म कोणताही असू द्या. आपण पापी आहोत आपण आपल्या विचाराने, बोलण्याने, कृतीने, वागणूकीने आणि उद्देशाने परमेश्वराच्या पवित्र नियमांच्या विरूध्द पाप केले आहे.

परमेश्वराच्या पवित्र पात्रतेला आपण कमी पडलो आहोत.

आजार आपल्या शरीराला घातक आहे पण त्याहीपेक्षा घातक पाप! पाप हे आत्म्याला जास्त घातक आहे, पण हे आपल्याला समजले आहे का? आपण हे ओळखू शकतो का ?

एड्स या रोगाविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे? लैंगिक संबंधातून होणारा हा विनाशकारी आजार आज सर्व जगामध्ये फार जोराने पसरत आहे.

एड्स हा इतका संसर्गजन्य रोग आहे की, ज्याला हा रोग झाला आहे त्याच्या जवळ जाण्यासही लोक घाबरतात. पाप हे या ही पेक्षा भयंकर आहे. फक्त फरक एवढाच की, पाप हे आपल्या आत्म्याचा नाश करते, हे पाप बाहयत्कारी दिसत नाही पण त्याचे परिणाम हे एड्स रोगापेक्षा फार भयंकर आहेत. ते (पाप) आपले जीवन उध्वस्त करते. आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुःखी करते आणि जर त्यापासून आपली सुटका झाली नाही तर शेवटी आपला कायमचा सर्वनाश करते.

पापाविषयीचे खरे सत्य आपल्या सद्सद्विवेक बुध्दीचे खरे सत्य

देवाने आपल्या सर्वानाच सद्सद्विवेक बुध्दी देवून निर्माण केले आहे. ही सद्सद्विवेक बुध्दी आपण देवाची नितीमान उत्पत्ती आहोत याची आपल्याला सतत जाणीव करून देते. सद्सद्विवेक बुध्दी म्हणजे परमेश्वराचा आपल्यामध्ये असलेला आवाज जो आपल्याला सांगत असतो की आपल्या सर्व कृत्यांना आपणच जबाबदार आहोत व एक दिवस आपल्याला आपण आपले जीवन कसे जगलो याचे उत्तर परमेश्वराला द्यायचे आहे.

आपण जनावरासारखे नाहीत. त्यांना सद्सद्विवेक बुध्दी नाही. जनावरे ही नितीमान उत्पत्ती नाहीत म्हणून त्यांना परमेश्वराला कशाचेही उत्तर द्यावयाचे नाही. जेव्हा जनावर मरते तेव्हा तेथेच त्याचे जीवन संपते. आपल्या बाबतीत मात्र तसे नाही. मानवाला परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाचा असा उत्पन्न केला आहे म्हणून मानव परमेश्वराची सार्वकालिक उत्पत्ती आहे.

आपल्यासाठी एक न्यायाचा दिवस असणार त्या दिवशी आपण आपल्या जीवनामध्ये जे काही केले असेल, बोललो असेल किंवा विचार केला असेल ते सर्व आपल्या मनामध्ये पुनः आणले जाईल व त्याचे मूल्यमापन परमेश्वर करील आणि शास्त्रामध्ये दिलेल्या पवित्र नियमांच्या आधारे तो आपला न्याय करील. आपण केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल, बोललेल्या शब्दाबद्दल व प्रत्येक विचाराबद्दल आपल्याला उत्तर द्यावे लागेल.

शास्त्र म्हणते ज्या अर्थी मनुष्यास एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे (इब्री 9:27)

पुष्कळ लोकांना त्यांनी या जगामध्ये केलेल्या गुन्हयाच्या शिक्षेपासून सुटका मिळते. परंतु परमेश्वराच्या न्यायालयासमोर उभे राहिल्यानंतर त्यांना योग्य ती शिक्षण होणारच. त्याच प्रमाणे ज्या लोकांनी दुसर्‍यासाठी चांगल्या गोष्टी केल्या असतील त्याबद्दल या जगामध्ये त्यांचे कौतुक झाले नसेल अशा सर्वांना येशू ख्रिस्त पुनः जगामध्ये आल्यावर पारितोषिक देणार आहे.

आपण जे काही केले त्याबद्दल एक दिवस आपल्याला परमेश्वराला उत्तर द्यावेच लागेल. म्हणून आपण आपल्या सद्सद्विवेक बुध्दीचा आवाज नेहमी ऐकला पाहिजे.

सद्सद्विवेक बुध्दी ही परमेश्वरापासून माणसाला मिळालेली एक मोठी देणगी आहे. आपल्याला शरीरामध्ये जी वेदना आहे त्या सारखी ! आपण पुष्कळजण या वेदनेला पीडा समजतो, परंतु ही वेदना आपल्या जीवनामध्ये किती मोठा आशीर्वाद आहे हे आपल्याला कळत नाही. कारण या वेदनेद्वाराच आपणाला हे समजते की, कोठेतरी काहीतरी चुकले आहे. आजारा विषयी सावधतेचा इशारा देणारी आपल्या शरीरातली सूचना देणारी जाणीव आहे, (दर्शक) आहे. जर आपल्या शरीरामध्ये वेदना नसतील तर आपल्याला कधी आजार येतो व आपला मृत्यू होतो हे समजले नसते. आपल्याला अकाली मृत्यू पासून ही वेदनाच वाचवू शकते.

कुष्ठरोग्याला वेदना जाणवत नाहीत. कारण कुष्ठरोग त्याचे ज्ञानतंतू मारून टाकते व स्पर्शज्ञान नष्ट करते. कुष्ठरोग्याच्या पायात खिळा जरी गेला तरी त्याला समजत नाही. जखम झाली तरी त्याला समजत नाही व तो पाय इतका वाईट होतो की शेवटी त्याला कापून काढावे लागते, हे सर्व कशामुळे तर त्याला वेदनेचा आशीर्वाद नसल्यामुळे.

सद्सद्विवेक बुध्दी ही वेदनेसारखी आहे. आपण जेव्हा पाप करण्याचे मनात आणतो किंवा ज्या वेळेस आपण पाप केलेले असते, त्यावेळेस आपण परमेश्वराच्या नियमांचे उल्लंघन करतो. याची जाणीव ती आपल्याला करून देते. जर आपण या इशार्‍याकडे दुर्लक्ष केले आणि त्याविरूध्द गेलो, तर आपण आपल्यामध्ये जी पापांची जाणीव आहे तीच हळूहळू नष्ट करून टाकू आणि असा दिवस येईल की, आपल्याला पापाची जाणीव ही होणारच नाही. आपण आध्यात्मिक कुष्ठरोगी बनू. आपली सद्सद्विवेक बुध्दी मृत झालेली असेल. सद्सद्विवेक बुध्दी नाही अशा जनावरासारखे आपण होवू. काही लोक जनावरापेक्षाही वाईट वागतात. ते या मुळेच! आणि अशा जीवनाचा शेवट परमेश्वराकडून सदासर्वकाळची शिक्षा मिळण्यात होतो.

आपली सद्सद्विवेक बुध्दी आपल्याला सांगत असते की, आपण पापी आहोत. म्हणून आपल्यामध्ये जी अपराधाची भावना आहे तिला कधीच डळमळू देवू नका कारण ही अपराधीपणाची भावनाच वेदनांचा आशीर्वाद अशी आहे. ती आपल्याला सांगत असते की, आपण आध्यात्मिकरित्या आजारी आहोत व आपल्याला बरे होण्याची गरज आहे. सद्सद्विवेक बुध्दी ही परमेश्वरापासून माणसाला मिळालेली उत्तम देणगी आहे.

येशूने सद्सद्विवेक बुध्दीचा संबंध डोळयांशी जोडला आहे. (लूक 11:34—36) आपले डोळे आपल्या शरीराचा सर्वात स्वच्छ भाग आहे. कारण दिवसातून अनेक वेळा ते अश्रूंनी साफ केले जातात.

आपण डोळयांची सारखी उघडझाप करीत असतो. (आपल्या नकळत आपण दिवसातून हजारो वेळा ती करीत असतो.) आपल्या डोळयातील सर्व धूळ त्यामुळे काढून टाकण्यात येते. धुळीचा एक लहानसा कण जर आपल्या डोळयात गेला तर आपण बेचैन होतो व डोळे धुवून साफ करेपर्यंत सर्व काम आपण बंद करतो.

अशा प्रकारे आपण आपली सद्सद्विवेक बुध्दी नेहमी शुध्द ठेवली पाहिजे. फक्त परमेश्वरच आपल्या पापांची क्षमा करून ते धुवून काढू शकतो.

अपराधीपणाची भावना काढून टाकण्यासाठी आपल्या सद्सद्विवेक बुध्दीला शुध्द ठेवणे हा एकच मार्ग आहे.

