English shape=

देविक लेख - ARTICLES

हया काळाची गरज लक्षात घेवून काही वर्षांच्या कालावधीमधील प्रत्यक्ष अनुभवातून लिहीलेले लेख आहेत.
Other Articles List
तर मनुष्याला काय लाभ? - झॅक पूनेन

प्रिय वाचकांनो, मी तुम्हांला विनंती करतो की, ही हस्तपत्रिका न वाचता फेकून देऊ नका. ती वाचायला तुम्हांला फक्त पाचच मिनिटे लागतील. जर तुम्ही ही हस्तपुस्तिका पूर्वग्रह न बाळगता, मनमोकळेपणाने वाचली आणि देवाला तुमच्या अंतःकरणाशी बोलू दिले, तर माझी खात्री आहे की, पाच मिनिटे घालवल्याबद्दल तुम्हांला कधीच परतावा होणार नाही.

मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपल्या जीवाचा नाश करून घेतला, तर त्याला काय लाभ (मार्क 8:36) देव आज संबंध मानव—जातीला नव्हे प्रत्येक व्यक्तीला हा प्रश्न विचारीत आहे. मनुष्याने खूप पैसा कमवला आणि या जगात आयुष्यभर तो ऐषारामात राहू लागला, पण त्याने आपला जीव गमावला म्हणजे मेल्यानंतर अनंतकाळ त्याला अग्निनरकात घालवावा लागला, तर त्याला काय लाभ? आजकाल देवाच्या सनातन पवित्रतेकडे जाणून बुजून दुर्लक्ष करण्याची सवयच मनुष्याला लागली आहे. परिणामी जग पापामध्ये अधिकाधिक खोल बुडत चालले आहे. नैतिक आदर्शाची पातळी खालावली आहे. पवित्रता आणि कायदा यांना तुच्छ लेखले जात आहे आणि विश्वाच्या निर्माणकर्त्यांकडे सर्वस्वी दुर्लक्ष झाले आहे. पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे. त्यांच्या मनात येणार्‍या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले (उत्पत्ती 6:5)ध

देव कितीही दयाळू आणि प्रेमळ असला, तरी देवाचे पावित्र्य पाप सहन करू शकत नाही. देव त्यांच्या पवित्र वचनात म्हणतो, ‘तिच्यात (स्वर्गात) कोणत्याही निषिध्द गोष्टींचा प्रवेश होणारच नाही‘ (प्रकटी 21:27). याचाच अर्थ कोणतीही व्यक्ती स्वहक्काने स्वर्गात प्रवेश करू शकणार नाही, कारण देव म्हणतो, ‘सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला ते अंतरले आहेत‘ (रोम 3:23). यामुळे सर्व मानवजातच नरकाची भागीदार झाली आहे. सर्व पापी लोकांवर देवाच्या कोप होणार आहे. ‘आपल्या क्रोधाने मोहात पडून तू अपमान करण्यास प्रवृत्त होऊ नको. हा खंड भारी आहे म्हणून बहकू नको ‘ (ईयोब 36:18) तर मग मनुष्याजवळ सोने अन् चांदी असून काय उपयोग? देव म्हणतो, ‘मनुष्याला एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे‘ (इब्री 9:27).

