English shape=

आम्ही कोण - ABOUT US

आम्ही हा विश्वास धरतो की:
पवित्र शास्त्र (66 पुस्तके) हे ईश्‍वरप्रेरित असून तो देवाचा अचूक शब्द आहे, ते आमच्या पृथ्वीवरील जीवनाचे केवळ एकच व पुरेसे मार्गदर्शक आहे.
एकच देव जो सर्वकाळासाठी तीन व्यक्तीमत्वांमध्ये अस्तित्वात आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा.
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे देवपण, त्याचा कुमारीच्या पोटी झालेला जन्म, त्याची मानवीयता, त्याचे परिपूर्ण पापविरहीत जीवन, आमच्या पापांचे प्रायश्‍चित्त म्हणून त्याने आमच्या बदल्यात सोसलेले मरण, त्याचे शारीरिक पुनरूत्थान, त्याचे पित्याजवळ वरती जाणे आणि त्याच्या संतांसाठी (विश्वासणार्‍यांसाठी) या पृथ्वीवर त्याचे व्यक्तीश: परत येणे यावर आमचा विश्वास आहे.
सर्व मानवजाती पापामध्ये मरण पावलेली आहे आणि पूर्णपणे हरवलेली आहे. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे मरण व पुनरूत्थान यावर विश्वास ठेवल्याच्याद्वारे आणि पश्‍चाताप केल्याच्या द्वारे त्यांच्या पापांची क्षमा होवू शकते आणि पापांच्या क्षमेचा हा एकच मार्ग आहे.
देवाचे मूल होण्याकरीता नवीन जन्म आवश्यक आहे व हे कार्य पवित्र आत्मा करतो.
केवळ ख्रिस्तावरील विश्वासानेच आम्ही नीतीमान ठरतो आणि त्याचा पुरावा म्हणजे चांगली कर्मे आहेत. ज्याद्वारे देवाचे गौरव होते.
नवीन जन्मानंतर पिता, पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात पाण्यात बुडून बाप्तिस्मा :
ख्रिस्ताविषयीची साक्ष आमच्या जीवनाद्वारे आणि शब्दाद्वारे देण्यासाठी सामर्थ्य मिळावे म्हणून पवित्र आत्म्याने सतत भरत रहाण्याची आवश्यकता आहे.
सार्वकालीक जीवनासाठी नीतीमानाचे पुनरूत्थान आहे व सार्वकालीक शिक्षेसाठी अनीतीमानाचे पुनरूत्थान आहे.


झॅक पूनेन यांच्याविषयी - ABOUT Br.Zac Poonen

झॅक पूनेन हे पूर्वी भारतीय नौदल सेनेमध्ये अधिकारी होते. भारतामध्ये ४० वर्षापासून ते बायबल चे शिक्षक तसेच अनेक मंडळयांमध्ये वडिलांची जबाबदारी सांभाळून प्रभूची सेवा करण्याचे कार्य करीत आहेत.

त्यांनी इंग्रजीमध्ये अनेक पुस्तके आणि लेख लिहीले आहेत. ज्यांचे इतर भारतीय भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले आहे. भारतामध्ये तसेच परदेशात त्यांनी दिलेल्या संदेशाचे ऑडीओ आणि व्हीडीओ कॅसेटस् आणि उऊी उपलब्ध आहेत.

उऋउ च्या इतर वडिलांप्रमाणेच झॅक पूनेन स्वत:चे आणि त्यांच्या कुटूंबाचे संगोपन करण्यासाठी स्वत: काम करतात आणि तसेच त्यांच्या सेवेसाठी ते कोणतेही वेतन स्वीकारीत नाहीत. ख्रिश्‍चन फेलोशिप सेंटरने प्रकाशित केलेल्या त्यांच्या पुस्तकांकरीता, ऑडीओ टेप्स, व्हिडीओ टेप्स आणि उऊी करीता ते कोणतेही मानधन स्वीकारीत नाहीत.

तुमचा मित्राला पाठविणे | सप्ताह का संदेश | देविक लेख | संपर्क साधणे

© Copyright - Christian Fellowship Church , Bangalore. (INDIA)