पण पापांची क्षमा ही स्वस्त नाही.

क्षमेविषयी खरे सत्य

प्रश्नः परमेश्वर आपल्या पापांची क्षमा कशी करू शकतो उत्तरः परमेश्वर हा पवित्र व न्यायी आहे आणि मनुष्याच्या पापांकडे दुर्लक्ष करून तो त्याची क्षमा करूच शकत नाही. ते अन्यायकारक होईल.

परमेश्वर पवित्र व न्यायी आहे. पापासाठी त्याच्याकडे शिक्षा आहे.

तो प्रेमळ परमेश्वर असल्यामुळे आपल्या पापांची क्षमा करण्याकरीता त्याने एक मार्ग तयार केला आहे.

सर्व धर्म आपल्याला आपण चांगले, दयाळू व विश्वासू व्हावे हेच शिकवतात. पण आपल्या पापांपासून आपल्याला क्षमा मिळाल्यानंतर आपण कसे रहावे हेच ते दर्शवितात.

चांगुलपणा, दयाळूपणा व सत्यता ही सर्व इमारतीवरील बाहयत्कारी बांधकामासारखे आहेत व पापांची क्षमा ही त्या इमारतीचा पाया आहे.

इमारतीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पाया ! जगाची निर्मीती करताना परमेश्वराला जे काही करावे लागले त्यापेक्षा अधिक कठीण व अति यातना देणारे असे काही तरी मानवाच्या पापांची क्षमा करण्याकरीता त्याला करावे लागले. जगाची निर्मिती करताना परमेश्वराला फक्त शब्द बोलावे लागले. आणि क्षणात जगाची निर्मिती झाली. पण आपल्या पापांची क्षमा तो फक्त शब्द बोलून करू शकला नाही.

माणसांच्या पापांची क्षमा करण्याकरीता फक्त एकच मार्ग होता. तो म्हणजे परमेश्वराला आपल्या सारखे मानव बनावे लागले.

मनुष्याप्रमाणे त्याला मोहातून व संघर्षातून जावे लागले. आपल्या पापांसाठी होणारी शिक्षा त्याला आपणा स्वतःवर घ्यावी लागली आणि आपल्या बदली स्वतःचे अर्पण करून मरावे लागले. दुःख भोगणे किंवा आजार, गरीबी तसेच या जगामध्ये एखाद्या खालच्या समाजामध्ये पुनःजन्म घेणे इत्यादी ही पापासाठी मिळालेली शिक्षा नाही तर ती शिक्षा म्हणे सदासर्वकाळचे मरण. ते मरण देवापासून कायमचे विभक्त होण्यासारखे आहे. शारिरीक मरण म्हणजे शरीरापासून वेगळे होणे. त्याप्रमाणेच आध्यात्मिक मरण म्हणजे जो जीवनदाता त्या देवापासून वेगळे होणे.

भविष्यामध्ये तुम्ही जी चांगली कृत्ये करणार त्यामुळे तुम्ही भूतकाळात केलेली वाईट कृत्ये धुवून टाकली जाणार नाहीत. पाप हे कर्ज आहे व आपण देवाच्या नियमांचे देणेकरी आहोत. जर आपण आपल्या देशाचा नियम मोडला व समजा आपण कर भरण्यामध्ये सरकारची फसवणूक केली तर जरी आपण भविष्यात भरू असे वचन दिले तरी आपली क्षमा केली जाणार नाही. नक्कीच नाही! जरी आपला कर आपण भविष्यात भरला तरी भूतकाळातील जो कर आपल्याला देणे आहे तो द्यावाच लागेल. पापाबद्दल असेच आहे.

आपण भविष्यकाळात जरी कितीही चांगली कामे करू शकलो तरी भूतकाळात आपण केलेल्या पापाबद्दल आपणाला शिक्षा ही होणारच! शिवाय पवित्र शास्त्र म्हणते ‘आम्ही सगळे अशुध्द मनुष्यासारखे झालो आहो. आमची सर्व धर्मकृत्ये घाणेरडया वस्त्रासारखी झाली आहेत. आम्ही सर्व पाल्याप्रमाणे वाळून गेलो आहोत. आमच्या अधर्माने आम्हास वादळाप्रमाणे उडवून दिले आहे. ‘ (यशाया 64:6)

देव चांगल्या कामांची प्रशंसा करतोच पण आपली सर्वात चांगली कामे सुध्दा त्याच्या पवित्रतेच्या पातळीपर्यंत पोहचू शकत नाहीत. कारण त्याची पवित्रता ही अमर्यादित आहे. आपण अगदी निराशाजनक परिस्थितीत आहोत कारण आपली चांगले कामे सुध्दा त्याच्या दृष्टीने चांगली नाहीत की, जेणेकरून आपण परमेश्वराच्या समक्षतेत प्रवेश करू शकू असा कोणताही मार्ग नाही.

आपण हरवलेले व आशाहीन आहोत पण देवाने त्याच्या अपार प्रेमामुळे एक मार्ग तयार केला आहे. ज्यामुळे आपल्या पापांची क्षमा होऊ शकते.

देवाची विविधता (गुंतागुंत) इतकी आहे की आपली मानवी मने त्याला पूर्ण पणे ओळखू शकत नाहीत. पवित्र शास्त्रामध्ये प्रगट केले आहे की, देव एक आहे तरीही त्या एकतेमध्ये तीन व्यक्ती आहेत. ज्याला आपण पिता, पुत्र व पवित्रात्मा म्हणून संबोधितो. पिता हा देव, पुत्र येशू (ज्याचा स्वभाव देवाच्या स्वभावासारखाच आहे पण तो पित्याद्वारे जन्मला नाही) आणि पवित्र आत्मा या तीन व्यक्ती आहेत. त्या एकमेका समान आहेत.

या तीन वेगवेगळया व्यक्ती एक देव आहेत हे आपल्या मानवी बुध्दीला आकलन होणे कठीण आहे. आपण फक्त तीन वेगवेगळी शरीरे असलेल्या व्यक्तींचा विचार करून शकतो, पण परमेश्वर आत्मा आहे. आपल्या मनाची विचार करण्याची कुवत (शक्ती) इतकी मर्यादित आहे की, ते परमेश्वराचा विविधतेने एकत्रित गुंतागुंतीचा असलेला स्वभाव समजूच शकत नाही.

मनुष्याला ज्या गोष्टी आकलन होतात त्या कुत्र्याला आकलन करता येत नाहीत. परमेश्वराविषयीच्या ही अशा गोष्टी आहेत की त्या मानव आकलन करू शकत नाही.

पवित्रशास्त्रात देवाने आपल्या स्वतःला प्रगट करण्यासासाठी कशाची निवड केली आहे हेच फक्त आपल्याला माहित आहे.

उदा. हुशार कुत्र्याला बेरीज करण्याचे स्पष्टीकरण तुम्ही करू शकाल जसे 1+1+1=3 हे. कुत्र्यापुढे तीन हाडे टाकून मोजायला लावू शकाल पण— तुम्ही त्याला गुणाकार शिकविण्याचा प्रयत्न करा, तेव्हा कितीही हुशार कुत्रा असला तरी तो 1 ु 1 ु 1 = 1 हा गुणाकार समजू शकणार नाही.

आपल्याला हे नक्की माहित आहे की हे तीन वेगळे ’एक’ याचा जर गुणाकार केला तर तो ’एकच’ येतो.

ज्याप्रमाणे आपण कुत्र्यापेक्षा वरच्या पातळीवर आहोत त्याप्रमाणे परमेश्वर आपल्यापेक्षा फारच वरच्या पातळीत आहे.

गुणाकार समजण्याकरिता कुत्र्याला मनुष्य बनावे लागेल.आणि जर देवाला समजावयाचे असेल तर आपल्याला देव बनावे लागेल. देव तीन व्यक्ती असून सुध्दा एक देव आहे. हे जर आपल्याला समजले नाही तर त्यात आश्चर्य करण्याचे काहीच कारण नाही.

जरी आपल्याला समजले नाही तरी आपल्याला माहिती आहे की हे सत्य आहे. कारण परमेश्वराने त्याच्या वचनामध्ये हे सांगितले आहे.

याप्रमाणे मानवी तर्कशास्त्राचा उपयोग करून म्हणतात की जर परमेश्वर सर्वव्यापी आहे तर तो प्रत्येक मनुष्यामध्ये, पशूमध्ये, वनस्पतीमध्ये आणि प्रत्येक भक्ती, आराधना करण्याच्या धार्मिक स्थानामध्ये असणारच. ज्याला दैवी सत्य समजले नाही, अशा संकुचित मनाच्या माणसाला हे तर्कशुध्द वाटते पण हे सर्वस्वी असत्य आहे. परमेश्वर सर्वव्यापी आहे म्हणजे सर्व ठिकाणी काय चालले आहे हे त्याला माहित आहे. पण तो नरकात नक्की नाही, तरी नरकात काय चालले आहे हे सर्व त्याला माहित असते.

