English shape=

देविक लेख - ARTICLES

हया काळाची गरज लक्षात घेवून काही वर्षांच्या कालावधीमधील प्रत्यक्ष अनुभवातून लिहीलेले लेख आहेत.
Other Articles List
देवाचा आशिर्वाद अथवा देवाची मान्यता— झॅक पूनन


देवाचा आशिर्वाद शोधणारे व देवाची मान्यता शोधणारे असे दोन प्रकारचे विश्वासी आहेत व ते दोन्ही संपूर्णपणे एकमेकापासून वेगळे आहेत. प्रकटीकरण 7:9—14 मध्ये मोजताही येणार नाही. अशा मोठया जनसमुहाविषयी आपण वाचतो. त्याची साक्ष ही अशी कि त्यांनी आपले झगे कोकर्‍याच्या रक्तात धुवून शुभ्र केले व मुक्ती त्यांना देवापासून मिळाली. किंवा दुसर्‍या शब्दात सांगायचे तर देवाने त्यांना आशिर्वाद दिला आहे हे चांगले आहे. यात शंकाच नाही. पण प्रकटीकरण 14:1—5 मध्ये उल्लेखलेल्या विश्वासी समुहापासून ही साक्ष अफाट वेगही आहे.

तिथे आपण मोजता येईल अशा लहान समुहाविषयी वाचतो. खरे पाहता 144000 ही खूप लहान संख्या आहे. पृथ्वीवर रहात असलेल्या प्रचंड संख्येमधून ते निवडले गेले आहेत. हे लक्षात येईल. त्यांची साक्ष ही की पृथ्वीवर ते पूर्णपणे येशूला अनुसरून चालले. त्यांच्या मुखामध्ये कपट आढळले नाही आणि स्त्रीपासून कलंकित न होता त्यांनी स्वतःला शुध्द ठेवले. (स्त्री म्हणजे प्रकटीकरण मध्ये उल्लेखलेला बाबेल व तिची कन्या) किंवा दुसर्‍या शब्दात सांगावयाचे म्हणजे त्यांनी देवाला संतोषविले.

फरक लक्षात घ्या— पहिल्या समुहाने देवाचा आशिर्वाद मिळवला व दुसर्‍या समुहाने देवाची मान्यता मिळविली. आपण जे शोधतो ते मिळवतो. जर आपण देवाच्या आशिर्वादामध्ये तृप्त राहिलो तर फक्त तेच आपणांस मिळेल आणि जर फक्त भौतिक आशिर्वादामध्ये आपण तृप्त असलो तर आत्मीक आशिर्वाद मिळवण्यास आपण पुढे जाणारच नाही.

बहुसंख्य विश्वासी देवापासून आशिर्वाद मिळाल्यामुळे तृप्त असतात आणि ते सुध्दा बहुतेक फक्त भौतिक वस्तुपुरते मर्यादित. आणि म्हणूनच रोगमुक्त कसे व्हावे? दशमांश देवून श्रीमंत कसे व्हावे. इ. विषयीच्या पुस्तकांनी ख्रिस्तीय पुस्तकांमध्ये भरून गेली आहेत. शारिरीक व भौतिक वस्तुंची समृध्दी, आरोग्य आणि भरभराट यावर जोर दिला जातो. हे स्वकेन्द्रीत जीवनाचे स्पष्ट लक्षण आहे. तरी देवाच्या वचनामध्ये आपण वाचतो कि तो सर्वांसाठी हयाकरीता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरीता नव्हे तर त्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याजकरीता जगावे किंवा दुसर्‍या शब्दात सांगायचे तर स्वतःला नाही तर फक्त त्याला प्रसन्न करण्याकरीता जगावे. किंवा आणि दुसर्‍या रितीने सांगायचे तर येशू आपणास स्वकेंद्रीत जीवनापासून सुटका करून दैव केंद्रीत जीवन जगावे यासाठी मेला.