सबंध जगच देवासमोर दोषी असताना कोणाचा बचाव होईल? स्वर्गाचे वतन कोणाला मिळेल ? देवाने त्याच्या अमर्याद प्रीती आणि दयेला अनुसरून एक मार्ग सिध्द केला आहे— त्या मार्गाद्वारे कोणीही मानवप्राणी— मग तो गरीब असो अथवा श्रीमंत. तरूण असो अथवा वृध्द आणि तो कितीही पातकी असो, तो स्वर्गात प्रवेश करू शकतो आणि अनंतकाळ तेथे घालवू शकतो. देवाची सनातन पवित्रता पाप सहन करू शकत नाही, म्हणून मनुष्याच्या वतीने कोणातरी परिपूर्ण व्यक्तीने पापांची शिक्षा भोगायला पाहिजे होती. देवाला परिपूर्ण अर्पण — यज्ञबळी देण्याची गरज होती. यासाठी की,पवित्र आणि न्यायी देवाने पिढयानुपिढया मानवजातीला पापांची क्षमा करावी. परंतु मनुष्यजातीत कोणीच परिपूर्ण आढळला नाही, म्हणून देवाने मानवावरील सनातन प्रीतीमुळे आपला एकुलता एक पुत्र येशु ख्रिस्त या जगात 2000 वर्षापूर्वी मनुष्यरूपात पाठवला. तो या जगात परिपूर्ण पापरहित मानव म्हणून राहिला. तो देव होता आणि मानव होण्यासाठी त्याने स्वतःला लीन केले. कारण त्याची तुमच्यावर, माझ्यावर आणि जगातल्या प्रत्येक व्यक्तीवर प्रीती होती. तो कलवरीच्या वधस्तंभावर खिळला गेला. सर्व पिढयांतील सर्व मानवांसाठी तो परिपूर्ण असे अर्पण झाला. तुमच्या आणि माझ्या पातकांसाठी त्याचे मूल्यवान रक्त सांडले गेले. त्याने पवित्र देवाच्या ज्या काही अपेक्षा होत्या, त्या पूर्ण केल्या. येशू ख्रिस्त वंधस्तंभावर खिळल्यानंतर तिसर्‍या दिवशी मेलेल्यांमधून पुनः उठला आणि लगेचच स्वर्गात चढून गेला. आज देवाचा पुत्र येशू ख्रिस्त स्वर्गात देवपित्याच्या उजव्या हाताला बसलेला आहे. या शेवटल्या दिवसांत तो सर्व पिढयांतील स्त्री पुरूषांचा न्याय करायला पृथ्वीवर येणार आहे.

आमच्या पातकांसाठी येशू मरण पावला असा विश्वास ठेवून जे येशू ख्रिस्ताला अंतःकरणात आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारतील त्यांना आज देव सार्वकालिक जीवन म्हणजे स्वर्गात— अनंतकाळ देवाच्या प्रत्यक्ष सानिध्यात राहण्याचे जीवन देऊ करीत आहे. मनुष्याने आपल्या पापाबद्दल पश्चाताप करून येशू ख्रिस्ताला अंतःकरणात घेतल्याबरोबर तो मरणाकडून जीवनाकडे, नरकाकडून स्वर्गाकडे जातो. तुम्ही विश्वास ठेवला, तर आज तुम्हांलाही हा अनुभव येऊ शकतो. तुमचे पृथ्वीवरील जीवन संपल्यावर तुम्ही आपला अनंतकाळ स्वर्गामध्ये घालवाल— तसे देवांचे अभिवचन आहे. जे येशूवर विश्वास ठेवतात. त्यांच्यासाठी येशू ख्रिस्ताने स्वर्गात जागा तयार केली आहे. तो म्हणाला, मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे मी पुन्हा येऊन तुम्हांस आपल्याजवळ घेईन. यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. (योहान 14:3). आणि तो म्हणतो ते शब्दशः खरे आहे. देव म्हणतो, ‘आकाश व पृथ्वी ही नाहीशी होतील, परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाहीत‘.(मत्तय 24:35)

मनुष्याने या जगातील आपल्या अल्पशा आयुष्यात सत्ता आणि प्रसिध्दी मिळविली आणि जर त्याला आपला अनंतकाळ देवापासून दूर अग्निनरकात घालवावा लागला, तर त्याला काय लाभ ? या जगात माणसाने आपले नाव कमावले आणि त्याचे देवाबरोबरचे संबंध सुरळीत नसले, तर त्याला काय लाभ? देव पक्षपाती नाही. त्याने राजे निर्माण केले, त्याने भिकारी निर्माण केले, त्याने आशियन लोक निर्माण केले, त्याने युरेापियन लोक निर्माण केले. सर्वजण त्याच्या दृष्टीसमोर समान आहेत, तो तुमच्यावर प्रीती करतो— म्हणून त्याने ही अद्भुत सोय तुमच्यासाठी केली आहे. तुम्ही कितीही दृष्ट असला, तरी या सोयीमुळे तुम्ही त्याच्याबरोबर स्वर्गात आपला अनंतकाळ घालवू शकाल.

देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे (योहान 3:16). प्रिय वाचकांनो, तो निर्णय तुम्ही आजच का घेत नाही ? देव तुमच्यावर प्रीती करतो आणि त्याने आपला पुत्र तुमच्यासाठी मरण्यास दिला. तुम्ही यावर विश्वास ठेवून येशू ख्रिस्ताला आपले जीवन आजच का देत नाही ? ज्या क्षणी तुम्ही हे कराल त्याच क्षणी तो तुमच्या अंतःकरणात येईल आणि तुम्हांला सर्व बुध्दिसामर्थ्यापलिकडे असलेल्या शांतीचा अनुभव येईल. प्रत्यक्ष जीवंत देवाची शांती तुमचे अंतःकरण भरून टाकील. तुमच्या सर्व पापांची क्षमा होईल आणि देव स्वतः तुम्हांला आशीर्वाद देईल. का तुम्हांला पाप,दुःख आणि पीडेमध्ये रहायला आवडेल? तुम्ही कोणीही असा— हिंदु, मुसलमान, अथवा ख्रिस्ती कुटूंबात जन्मलेली व स्वतःस ख्रिस्ती म्हणविणारी एखादी व्यक्ती— तुम्हांला देवाचे मूल होण्यासाठी येशू ख्रिस्ताला स्वीकारायलाच हवे. देव म्हणतो, ‘..... तारण दुसर्‍या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नावा आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.‘ (प्रेषित 4:12). येशू ख्रिस्त म्हणाला, ‘मार्ग..... मीच आहे. माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याजवळ कोणी जात नाही‘ (योहान 14:6). तुम्ही काय म्हणता अथवा तुम्हांला काय वाटते, त्यापेक्षा देव काय म्हणतो ते महत्त्वाचे आहे. देव म्हणतो, ‘मुनष्याला एक मार्ग सरळ दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्युपथ फुटतात‘ (नीति.16:25). ‘पापाचे वेतन मरण आहे. पण देवाचे कृपादान आपल्या प्रभु येशू ख्रिस्तामध्ये सर्वकालचे जीवन आहे‘.(रोम 6:23)फ

तुम्ही कोणाची सेवा करणार हे आज ठरवा (यहोशबा 24:15).
तुम्ही दोहो मतांमध्ये कोठवर लटपटाल (1 राजे 18:21).
देवाशी समेट तू आताच कर, देवाशी समेट तो दाखवतो तसा ।
ख्रिस्ताकडे ये त्याने रक्त सांडले, क्रुसाजवळ देवाशी समेट कर ।।
येशू ख्रिस्त म्हणतो, पहा मी दाराजवळ उभा आहे व दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याजबरोबर जेवीन आणि तो मजबरोबर जेवील (प्रकटी 3:20).
येशू ख्रिस्त म्हणतो, मी तान्हेल्याला जीवनी झर्‍यांचे पाणी फुकट देईन (प्रकटी 21:6).
येशू ख्रिस्त म्हणतो, जो मजकडे येतो त्याला मी कधीही घालविणार नाही. (योहान 6:37)

English Source  ಅನುವಾದಾ : ಜಾನ್     छपाई फोर्मेट    तुमचा मित्राला पाठविणे
तुमचा मित्राला पाठविणे | सप्ताह का संदेश | देविक लेख | संपर्क साधणे

© Copyright - Christian Fellowship Church , Bangalore. (INDIA)