नरक याचा अर्थ (पाप्यांसाठी सार्वकालिक शिक्षेचे ठिकाण) अशा जागा की, त्या ठिकाणी परमेश्वराचे अस्तित्व नाही आणि म्हणूनच नरकामध्ये पापी लोकांना होणार्‍या यातना या असह्य असतात.

नक्कीच देव प्रत्येकामध्ये राहात नाही. मानवाला पापांच्या सार्वकालिक शिक्षेपासून वाचविण्यासाठी देव पित्याने 2000 वर्षापूर्वी आपला पुत्र कुमारी मातेच्या द्वारे बालक म्हणून या जगात जन्माला घातला. ते दैवी, पवित्र आत्म्याचे कार्य होते. त्याचे नाव येशू ख्रिस्त.

मनुष्य ज्या मोहांना तोंड देतो त्या प्रत्येक मोहाला तोंड देत तो लहानाचा मोठा झाला. आणि त्याने सर्व मोहांवर विजय मिळविला. त्याने कधीच पाप केले नाही.

देव पिता याने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला वयाच्या 33 व्या (तेहतीसाव्या) वर्षी दुष्ट माणसांच्या स्वाधीन होऊन क्रूसखांबी जाण्यास परवानगी दिली. क्रूस खांबावर आपल्यासाठी तो (येशू) शाप (पाप) असा झाला. आणि (मानवाच्या) मनुष्य जातीच्या पापांची शिक्षा त्याने घेतली. येथे आपल्याला देवाचे अपरिमित प्रेम दिसून येते.

येशू ख्रिस्त क्रूसखांबावर रक्त सांडून मरण पावला व त्याने आपल्या पापासाठी पूर्ण पवित्र असा दंड भरला.

न्यायाच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या. त्याला पुरल्यानंतर तीन दिवसांनी देवाने येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून उठविले. यासाठी की, जगाला साक्ष व्हावे की, त्याच्या क्रूसावरील बलिदानाचा (अर्पणाचा) स्वीकार करण्यात आला आहे.

देव फक्त एकच आहे व तो जगामध्ये एकदाच येशू ख्रिस्ताच्या रूपात अवतरला हे खालील दोन सत्य घटनांवरून सिध्द होते.

1) प्रभू येशू ख्रिस्त एकच असा होता की, जो जगाच्या पापासाठी मारला गेला.

2) येशू ख्रिस्त हा असा एकच होता जो मरणातून पुनःजीवंत झाला. पुनः कधी ही न मरण्यासाठी ! हया वरून हे सिध्द होते की त्याने मानवाचा मोठा शत्रू, जो मृत्यू यावर विजय मिळविला.

पृथ्वीवर आणखी चाळीस दिवस राहिल्यानंतर तो स्वर्गात माघारी गेला. जेथे तो आजही आहे.

ज्याण्यापूर्वी त्याने वचन दिले की, तो एक दिवस पुनः परत जगाचा न्याय करण्यासाठी व शांतीने आणि धार्मिकतेने राज्य करण्यासाठी येईल.

पृथ्वीवर पुनः परत येण्यापूर्वीची काही चिन्हे त्याने दिलेली आहेत. आपण पहात आहोत की, ती चिन्हे आता पूर्ण हेात आहेत व आपल्याला कळते की, प्रभू येशू ख्रिस्ताचे दुसरे येणे अगदीच जवळ आले आहे.

तो पृथ्वीवर येण्यापूर्वी देवाने ख्रिस्तामध्ये जी क्षमा देवू केली आहे तिचा तुम्ही स्वीकार करणे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे.

पश्चातापाविषयीचे खरे सत्य

पापासाठी झालेली शिक्षा म्हणजे आध्यात्मिक मरण आहे. आणि अध्यात्मिक मरण म्हणजे परमेश्वरापासून कायमचे विभक्त होणे हे आपण पाहिले.

क्रूसखांबावर असताना पित्याने त्याला (येशूला) सोडले होते त्या वेळी त्याने या अध्यात्मिक मरणाचा अनुभव घेतला.

खुद्द परमेश्वर असलेल्या व त्यामुळे आपल्या आंतरिक स्वभावामध्ये सनातन असलेल्या येशूने अगदी थोडयाच काळात आपल्या पित्यापासून विभक्त होण्याच्या अनंत यातना अनुभवल्या.

ज्यावेळेस तीन तास क्रूसावर संपूर्ण अंधकार पसरला त्या वेळेस येशू ख्रिस्त क्रूसावर अनंतकाळच्या नरक यातना भोगत होता. खरे पाहिले तर, या यातना आपल्यालाच अनंतकाळपर्यंत भोगावयाला पाहिजे होत्या.

आपल्या पापाचा दंड त्याने स्वतः वाहिला. आणि जोपर्यंत आपण ही क्षमा, परमेश्वरापासून प्राप्त करून घेत नाही, तो पर्यंत आपली क्षमा होत नाही व पापाच्या दंडापासून आपली मुक्तता होत नाही.

या जगात असे पुष्कळ लोक आहेत की, येशूख्रिस्त त्यांच्याकरीता मरण पावला, तरी देवाने त्यांच्या पापांची क्षमा केली नाही याचे कारण हेच आहे.

येशू ख्रिस्त हा फक्त ख्रिस्ती लोकांच्या पापांकरिताच नव्हे तर सर्व जगातील व सर्व धर्मातील लोकांच्या पापासाठी मरण पावला.

येशू ख्रिस्ताच्या मृत्युद्वारे परमेश्वराने तुमच्याकरीता जे विकत घेवून ठेवले आहे. ते प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही प्रथम तुमच्या पापाबद्दल पश्चाताप केला पाहिजे. याचा अर्थ असा की, तुम्हाला खरोखर तुमच्या पापी वागण्याचा पश्चाताप होत आहे आणि माहित असलेल्या प्रत्येक पापापासून परत फिरण्याची तुमची प्रामाणिक इच्छा आहे.

अगदी सुरूवातीला तुमच्या सद्सद्विवेक बुध्दीला परमेश्वर कशामुळे संतुष्ट होतो व कशामुळे नाही. याविषयीची जाणीव नसल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराला न आवडणार्‍या प्रत्येक गोष्टीपासून परत फिरावे हे तुम्हाला अशक्य आहे. आणि परमेश्वर त्याची अपेक्षाही करीत नाही. कारण तो वास्तववादी आहे. तुम्हाला न आवडणार्‍या प्रत्येक गोष्टी सोडून देण्याची तुम्ही इच्छा बाळगा एवढेच तो तुम्हाला सांगतो.

तुमच्या सद्सद्विवेक बुध्दीला ज्या गोष्टी पटत नाहीत त्या गोष्टीपासून परावृत्त होऊन तुम्ही सुरवात करू शकता.

वाईट गोष्टी सोडण्यासाठी तुम्हाला सुरूवातीला शक्ती नसेल. या ठिकाणी सुध्दा परमेश्वर तुमचा अशक्तपणा पूर्णपणे जाणतो. तुम्हाला शक्तीच पाहिजे याची तो अपेक्षा करीत नाही. तो फक्त तुम्हाला विचारतो या सर्व सवयी सोडून देण्याची इच्छा आहे काय ज्या वेळी तो पहातो की, तुम्ही खरेच प्रामाणिकपणे सर्व वाईट गोष्टी सोडून देण्याची इच्छा करता त्या वेळेसच जरी तुम्ही अनेक वाईट सवयीमध्ये गुरफटलेला असला तरी तो तुमचा तुम्ही आहात तसा स्वीकार करतो. ही अतिशय चांगली गोष्ट आहे !

तुम्ही तुमचे जुने वाईट मार्ग सोडून देण्याची इच्छा करता याचा पुरावा हाच आहे की, गतकाळात तुम्ही जे काही वाईट केले आहे त्याकडे पाठ फिरवून जे चांगले तेच करण्याची तुम्ही इच्छा करता आणि या ठिकाणीसुध्दा परमेश्वर तुमच्या मर्यादा ओळखतो.

गतकाळात तुम्ही अशी हजारो पापे व चुका केल्या असतील की ती तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी तुम्हाला सुधारता येणार नाहीत. पण त्यातील थोडी तुम्ही सुधारू शकता. परमेश्वर तुम्हाला तुमच्या कुवतीप्रमाणे शक्य असेल तेवढेच करण्याची इच्छा करतो.