आजकाल संपूर्णपणे तडजोड करणारी बहुतेक ख्रिस्तीय कार्यांना देव ज्याप्रकारे आशिर्वादीत करीत आहे ही गोष्ट आपणांस घोटाळयात पाडणारी आहे. तडजोड करणारे व देवाच्या वचनापासून बाजूला वळणारे यांच्यामुळे देव अस्वस्थ होत नाही असा याचा अर्थ आहे का? नाही. खरोखर असा याचा अर्थ नाही. ज्याला देव खरोखरच मान्यता देवू शकत नाही अशा अनेक सेवेलाही तो आशिर्वाद देतो.

जेव्हा मोशेने देवाची आज्ञा न जुमानता खडकावर प्रहार केला (जेव्हा देवाने त्याला खडकाशी बोलण्यास सांगितले होते) तरीही देवाने त्याची ‘आज्ञा न माननारी सेवा‘ आशिर्वादीत केली. या घटनेमुळे 2 लक्ष लोकांना आशिर्वाद मिळाला. तरी देवाने अवज्ञा करणार्‍या आपल्या सेवकाबरोबर नंतर कठेारपणे व्यवहार केला. (गण 20:8—13) देवाने त्या सेवेला आशिर्वाद दिला कारण आपल्या सेवकाने जे केले त्याला मान्यता देवून नाही तर 2 लक्ष गरजवंत लोकांवर त्याने प्रेम केले म्हणून. आजसुध्दा हे असेच आहे.

ज्यांना मुक्तीची, रोग बरे होणे इत्यादिची गरज आहे. अशा गरजवंत लोकांवर देव प्रेम करतो. म्हणून अनेक सेवकांना आशिर्वाद मिळाला आहे. पण आज येशूच्या नावावर जे चालले आहे हे देवाला खरोखर मान्य नाही. तो अशा तडजोड करणार्‍या बोधकांना यथायोग्य वेळी निश्चितपणे शिक्षा देईल.

देवापासून भौतिक अशिर्वाद मिळण्यास एकच शर्थ आहे. ती म्हणजे तुम्ही कसेही असा. चांगले असा किंवा वाईट असा. येशू म्हणाला कि तो वाईटावर व चांगल्यावर आपला सूर्य उगवितो. नितीमानावर व अनितीमानावर पाऊस पाडतो. (मत्ती 5:45) म्हणून जीवनामध्ये भौतिक अशिर्वाद असणे हे देवाच्या मान्यतेचे चिन्ह नाही. 2 लक्ष इस्त्रायली लोकांनी अरण्यामध्ये 40 वर्षे देवाची अवज्ञा केली. म्हणून देव त्यांच्यावर फारच रागावला होता. (इब्री 3:17) तरी पण देवाने या सर्व वर्षामध्ये त्यांना अन्न आणि आरोग्य दिले. आणि ते सुध्दा अतिशय आश्चर्यकारक रितीने. (अनु. 8:3) जरी भौतिक क्षेत्रामध्ये आश्चर्यकारक रितीने उत्तरे मिळालेली असली तरी देव त्या व्यक्तीच्या जीवनाविषयी संतुष्ट आहे. हे दर्शविले जात नाही.

देवाची मान्यता, दुसर्‍या बाजूला— जेव्हा येशू 30 वर्षाचा होता तेव्हा त्याच्यावर ती विश्राम पावली. ती फक्त एका कारणासाठी कि या सर्व वर्षांमध्ये येशूने विश्वसनीय होऊन सर्व परीक्षांवर विजय मिळवला. तो स्वकेंद्रीत जीवन नव्हे तर आपल्या पिलामध्ये केन्द्रीत जीवन जगला. स्वतःला संतुष्ट करण्यासाठी त्याने काहीच केले नाही. (रोम 15:3) त्याच्या बाप्तीस्म्याच्या वेळी पित्याने त्याच्याविषयी अशी साक्ष दिली की ‘हा माझा प्रिय पुत्र आहे. त्याच्याविषयी मी अतिशय संतुष्ट आहे‘. अशी साक्ष दिली नाही की ‘हा माझा अतिप्रिय पुत्र ज्याला मी आशिर्वाद दिला आहे‘.

दुसर्‍या साक्षीला काही अर्थ नाही. पण पहिली साक्ष देवाची मान्यता दर्शविते. याचा अर्थ सर्वकाही येशूसाठी आहे. येशूचे अनुकरण करणे याचा अर्थ हिच साक्ष आपली साक्ष असण्यासाठी प्रयत्न करणे होय.