उदा. तुम्ही कोणाचे तरी पैसे चोरले असतील तर तुमच्याकडे पैसे जमा झाल्याबरोबर ते देण्याची तुम्ही इच्छा करावयास पाहिजे. जर तुमच्या बोलण्यामुळे तुम्ही कोणाला दुखावले असेल आणि तुम्हाला जर त्याची जाणीव झाली तर तुम्ही त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटून किंवा पत्र लिहून माफी मागावयास पाहिजे. या अशा वागण्यामुळे परमेश्वर तुमच्या प्रामाणिकपणाची व नम्रतेची परीक्षा घेईल व तुम्हाला नक्की मदत करील. लक्षात ठेवा की, तो फक्त नम्र माणसालाच मदत करतो.

परमेश्वराच्या मदतीशिवाय आपले तारण होवूच शकत नाही. मुर्तीपासून परमेश्वराकडे वळणे हाच खरा पश्चाताप आहे असे पवित्र शास्त्र सांगते, (1 थेसलनी 1:9—10)

कोणत्याही प्रकारच्या मूर्तीपूजेचा परमेश्वराला वीट आहे. मूर्तीपूजा म्हणजे काय?

परमेश्वराने निर्माण केलेल्या गोष्टींना, परमेश्वर जो आपला उत्पन्नकर्ता त्यापेक्षा अधिक स्थान देणे. त्या पैसे, सुंदर स्त्री किंवा मानसन्मान इत्यादी असू शकतात.

या निर्माण केलेल्या गोष्टींची निवड करणे म्हणजेच मूर्तीपूजा. याचा अर्थ असा की, निर्माणकर्त्यापेक्षा त्याने निर्माण केलेल्या गोष्टींना महत्त्वाचे स्थान देवून त्यांची भक्ती करणे हेच पापाचे मूळ आहे.

मूर्ती या वस्तू असतात. त्या लाकडापासून किंवा धातूपासून बनविलेल्या असतात. वस्तू ते ज्या देवाची भक्ती करतात त्या देवाचे प्रतिनिधीत्व करतात. परंतु कोणत्याही मनुष्याला विश्व निर्माण कर्त्याच्या सदृश्य असे काहीही त्याच्या हाताने बनविता येणे शक्य नाही.

‘परमेश्वराचे स्मरण करण्यास मदत होते‘ म्हणून आम्ही मूर्ती किंवा चित्र वापरतो असे काही म्हणतात परंतु मूर्ती किंवा चित्र अजिबात वापरू नये. मूर्ती किंवा चित्रे मनुष्यांच्या आकाराची, किंवा स्त्रियांच्या आकाराची किंवा प्राण्याच्या आकराची असोत, सर्व समर्थ परमेश्वराची त्यांच्या सारखी प्रतिमा तयार करणे हे परमेश्वराला कमीपणा आणणारे आहे.

आपल्या उघडया डोळयांना अदृश्य परमेश्वर दिसत नाही आणि मूर्ती किती ही चांगली, सुंदर व कोरीव केली तरी त्यात तो बसू शकत नाही इतका तो महान आहे. देवाचे स्मरण करून देण्यासाठी कोणत्याही दृश्य गोष्टींची आपल्याला गरज नाही. कारण आपली सद्सद्विवेक बुध्दी ही रात्रंदवस आपल्याशी बोलत असते व आपल्या निर्माण कर्त्याची आठवण करून देत असते.

आपल्या सद्सद्विवेक बुध्दीचा आवाज ऐकण्याऐवजी बर्‍याच वेळा मूर्तीपूजा, धार्मिक कार्य आणि तीर्थयात्रा ही केली जातात.

ज्या वेळी लोक परमेश्वराच्या नियमांचे उल्लंघन करतात आणि भविष्यात सुध्दा तसे करण्याचे योजितात. त्यावेळी ते निरनिराळे, धार्मिक विधी व कार्य करून विवेक बुध्दीचा आवाज दाबून टाकत असतात. त्यांना असे वाटते की, बळी देणे, तिर्थयात्रा करणे यामुळे परमेश्वर त्यांच्या सर्व पापांची क्षमा करील. परंतु ही शुध्द फसवणूक आहे.

परमेश्वर आपल्या धार्मिक विधीकडे व धार्मिक कार्याकडे पहात सुध्दा नाही तर आपण आपल्या सद्सद्विवेक बुध्दीचा आवाज ऐकतो की नाही हे जाणून घेण्यासाठी तो आपली अंतःकरणे पाहतो.

पश्चाताप करणे म्हणजे प्रत्येक प्रकारच्या मूर्तीपासून तोंड फिरवणे ! खरा पश्चाताप करताना आपण परमेश्वराने निर्माण केलेल्या वस्तूपासून तोंड फिरवून निर्माण कर्त्याकडे येतो व त्याला म्हणतो ‘सर्व समर्थ परेश्वरा तू एकटाच भक्ती व सेवा करण्यास योग्य असा आहेस. मी आतापर्यंत तू निर्माण केलेल्या वस्तूंची भक्ती करीत होतो. त्याबद्दल मला क्षमा कर. येथून पुढे मी तुलाच माझ्या जीवनामध्ये उच्च स्थान देईन. ‘

पश्चातापाचा अर्थ असा नाही की, आपण आपला कामधंदा सोडून किंवा कुटूंबाचा त्याग करून तसेच साधू बनून कोठेतरी जंगलात किंवा पर्वतावर जावे.

आपल्या सर्वांना आपला संसार असावा व आपण आपल्या उपजिविकेसाठी कमाई करावी, अशी देवाची इच्छा आहे.

पैसा मिळविणे हे पाप नाही. परंतु देवापेक्षा पैशावर जास्त प्रेम करणे हे पाप आहे.

आजच्या पुढारलेल्या जगात मिळणार्‍या आरामदायी गोष्टींचा उपयोग करणे हे पाप नाही. देवावर प्रेम करण्यापेक्षा या आरामदायी गोष्टीवर जास्त प्रेम करणे हे पाप आहे.

देवाने आपल्या शरीराची जडणघडण अशी केली आहे की, ते जेवणाचा आनंद, झोप, लैंगिक समाधान याचा अनुभव घेवू शकते.

या सर्व गोष्टींमध्ये काहीच चूक नाही. नेहमी भूक लागते व थकून जातेा याची आपल्याला जशी लाज वाटत नाही. तशी लैंगिक इच्छेविषयी आपल्याला लाज वाटण्याचे काहीच कारण नाही. पण आपल्याला भूक लागली तर आपण अन्न चोरू नये. आणि आपले काम करत असताना आपण झोपू नये.

त्या प्रमाणेच आपल्या लैंगिक गरजा भागविण्यासाठी आपण दुसर्‍या व्यक्तीला भ्रष्ट करू नये. देवाने विवाहाची स्थापना केली आहे. एका माणसाला एकच पत्नी असावी. अशी त्याची इच्छा आहे, यासाठी की त्याला त्याच्या लैंगिक इच्छा पूर्ण करता याव्यात. लग्न बाहय लैंगिक सबंध हे पाप आहे. आपण आपल्या लैंगिक पापाबद्दल पश्चाताप केला पाहिजे आणि ते सोडून द्यावयास पाहिजे आणि अगदी प्रामाणिकपणे देवाकडे वळावयास पाहिजे.

आणखी एक पाप आहे की, जे तुम्ही पश्चाताप करून सोडून दिले पाहिजे. आणि ते पाप म्हणजे दुसर्‍यांना क्षमा न करण्याची वृत्ती!

देवाने तुमच्या पापांची क्षमा करावी अशी तुमची इच्छा असेल तर ज्यांनी तुम्हाला कसल्याही प्रकारे दुखावले असेल त्या सर्वांची क्षमा करण्याीच तुम्ही इच्छा केली पाहिजे.

ज्याप्रमाणे देवाने तुमची क्षमा केली आहे. त्याप्रमाणे तुम्ही ही इतरांची क्षमा केली पाहिजे आणि जर तुम्ही क्षमा केली नाही तर देव तुम्हाला क्षमा करणार नाही.

प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला ‘परंतु जर तुम्ही मनुष्यांच्या अपराधांची क्षमा करीत नाही, तर तुमचा स्वर्गीय पिता तुमच्या अपराधाची क्षमा करणार नाही. ‘ (मत्तय 6:15)

ज्याने तुम्हाला फारच त्रास दिला आहे अशांची क्षमा करणे हे तुम्हाला अतिशय अवघड जाईल. पण अशा परिस्थितीत तुम्ही प्रार्थना केली पाहिजे व देवाकडे त्या व्यक्तीची क्षमा करण्याकरीता मदत मागितली पाहिजे.

सर्वसमर्थ देव तुम्हाला या बाबतीत मदत करण्यासाठी व शक्ती देण्यासाठी सदैव तयार असतो. सर्वशक्तीशाली देवाने तुम्हाला शक्ती दिली तर तुम्हाला कोणतीही गोष्ट करणे अशक्य वाटणार नाही.