आपण सर्वजण आदमची संतती असल्यामुळे जन्मतः स्वकेन्द्रीत आहेात. सर्वांनी आपल्या भोवती परिभ्रमण करावे आणि सर्वांनी आपली सेवा करावी. या अपेक्षेने आपण वाढतो. जेव्हा आपले परिवर्तन होते तेव्हा देवाने सुध्दा आपली सेवा करावी व अनेक रितीने देवाने आपणाला आशिर्वाद दयावा अशी आपण अपेक्षा करतो. सुरूवातीला ‘पापाची क्षमा‘ हा आशिर्वाद मिळावा म्हणून आपण त्याच्याकडे येतो. नंतर आरोग्य मिळावे, प्रार्थनेला उत्तर मिळावे. भौतिक समृध्दी व्हावी, काम, घर, लग्नाचा सोबती मिळावा इ.

आशिर्वाद शोधत राहतो. पण जरी आपल्या स्वतःच्या व लोकांच्या दृष्टीमध्ये गंभीर धार्मिक असलो, तरी ही स्वकेन्द्रीत असण्याची शक्यता आहे. आपल्या कक्षेमध्ये ‘देव‘ हा फक्त आणखी एक व्यक्ती बनतो व त्याच्यापासून काय मिळणे शक्य आहे ते आपण शोधत राहतो. ‘उधळा मुलगा‘ अन्न मिळावे या उद्देशाने वडिलांकडे परतला. तरी पण वडिलांनी त्याला स्वीकारले. आपला हेतू पूर्णपणे स्वार्थी असला तरीही देव आपणांस स्विकारतो. तो आपणांस अतिशय प्रेम करीत असल्यामुळे जरी आपला हेतु स्वकेन्द्रीत आहे हे स्पष्ट असले तरी आपण त्याजकडे गेल्यास तो आपला स्विकार करू इच्छितो. घेण्यापेक्षा दिले पाहिजे अशा त्याच्या स्वभावामध्ये आपण भागी होणे. हिच खरी आत्मीयता आहे.

हे ओळखण्यास आपण लवकरच परिपक्व व्हावे अशी त्याची आशा असते. तथापी हा उद्देश देव त्याच्या बहुसंतानाला समजेल असे कधीही करू शकला नाही. फक्त मी, मला आणि माझे व भौतिक आणि शारिरीक आशिर्वाद अशा स्वकेन्द्रीत विचारात ते जगतात व मरतात.

परिपक्व होणे म्हणजे आपल्या मनाचे नवीकरण होणे. म्हणजे आपल्या भूमीवरील आयुष्यात देवापासून आपण काय मिळवू शकतो यापेक्षा देवास आपणापासून काय मिळते यावर केन्द्रीत असणे. हे आपल्या मनाचे नवीकरण आपणास रूपांतर घडविते. (रोम 12:2) सियोन डोंगरावर कोकर्‍याच्या बरोबर उभे राहण्यास लायक असलेले हेच ते 144000(प्रग 14).

खरी आत्मीयता ही क्रोध, शिघ्रकोपीपणा, कामूक विचार, पैशावरील प्रेम यावर फक्त विजय मिळविणे ही नव्हे तर स्वतःसाठी जगण्याचे थांबवणे होय. स्वहित, स्वफायदा, स्वसुख, स्वतःची अनुकूलता, स्वइच्छा, स्वहक्क, स्वगौरव इतकेच नव्हे तर स्वतःची आत्मीयता, सुध्दा शोधण्याचे थांबवणे होय.