आपली पापे कितीही भयंकर व मोठी असली तरी देव त्या सर्वांची क्षमा करील. आपण फक्त पश्चाताप केला पाहिजे. म्हणजे आपल्या पातकाविषयी आपल्याला खरोखर मनस्वी दुःख वाटले पाहिजे व ती कायमची सोडून देण्याचा आपण निश्चय केला पाहिजे.

विश्वासाविषयीचे खरे सत्य

आपण पश्चाताप केल्यानंतर देवापासून क्षमा मिळविण्यासाठी लागणारी दुसर्‍या एका महत्त्वाच्या गोष्टीची गरज आहे आणि ती गरज म्हणजे विश्वास !

पवित्र शास्त्र म्हणते ‘तुमचे तारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे झाले आहे आणि हे तुमच्या हातून झाले नाही, तर हे देवाचे दान आहे‘ (इफीस 2:8)

कृपा हा देवाचा हात जो आपल्याला मदत करण्यास व आशीर्वाद प्राप्त करून देण्यास आपणापर्यंत पोहचतो आणि विश्वास हा आपला हात जो आपल्याला मदत व आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी देवाच्या हातापर्यंत पोहचतो.

आपण पाहिले की, ठरवून दिलेल्या गोष्टी करणार्‍या यंत्रमानवासारखे आपण विचारहीन असावे, अशी देवाची इच्छा नाही, तर आपण निवड करण्याची शक्ती असलेले असावे अशी त्याची इच्छा आहे.

देव हा चांगला देव आहे आणि तो तुम्हावर अपार प्रेम करतो. यावर तुमचा विश्वास आहे का?

देवाने त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याला या जगामध्ये तुमच्या पापकरीता क्रूस खांबावर मरणासाठी पाठविले, व तीन दिवसांनंतर त्याला मरणातून उठविले. तो ख्रिस्त आज स्वर्गामध्ये जिवंत आहे, यावर तुमचा विश्वास आहे का?

जर असे असेल तर देवाने तुम्हाला देवू केलेली क्षमा तुम्ही याच क्षणाला प्राप्त करून घेऊ शकता. तुम्हाला थांबण्याची गरज नाही.

पाप आणि नरक या पासून सुटका होण्यासाठी येशू ख्रिस्ताच्या नामाव्यतिरिक्त दुसरे कोणतेही नाव या जगामध्ये सापडणार नाही. जर तुम्हाला त्याचा प्रभू व तारणारा म्हणून स्विकार करावयाचा असेल तर लग्नाच्या वेळेस जशी शपथ घेतात त्या शपथेप्रमाणे देवालाच धरून राहावे. लग्नाच्या वेळेस वधू अशी शपथ घेत असते की, मी सर्व सोडून केवळ तुम्हाला धरून राहीन. वधूला तिचे सर्व जुने प्रियकर सोडून फक्त एकाच पुरूषाला आपला पती म्हणून संपूर्ण जीवनभर धरून रहावे लागते.

पवित्र शास्त्रामध्ये आपल्या व येशू ख्रिस्तामधील संबंधाला आध्यात्मिक लग्नाची उपमा दिली आहे. त्यामध्ये तोच (येशूख्रिस्त) फक्त आपला अध्यात्मिक दैवी वर आहे. जोपर्यंत तुम्ही दुसर्‍या देवांची प्रार्थना व भक्ती करता तो पर्यंत तुम्ही असे म्हणूच शकत नाही की, तुम्ही येशूख्रिस्ताचा स्विकार करण्यास तयार आहात! तुम्हाला या दोन्हीमध्ये निवड केली पाहिजे.

जर तुम्हाला निवड करावयाची असेल तर आता हीच वेळ आहे. फक्त गुडघे टेका, डोळे बंद करा व देवाला सांगा. तुम्ही कोठे ही असला तरी तो तुमचे ऐकेल. त्याला तुमचे म्हणणे ऐकण्यात स्वारस्य आहे. अर्थ समजून व हळूच असे म्हणा.

‘हे येशू ख्रिस्ता मी पापी आहे आणि माझ्या सर्व पापापासून तोंड फिरविण्याची माझी इच्छा आहे. माझा विश्वास आहे की, माझ्या सर्व पापांसाठी तू मरण पावलास. मरणातून पुनः उठलास आणि आज तू जिवंत आहेस. कृपा करून माझ्या सर्व पापांची क्षमा कर. तू माझ्या ह्दयात व जीवनात ये व आजपासून तूच माझ्या जीवनाचा प्रभू हो. मी इतर सर्व देव सोडून देतो आणि आजपासून केवळ तुझीच भक्ती करतो.‘

ही फार साधी प्रार्थना आहे व ती करण्यास तुम्हाला एका मिनिटापेक्षा ही कमी वेळ लागेल. तुम्ही ही प्रार्थना अगदी खर्‍या अंतःकरणाने केली तर तुमच्या आत्म्याचे कायमचे तारण होईल. तुम्ही ताबडतोब देवाचे लेकरू बनाल.

पोपटासारखे पुनरूच्चार करून आशीर्वाद देईल, असे हे जादूचे सूत्र नाही. ते सर्वकाही तुमच्या ह्दयाच्या प्रामाणिकपणावर अवलंबून आहे. तुम्ही जे बोलता त्याचा अर्थ तुम्हास समजत असेल तर देव तुमच्या पापांची क्षमा करील. तुमचा स्विकार करील व तुम्हाला त्याचे लेकरू बनवील. जर तुम्ही अप्रामाणिक असाल तर तुमच्यात काहीही बदल न होता तुम्ही तसेच रहाल.

आपल्या पापांची खरोबर क्षमा झाली आहे, देवाने आपला स्विकार केला आहे व आपल्याला त्याची लेकरे बनविले आहे अशी आपली खात्री होणे हे फार महत्त्वाचे आहे. ही खात्री झाल्याशिवाय आपण तसेच असावे हे परमेश्वराला मान्य नाही. ही खात्री आपल्याला देव, पवित्रात्म्याच्या द्वारे देतो. पवित्र आत्मा आपल्या अंतःकरणात येतो व सांगतो की, आपण देवाची लेकरे आहोत. देवसुध्दा त्याच्या वचनाद्वारे आपल्याला खात्री देतो. त्याच्या लिखित शब्दाद्वारे ! (पवित्र शास्त्रातील वचनाद्वारे)

प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, ‘पिता जे मला देतो ते सर्व मजकडे येईल, आणि जो मजकडे येतो त्याला मी घालविणारच नाही. ‘(योहान 6:37)

येशू ख्रिस्ताने दिलेल्या वचनावर आपण सदासर्वकाळ विश्वास ठेवू शकतो. ती प्रार्थना प्रामाणिकपणे तुम्ही येशू ख्रिस्ताकडे केली आहे का? तसे असेल तर तुम्ही खात्रीने त्याच्याकडे आला आहात. तुमची खात्री होऊ द्या की, त्याने तुम्हाला नाकारले नाही. त्याने तुमचा स्विकार केला आहे. जर त्याच्याकडे येण्याचे तुमचे काम तुम्ही केले असेल तर देवाने ही तुमचा स्विकार करण्याचे त्याचे काम नक्कीच केले आहे.

देवाने तुमचा स्विकार केला आहे. हे तुम्हाला वाटो किंवा न वाटो आता तुम्हाला तुमच्या भावनांवर अवलंबवून रहायचे नाही. भावनांचा संबंध आपल्या शरीराशी आहे आणि अध्यात्मिक बाबतीत फसवणूक करणारा आहे. भावनावर विश्वास ठेवणे म्हणजे घराचा पाया वाळूवर घालण्यासारखे आहे. आपण आपला विश्वास देवाच्या शब्दावर व त्याच्या वचनावर ठेवला पाहिजे आणि तसे करणे म्हणजे घराचा पाया खडकावर घालण्यासारखा आहे.

तुम्ही देवाचे लेकरू झाला आहात याविषयी एकदा का तुमची खात्री झाली तर तुम्ही जाहिररित्या (उघडपणे) तसे कबूल केले पाहिजे. पवित्र शास्त्र सांगते की, ‘तुम्ही तुमच्या ह्दयामध्ये जो विश्वास धरीता तो तुम्ही तुमच्या जिव्हेने कबूल केला पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमच्या मुखाने म्हटले पाहिजे की, आता येशू ख्रिस्त हा माझा तारणारा आणि प्रभू आहे. ‘

तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना सांगितले पाहिजे की ख्रिस्ताने माझ्या पापांची क्षमा केली आहे आणि तोच फक्त माझ्या जीवनाचा प्रभू आहे.

खिस्ताबरोबरचे तुमचे हे नाते तुम्ही बाप्तिस्म्याद्वारे प्रगट केले पाहिजे. तुमचे ह्दय व जीवन ख्रिस्ताला देण्याचा तुम्ही निश्चय केला तर शक्य तितक्या लवकर तुम्ही बाप्तिस्मा घ्यावयास पाहिजे. बाप्तिस्मा हा धार्मिक विधी नाही, तर देवाला, मनुष्याला, देवदूतांना आणि सैतानाला जाहीररित्या (उघडपणे) दिलेली साक्ष आहे आणि साक्ष ही की, तुम्ही आता सर्वस्वी येशू ख्रिस्ताचे झाला आहात.

बाप्तिस्म्याच्या वेळेस कोणीतरी ख्रिस्ती व्यक्ती तुम्हाला पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने पाण्यात संपूर्ण बुडविल. (नदी किंवा टँकमध्ये) या साध्या कृतीकऊन तुम्ही या गोष्टी विषयीची साक्ष देता की तुमच्यातील जूना मनुष्य मेला आहे. तुम्ही त्याला चिन्हादाखल पाण्यामध्ये संपूर्ण बुडवून टाकीले आहे.

पाण्यातून वर येण्याने तुम्ही हे स्विकारता की तुम्ही आता नवा मनुष्य झाला आहात (आध्यात्मिकरित्या) मरणातून उठला आहात आणि आता फक्त देवाला संतोषविणे ही एकच तुमची इच्छा आहे.

इतके जरी केले तरी तुम्ही अजून परिपूर्ण झाला नाहीत. पूर्णत्वास जाण्यास तुम्हाला तुमचे संपूर्ण जीवन देखील पुरणार नाही. पण एक मात्र खरे की तुम्ही तुमच्या जीवनाची दिशा बदलली आहे. आता येथून पुढे तुम्हाला देवाला नाराज करावयाचे नाही किंवा पाप करावयाचे नाही.

आताा तुम्ही स्वर्गीय राज्याचे नागरीक झाला आहात. तुम्ही देवाचे लेकरू बनला आहात.

तारणाविषयीचे खरे सत्य

येशू या नावाचा अर्थ तारणारा. तो या जगात याच नावाने आला. तो हेच करण्यासाठी आला. मानवाची पापापासून सुटका करण्यासाठी. तारण हे क्षमेपेक्षा मोठे आहे.

यामधील फरक स्पष्ट करण्याकरीता मला एक उदा. देवू द्या. समजा की, माझ्या घरासमोरील रस्ता दुरूस्त करण्याचे काम चालू आहे आणि तेथे एक खोल खड्डा खणलेला आहे. मी माझ्या लहान मुलाला सांगतो की, तू त्या खड्डयाजवळ जाऊ नकोस कारण तू त्यात पडशील असे समजा की, माझी आज्ञा न पाळता तो त्या खड्डयाजवळ जातो व त्यामध्ये डोकावून पहात असताना तोल जाऊन पडतो. त्या दहा फूटाच्या खोली खड्डयातून तो रडून मला हाक मारतो.

मी तेथे येतो तेव्हा, तो मला म्हणतो की, तुमची आज्ञा मोडल्याबद्दल मला खरोबर फार वाईट वाटते आणि म्हणतो की, मला क्षमा करा आणि समजा मी त्याला असे म्हणतो की ठीक आहे मुला मी तुझी क्षमा करतो व आता मी जातो. अशारीतीची वागणूक करून मी काय केले? मी त्याची क्षमा केली असती पण मी त्याला वाचवू शकलो नसतो.

तारणामध्ये क्षमेपेक्षा अधिक गोश्टींचा अंतर्भाव आहे. जसे मी त्याला तो ज्या खड्डयात पडला आहे त्यातून बाहेर काढणे याचा अंतर्भाव आहे.

येशू ख्रिस्त आपणासाठी हेच करण्यास या जगात आला. आपल्या पापांची तो क्षमा करतो एवढेच नाही तर तो आपल्या पापापासून आपले तारण सुध्दा करतो. कारण तो आपल्याला आपल्या पापापासून तारावयास या जगात आला.

आपण नेहमीच आपल्या सद्सद्विवेक बुध्दीच्या विरूध्द वागून पापाच्या खोल खड्डयात पडतो. असे असताना सुध्दा जर देवाला आपली क्षमा करावयाची असेल तर ती फारच चांगली गोष्ट आहे पण येशू ख्रिस्तविषयीची सुवार्ता हीच की, तो आपली फक्त क्षमाच करतो असे नाही तर पापाच्या दास्यातून सोडवणूक करून आपले तारण सुध्दा करतो.

भूत, वर्तमान व भविष्य या तिन्ह काळात आपल्याला तारणाचा अनुभव घ्यायचा आहे. प्रथम पापदंडापासून आपली सुटका झाली पाहिजे नंतर पापाच्या दास्यातून आपली सुटका झाली पाहिजे. शेवटी ज्या वेळी आपण स्वर्गात जाऊ त्यावेळी पापापासून आपली कायमची सुटका होईल. तारणाचा पहिला भाग हा आपल्या पापक्षमेविषयीचा आपण पूर्वी केलेल्या पापापासून (चूकांपासून) मुक्त होणे या विषयीचा आहे.

पण एवढेच पुरेसे नाही. आपल्याला भविष्यात सुध्दा सरळमार्गी जीवन जगण्यासाठी देवाची गरज आहे. यासाठी देव आपल्याला त्याची शक्ती पुरवितो.

मी एका मनेरूग्णाच्या दवाखान्याविषयीची गोष्ट ऐकली. या दवाखान्यात मनोरूग्णांना उपचारासाठी ठेवण्यात येत असे. मनोरूग्णामध्ये सुधारणा झाली आहे किंवा नाही व ते एका विशिष्ट पातळीपर्यंत आपली विचार शक्ती वापरू शकतात की नाही हे पाहाण्यासाठी त्यांची एकपरीक्षा घेण्यात येत असे ते मनोरूग्णाला एका खोलीत सोडत असत. त्या खोलीत एक पाण्याचा तळ उघडा ठेवीत असत. ज्यातून पाणी सारखे वाहात असे. त्याला जमीन साफ करून सुकविण्यास सांगत असत. जर तो नळ बंद न करता जमीन साफ करू लागला, तर डॉक्टर्स समजत असत की त्यची बुध्दी बरोबर काम करीत नाही.

आपल्याविषयीचा सुध्दा प्रश्न असाच आहे. आपल्यामध्ये असाच एक नळ आहे ज्यातून सारखे पाप वाहत असते. येशू हा, हे आपण केलेले पाप फक्त साफच करीत नाही तर तो नळ बंद करण्यासाठी आपल्याला शक्ती पुरवतो. असे जर नसते तर सुवार्ता ही चांगली बातमीच नसतो !

सुवार्ता ही (चांगली बातमी) ही तारण प्राप्तीसाठी देवाचे सामर्थ्य आहे असे वर्णन सुवार्तेविषयी पवित्रशास्त्रात केले आह. (रोम 1:16)

सामर्थ्याचे उगमस्थान देवाचे वचन आहे. पवित्र शास्त्र हे आपल्या मोहावर विजय मिळवून देवू शकणारे एक शक्तीशाली हत्यार आहे. पवित्रशास्त्रात आपण वाचतो की, देवाच्या वचनाच्या सामर्थ्यानेच येशू ख्रिस्ताने सैतानावर विजय मिळविला. (मत्तय 4:1—11)

आपण रोज देवाचे वचन वाचण्याची सवय वाढविली पाहिजे. यासाठी की, त्याद्वारे देव आपल्याबरोबर बोलू शकेल आणि रोजच्या जीवनातील संघर्षाला तोंड देण्यास शक्ती देईल. पवित्रशास्त्र हे तरूणांना सांगते ‘तरूणांनो मी तुम्हास लिहीले आहे, कारण तुम्ही सबळ आहा. तुम्हामध्ये देवाचे वचन राहाते आणि त्या दुष्टाला तुम्ही जिंकले आहे. ‘ (1 ले योहान 2:14)

देवाच्या सामर्थ्याचा दुसरा उगम म्हणजे देवाचा पवित्र आत्मा. तो आपल्यामध्ये राहाण्यासाठी येतो. आपल्याबरोबर सतत राहाण्यासाठी व दररोज आपणाबरोबर बोलण्यासाठी तसेच जीवनाच्या संघर्षाला तोंड देण्यास शक्ती देण्यासाठी आणि ख्रिस्ताचे शिष्य म्हणून त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालण्यास मदत करण्यासाठी. आपल्यामध्ये वस्ती करण्याची त्याची इच्छा आहे. आपण देवाला विनंती केली पाहिजे की, त्याने आम्हाला सतत पवित्र आत्म्याने भरावे.