जेव्हा शिष्यांनी येशूला प्रार्थना शिकविण्यास विचारले. तेव्हा त्याने अशी प्रार्थना करण्यास शिकविले की त्यामध्ये एकदा सुध्दा मी, माझे व मला या शब्दांचा उल्लेख नव्हता. (लूक 11:1—4) इथे त्याने आपणांस प्रथम पित्याचे नाव, त्याचे राज्य आणि इच्छा या विषयी आस्था बाळगण्यास शिकविले. नंतर जसे आपण तसे आपल्या विश्वासू सोबती (त्याची भौतिक व आत्मीक समृध्दी) यांच्याविषयी आस्था बाळगण्यास शिकविले. (आम्हाला, आम्हाला आम्हाला व मला, मला, मला असे नाही) ह्दयाने प्रार्थना करणे. व पोपटासारखी त्याची पुनरावृत्ती करणे सोपे आहे. पण हा धडा शिकण्यासाठी खरोखर आपल्या सर्वस्वाचा त्याग करून देवाला ह्दयाच्या केंद्रभागी ठेवण्याची आपल्या ह्दयास जरूरी आहे. आपली परीक्षा करण्यास जर आपण प्रामाणिक असलो तर आपल्या संपूर्ण जीवनामध्ये स्वार्थीपणा, स्वतःचा फायदा व हक्क मिळवण्याची हाव, हा नियम बहुशः वारंवार आपल्या अवयवामध्ये सापडून येईल. (रोम 7:22)

येशूने आपणास ‘देवाचे राज्य‘ प्रथम शोधण्यास शिकवले ते म्हणजे स्वतः सिंहासनावरून खाली उतरून तिथे देव व देवाची इच्छा ही आपल्या जीवनाच्या केन्द्रभागी ठेवायचे. पृथ्वीवर पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी येशूने स्वर्गातील सर्व सूख सोडून दिले. प्रेषित बनून ख्रिस्तासाठी क्लेष भोगावे यासाठी पौलाने तार्सीसमध्ये ख्रिस्तीय व्यापारी बनून ऐषआरामाने जगण्याचे सूख सोडून दिले. प्रेषितामधील प्रत्येकजण ते त्यागमय सर्व काही देवाच्या राज्याच्या बढतीसाठी दिले. हे सर्व आजच्या पर्यटक बोधकां पेक्षा निराळे आहे. मलिन विचार, क्रोध यावर जरी विजय मिळवला तरी जी पवित्रता अजून स्वतःचे सुख, स्वतःचे हित शोधण्यापासून आपणांस रोखू शकत नाही ती पवित्रता खोटी पवित्रता आहे. हेच नेमकं बहुतेकांनी ओळखलेलं नाही आणि म्हणूनच सैतान त्यांना फसविण्यास यशस्वी झालेला आहे. अनेक ख्रिस्ती सुख संपत्ती व लाभ याच्या शोधात वेगवेगळया देशात स्थलांतर किंवा प्रवास करतात. तरी सुध्दा देवाचा आशिर्वाद त्यांच्या जीवनात असतो. पण देवाची मान्यता नसते. कारण देव व पैसा या दोन्हीची सेवा एकाचवेळी कोणी करू शकत नाही. (ते म्हणजे संपत्ती, सुख, आराम इ.) आपल्या जीवनावरील, आपल्या संततीवरील देवाचा आशिर्वाद पाहून,देव आपल्यावर खूष आहे असा जर आपण विचार करीत असलो तर सैतानाने खरोखरच आपणाला फसविलेले आहे. देवाचा आशिर्वाद व देवाची मान्यता या दोन्ही संपूर्णपणे वेगळया आहेत. ही पृथ्वी सोडण्यापूर्वी हनोख, ची जी साक्ष होती ती साक्ष आपल्या आयुष्याच्या अखेरीस आपली साक्ष असली पाहिजे. ‘तो देवाला संतोषवीत असे‘ (इब्री 11:5) फक्त तीन अक्षर पण पृथ्वीवरील आयुष्यात एवढी सामर्थी साक्ष कोणाचीही नाही. येशू व पौल यांची हिच साक्ष होती. देवापासून त्याला आशिर्वाद मिळाला ही एकच साक्ष काही किंमतीची नाही. लक्षावधी विश्वास न ठेवणार्‍यांना पण हीच साक्ष आहे.

त्याची मान्यता शोधणार्‍यांना देव शोधित आहे. आशिर्वाद शोधणार्‍यांना नाही.

English Source  अनुवादक : विनोद टॊडॆ     छपाई फोर्मेट    तुमचा मित्राला पाठविणे
तुमचा मित्राला पाठविणे | सप्ताह का संदेश | देविक लेख | संपर्क साधणे

© Copyright - Christian Fellowship Church , Bangalore. (INDIA)