प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला ‘जर तुम्ही वाईट असता (पापी) तुम्हास आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल‘ (लूक 11:13)

देवाच्या सामर्थ्याचा तिसरा उगम म्हणजे एकाच विचाराच्या ख्रिस्ती लोकांची सहभागीता !

जेव्हा अनेक कोळसे एकत्र पेटविले जातात त्यावेळेस अग्नी प्रज्वलित होतो. जर एक कोळसा बाहेर काढला तर तो कितीही प्रज्वलित असलता तरी तो लवकर विझतो. जर तुम्ही ख्रिस्ती जनांच्या सहभागीतेत न राहाता देवासाठी एकटेच राहिला तर आपलीही या वेगळया काढलेल्या कोळशासारखी परिस्थिती होईल.

या ठिकाणी आपल्याला एक काळजी घ्यावी लागेल. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, जे स्वतःला ख्रिस्ती म्हणवितात ते सर्वच खरे ख्रिस्ती असतात असे नाही.

खरे पाहिले तर असे म्हणणे उचित होईल की, 90% (नव्वद टक्के) लोक जे आपल्याला ख्रिस्ती म्हणवतात ते खरे ख्रिस्ती नाहीत. ते कोणत्याही ख्रिस्ती मंडळीचे किंवा पंथाचे असोत. कारण त्यांनी पाप करण्याचे सोडून येशू ख्रिस्त आपल्या जीवनाचा प्रभू आहे असे स्विकारण्याचा वैयक्तिक निर्णय घेतलेला नाही. ते आपल्या स्वतःला ख्रिस्ती म्हणवून घेतात कारण त्यांचा जन्म ख्रिस्ती कुटूंबात झाला होता.

जे फक्त नामधारी ख्रिस्ती आहेत तंना आपण टाळले पाहिजे आणि जे अनुभवाने ख्रिस्ती झाले आहेत व जे त्यांच्या रोजच्या जीवनात येशू ख्रिस्ताला अनुसरतात अशाशीच आपण सहभागीता ठेवली (केली) पाहिजे. जेव्हा आपण ख्रिस्ताला आपला प्रभू व तारणारा म्हणून स्विकारतो, पवित्रशास्त्र सांगते तर आपण वरून जन्मलेले आहोत. कारण आपण देवाची लेकरे झालो आहेत. देव आता आपला पिता आहे. आणि आपल्या जगीक पित्यासारखा देवसुध्दा आपल्या जीवनास लागणार्‍या गरजा दोन्ही शारीरिक व अध्यात्मिक भागविण्यास उत्सुक (असतो) आहे.

प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की, जर आपण आपल्या आयुष्यामध्ये परमेश्वराची आवड काय आहे याकडे प्रथम लक्ष दिले तर आपल्या जीवनाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त होतील.

तो म्हणाला, ‘तर तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळविण्याची खटपट करा, म्हणजे या बरोबर ती ही तुम्हास मिळतील‘ (मत्तय 6:33)

देवाच्या लेकरांना देवाने एक विशेष अधिकार दिला आहे. आणि तो म्हणजे प्रार्थना करण्याचा अधिकार! सर्व समर्थ देवाशी बोलण्याचा, आत्म्यात देव त्यांच्याशी बोलताना ऐकण्याचा! सर्व साधारणपणे आपल्या कानाला ऐकू येईल अशा आवाजात देव आपल्याशी बोलत नाही, तर तो आतल्या आत आपल्या आत्म्यावर प्रभाव पाडतो. जो ऐकू येणार्‍या आवाजासारखा असतो. आपल्या अंतःकरणावर जे काही ओझे आहे ते सर्व देवाला सांगण्यासाठी येशू आपल्याला प्रोत्साहीत करीत असतो.

पुष्कळ लोक शांतपणे स्वतःच सर्व काही सहन करीत असतात. कारण त्यांना आपले दुःख व्यक्त करण्यासाठी कोणीच नसते. पण देवाच्या लेकराला स्वर्गीय पिता असतो, ज्याला तो आपली सर्व दुःखे सांगत असतो. आपला स्वर्गीय पिता आपल्याला या जगामध्ये लागणार्‍या सर्व गरजा पुरवितो यावर त्याला विश्वास असतो.

येशू ख्रिस्ताने आपल्याला शिकविले आहे की, ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला बदल घडवून आणावयाचा असेल तर त्या बदलण्यास तुम्ही देवाला सांगा. हा प्रार्थनेचा चमत्कार आहे. ज्या सर्व गोष्टी नशीबात होत्या म्हणून आपण स्विकारतो. (जे घडले ते परमेश्वराची इच्छा असे आपण म्हणतो) त्या जर आपल्याला व आपल्या कुटूंबाला हानीकारक असतील तर त्या आपल्याला स्विकारावयाच्या नाहीत. भाग्यावर विश्वास ठेवणे, हे देवाच्या इच्छेला शरण जाणे यापेक्षा फार वेगळे आहे. आपल्याला ज्याची गरज आहे ते देवाला मागा असे सांगितले आहे. ‘माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पुरविल‘ (फिलीप 4:19)

पणप्रत्येक शहाण्या पित्यासारखा देव सुध्दा आपल्याला जे काही पाहिजे किंवा आपण जे काही मागतो ते देणार नाही. आपल्याला ज्याची गरज आहे आणि आपल्याकरीता त्याला जे चांगले दिसते तेच तो आपल्याला देईल.

देव हा चांगला आहे आणि त्याच्या लेकरांचे कोणत्याही प्रकारे वाईट होऊ नये अशी त्याची इच्छा आहे. म्हणून आपण त्याच्याकडे धैर्याने जाऊ शकतो. आणि सर्व वाईटापासून आम्हास सोडीव असे सांगू शकतो.

जगामध्ये पुष्कळ लोक त्यांच्यावर कोणीतरी जादू—टोणा किंवा काळी जादू केल्यामुळे दुःखात आहेत. जर तुम्ही तुमचे ह्दय व जीवन ख्रिस्ताला दिले असेल तर अशा प्रकारच्या सैतानी कार्यापासून तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. सैतानाला हाकलून लावण्यासाठी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त (ज्याने सैतानाचा बिमोड केला) याचे नाव घेऊ शकता.

कोणत्याही प्रकारचे मंत्र—तंत्र अथवा जादू तुम्हाला किंवा तुमच्या लेकरांना कधीही स्पर्श करू शकणार नाही. जर तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात विरोध करून त्यांना धमकावले तर! जर तुम्ही तुमची सुटका होण्यासाठी येशू ख्रिस्ताच्या नावाचा धावा कराल, तर तुम्हावर केलेल्या जादूटोण्याची शक्ती आता, या क्षणी काढून टाकली जाईल.

पवित्रशास्त्र सांगते की, येशूख्रिस्त ज्यावेळी क्रूस खांबावर मरण पावला त्यावेळी त्याने सैतानाचा पराभव केला व त्याची शक्ती काढून घेतली. हे तर घडलेले आहे. पण तुमच्या पापाच्या क्षमेविषयी येथे सुध्दा सैतानाचा पराभव झाला आहे हे सत्य जोपर्यंत तुम्ही स्विकारत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये सैतानाचा पराभव झाला आहे हे सत्य तुम्हाला पटणार नाही.

आपल्या मृत्यूने येशूने सैतानाची शक्ती तोडली त्याप्रमाणेच जे जीवनभर सैतानाच्या दास्याच्या भयाखाली जगत होते त्यांची त्याने सुटका केली. (इब्री 2:14—15)

तुम्ही स्वतःला नम्रपणे देवाच्या स्वाधीन करता आणि सैतानाचा प्रतिकार करा. म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. (याकोब 4:7)

आपण देवाची लेकरे झाल्यावर सुध्दा देव सैतानाला आपल्याला मोहात पाडायला लावणारच. कारण त्यामुळे आपण शक्तीशाली बनणार आहोत. सैतानाच्या सर्व हल्ल्यांचा प्रतिकार करून त्यावर विजयी होण्यासाठी आता देवाच्या पवित्रआत्म्याचे सामर्थ्य आपणामध्ये वस्ती करीत आहे.

देवोने त्याच्या लेकरांचे या जगातील जीवन परीक्षा व समस्या विरहीत असेल असे वचन दिले नाही.

जन्मापासून लाडावून ठेवल्यामुळे बिघडलेल्या श्रीमंत लोकांच्या लेकरासारखे आपण नसावे, तर चढउताराचे (संघर्षमय)जीवन असलेले आणि शक्तीशाली असे असावे अशी देवाची इच्छा आहे. आपल्याला शक्तीशाली बनविण्यासाठी इतर लोकांप्रमाणे तो आपल्याला परीक्षा आणि समस्या यांना तोंड द्यावयास लावतो.

ज्याप्रमाणे आपण प्रत्येक परिस्थितीत देवाच्या अद्भूत मदतीचा अनुभव देवू शकतो त्याप्रमाणे अनेक कठीण परीक्षामध्ये आपल्याला देवाची अधिकाधिक ओळख होते.

अनंतकाळाविषयीचे खरे सत्य

जो देवाचे लेकरू बनतो त्याच्यासाठी क्षणिक गोष्टीपेक्षा अनंतकाळच्या जीवनविषयीच्या गोष्टी फार मौल्यवान असतात. या जगाचे मोल अधिक वाटण्यापेक्षा स्वर्गाचे मोल त्याला अधिक वाटू लागते.

दोन हजार (2000) वर्षापूर्वी मृत्यूतून उठल्यानंतर स्वर्गात जाताना येशू श्रिस्ताने तो या जगात पुनः येईल असे वचन दिले होते. येशू—ख्रिस्ताचे पुनः दुसर्‍यांदा येणे असा त्याचा निर्देश केला आह. जगाच्या इतिहासामध्ये ही दुसरी मोठी घटना आहे.

ज्या दिवशी येशू ख्रिस्त या जगात पुनः येईल त्या दिवशी आपल्या संपूर्ण आयुष्याचा हिशोब देवाला द्यावाच लागणार आहे याची जाणीव देवाच्या प्रत्येक लेकराला आहे.

सार्वकालिक जीवनाकडे प्रवास करताना हे जग परिवर्तन (बदल) होण्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी आपण परीक्षा काळात आहोत. जीवनाच्या वेगवेगळया परिस्थितीमध्ये आपण स्वर्गाच्या सार्वकालिक गोष्टींची निवड करतो, की, या जगाच्या तात्पुरत्या गोष्टी निवडतो याची देव आता परीक्षा पहात आहे.

जर आपण शहाणे असू तर, ज्या गोष्टींना सार्वकालिक मूल्य आहे अशा गोष्टींचीच निवड आपण करू..

लहान बाळ हे चमकणारे व रंगीत कागद निवडेल. ते 500 रूपयाची चलीन नोट निवडणार नाही. कारण लहान बाळाला मूल्यमापन करण्याची बुध्दी नसते. ज्या वेळेस आपण स्वर्गीय व सार्वकालिक गोष्टींची निवड करण्याऐवजी जगीक गोष्टींची निवड करतो त्या वेळी आपण त्या लहान बालकासारखे वागतो.

देवाने पवित्रशास्त्रात आपल्याला स्पष्ट सांगितले आहे की, ‘हे जग व या जगातील सर्व गोष्टी नाहीशा होतील.‘

म्हणून या जगातील क्षणिक गोष्टींसाठी जगणे म्हणजे ज्या बँकेचे लवकरच दिवाळे निघणार आहे त्या बँकेत पैसे ठेवण्यासारखे आहे.

शहाणा मनुष्य, जी बँक सुरक्षित व टिकाऊ आहे त्याच बँकेत आपले पैसे ठेवील. हयाच प्रकारे जे खरेच शहाणे आहेत ते ज्या गोष्टींना सार्वकालिक मूल्य आहे त्या म्हणजे आपल्या चारित्र्या संबंधीच्या गोष्टी. आपी शुध्दता, प्रेम, चांगुलपणा, क्षमाशीलता, नम्रता इत्यादी गोष्टीसाठीच जगतील. याच सर्व गोष्टी, ज्या वेळी आपण हे जग सोडून जाऊ त्या वेळी आपल्याला आपल्या बरोबर घेऊन जाता येतील.

पवित्रशास्त्र सांगते की, जे आपल्या पापांचा पश्चाताप न करता मरतात, त्यांचा शेवट फार भयंकर होणार आहे.

ज्या अर्थी मनुष्यास एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेविले आहे (इब्री 9:27)

एकदा मनुष्य मेला की, त्याला स्वतःला बदलण्याची संधी पुनः मिळू शकत नाही. अशा माणसाला देव सुध्दा बदलू शकत नाही कारण देव माणसाच्या इच्छेविरूध्द त्याचा बदल करीत नाही. या जगामध्ये जीवंत असतानाच जर आपली बदलण्याची इच्छा असली तरच देव आपला बदल करू शकतो.

भविष्यात येणार्‍या त्या दिवशी प्रत्येक मनुष्य, जो या भूतलावर जीवन जगला होता, त्याला त्याच्या जीवनाचा हिशोब देवाला देण्यासाठी मेलेल्यातून उठविले जाईल. पवित्रशास्त्र दोन पुनरूत्थानाविषयी सांगते— मृत शरीरे, ज्यांची माती झाली आहे त्यांना देवाच्या दैवी शक्तीने देहधारी असे उठविले जाईल. जे धार्मिक लोक, ज्यांनी ख्रिस्ताचा स्विकार केला होता, ज्यांच्या पापांची क्षमा झाली होती आणि या जगामध्ये राहत असताना जी देवाची मुले झाली होती अशांचे पहिले पुनरूत्थान!

पापांची क्षमा न होता मेलेले ज्यांनी ख्रिस्ताचा आपला तारणारा व प्रभु म्हणून स्विकार केला नाही अशांचे दुसरे पुनरूत्थान!

पापांचा पश्चाताप न करता व पापापासून क्षमा मिळण्याकरीता येशू ख्रिस्तावर विश्वास न ठेवता जर एखादा मनुष्य मेला तर एक दिवस देवाच्या न्यायासनासमोर त्याचा न्याय होईल. जेथे त्याच्या संपूर्ण जीवनाचे पुनरावलोकन करण्यात येईल. आणि नंतर आपल्या पापाबद्दल तो सार्वकालिक न्यायासाठी पात्र आहे, असे सर्व विश्वाला जाहीर करण्यात येईल.

त्याला नंतर अग्नीच्या सरोवरामध्ये सदा सर्वकाळ टाकण्यात येईल, ही कधीही न संपणारी शिक्षा असेल. ज्यांनी येशू ख्रिस्ताला नाकारले आहे त्या सर्वांना अशा भयानक भविष्याला अनंतकाळ तोंड द्यावे लागेल.

या विश्वामध्ये ज्याने पापाची सुरूवात केली आणि जो मनुष्याला पापामध्ये पाडण्यास कारणीभूत झाला होता, तो सैतान प्रथम या अग्नीच्या सरोवरात टाकला जाईल.

या व्यतिरिक्त ज्यांनी स्वतःला नम्र केले, आपल्या पापांचा स्विकार केला, त्यांची कबूली दिली, त्यांचा त्याग केला आणि येशू ख्रिस्ताच्या क्रूसावरील मरणाद्वारे देवापासून मिळालेल्या क्षमेचा स्विकार केला त्या सर्वांचा स्वर्गीय आनंदात प्रवेश होईल त्या ठिकाणी ते देवासमवेत आणि ख्रिस्तासमवेत सदासर्वकाळ राहतील.

स्वर्ग ही शुध्द, शांत व आनंदमय जागा आहे. जेथे देवदूत आणि ज्यांचे पापापासून तारण झाले आहे अशी मानवजात देवाची आराधना व स्तूती करतील. ते अनेक मार्गांनी सदासर्वकाळ त्याची स्तुती करतील.

आपले प्रियजन जे आपल्या अगोदर हे जग सोडून गेले ते आपल्या तारणासाठी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून, जर देवाची लेकरे म्हणून मेले असतील तर अशा प्रियजनांना पुनः भेटण्याची आनंदमय जागा स्वर्ग ही आहे.

जे देवाचे खरे लेकरू आहे ते आपल्या देवाबरोबर सदासर्वकाळ राहण्यासाठी त्या वैभवशाली दिवसाची वाट पाहात असते.

आता तुम्हाला खरे सत्य समजले. या विषयी तुमची काय प्रतिक्रिया असणार?

येशू ख्रिस्ताने तुमच्या पापांची क्षमा करावी व तुम्हाला देवाचे लेकरू बनवावे म्हणून तुम्ही त्याची प्रार्थना केली आहे का?

ती प्रार्थना करण्याची वेळ हीच आहे. देव तुमच्या आत्म्याशी बोलत आहे. आपल्यापैकी कोणीच सांगू शकत नाही, की आपण कधी मरू व हे जग सोडून जाऊ.

यापैकी एक या पृथ्वीवरील आपला शेवटचा दिवस असू शकेल. तो दिवस येण्यापूर्वी तुमच्या पापांची क्षमा झाली आहे आणि तुमची देवाला भेटण्याची तयारी झाली आहे याची तुम्ही खात्री करा.

English Source   अनुवादक :     छपाई फोर्मेट    तुमचा मित्राला पाठविणे
तुमचा मित्राला पाठविणे | सप्ताह का संदेश | देविक लेख | संपर्क साधणे

© Copyright - Christian Fellowship Church , Bangalore. (INDIA)